सदस्य:Chandoji

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ चंद्रकांत सोपान गायकवाड

नव्या पिढीतील विविध अंगाने विचार करणारे लेखक

त्यांचा 'आदिवासी संस्कृती आणि साहित्य'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 'दलित लोकरंगभुमी:संकल्पना आणि स्वरूप'या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त.शिवाय मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे संपादन व लेखन.साहित्य अकादमीच्या वारली भाषा कार्यशाळेत शोध निबंध सादर.विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये सहभाग.

 मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओंदे ता.विक्रमगड येथे मराठी भाषा विभागात कार्यरत.विविध प्रकारचे लेखन हा छंद
           परिचय:
  डॉ.चंद्रकांत सोपान गायकवाड(चांदोजी)

जन्म: २५ ऑगस्ट १९७४ जन्मस्थळ: डोणवाडा शैक्षणिक पात्रता: एम.ए.,नेट.,एम.फिल.,पीएच.डी. प्रकाशित ग्रंथ: आदिवासी साहित्य आणि संस्कृती

          साहित्य:कला, संस्कृती आणि                 समीक्षा विचार (संपादन)
लोकसाहित्य आणि तौलनिक साहित्य हे अभ्यासाचे विशेष क्षेत्र
  डॉ चंद्रकांत तथा चांदोजी गायकवाड हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व आई-वडील निरक्षर भुमीहिन.बाप दुसऱ्याच्या शेतात सालाने राहणारा आई मोलमजुरी करणारी पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रचंड श्रद्धा असणारी.हलाखीच्या परिस्थितीत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा डोणवाडा येथे.
इयत्ता ५वी ते ७वी जिल्हा परिषद शाळा पुर्णा जि.परभणी येथे.इथे बौद्ध विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्य.
इयत्ता ८वी ते १०वी धनगर टाकळी ता.पुर्णा जि.परभणी येथे इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये शिक्षण वसतीगृहात वास्तव्य.

पदवी पर्यंतचे शिक्षण बर्हिजी स्मारक महाविद्यालय वसमत जि.परभणी येथे मराठी, अर्थशास्त्र,आणि इतिहास या विषयांमध्ये.पदव्युत्तर मराठी विषयात औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम.फिल ही पदवी प्राप्त

 अलिकडील काळातील नव्याने उभरणारा एक लेखक