सदस्य:Bhakti Gurav
दीक्षा डागर
[संपादन]दीक्षा डागर (जन्म १४ डिसेंबर २०००) ही भारतातील एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीक्षाचे मूळ गाव हरयाणातील झज्जर आहे, मात्र ती सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये ती व्यावसायिक गोल्फ खेळाडू झाली आणि लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावणारी सर्वात कमी वयाची भारतीय आणि एकूणच फक्त दुसरी भारतीय खेळाडू ठरली. [1] कमकुवत श्रवणशक्तीसह जन्मलेल्या या गोल्फरने २०१७ च्या उन्हाळी डेफ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले. [2] २०१८च्या आशियाई स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
[संपादन]१४ डिसेंबर २००० रोजी हरियाणाच्या रोहतक येथे दीक्षाचा जन्म होण्याआधी तिचे आईवडील कर्नल नरिंदर डागर आणि सुनीता हे चिंताग्रस्त होते, कारण तिचा मोठा भाऊ योगेश हा कमी श्रवणशक्तीसह जन्मला होता.
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Nationality | भारतीय |
जन्म |
१४ डिसेंबर २००० झज्जर, हरियाणा |
Sport | |
खेळ | गोल्फ |
Coached by | नरिंदार डागर |
तीन वर्षानंतर, त्यांची भीती खरी ठरली जेव्हा चाचण्यांमधून हे स्पष्ट झाले की तिलासुद्धा जन्मतः कमी ऐकू येते. पण तिच्या पालकांनी निश्चय केला की ते त्यांच्या मुलांना इतर सर्वसामान्यपणे ऐकू-बोलू शकणाऱ्या मुलांशी जुळवून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
दीक्षाने स्पीच थेरपी सुरू केली आणि कोक्लियर इम्प्लांट केले ज्यामुळे तिची ६० ते ७० टक्के श्रवणशक्ती आली. आता तिच्याकडे चांगले हिअरिंग एडसुद्धा आहे, जे तिची ऐकण्याची क्षमता आणखी वाढवतात. [3]
दीक्षा तिच्या खेळामधील यशाचे श्रेय तिच्या गोल्फपटू वडिलांना देते. सहा वर्षांची असताना तिचा गोल्फशी परिचय झाला, तेव्हा कर्नल डागर यांनीच आपल्या मुलीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली कारण इतर कुणीही असे करण्यास तयार नव्हते. दीक्षा टेनिस, बॅडमिंटन आणि स्विमिंग हे खेळदेखील खेळते. [4]
२०१२ मध्ये इंडियन गोल्फ युनियनच्या (आयजीयू) उप-कनिष्ठ सर्किट या तिच्या पहिल्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दीक्षाने या खेळातच करियर करण्याचा निर्णय घेतला. [4]
गोल्फ हा एक महागडा खेळ असल्याने तिला हा खेळ फक्त एक हौशी खेळाडू म्हणून खेळणे परवडणारे नव्हते, कारण देशातील एखाद्या स्पर्धेसाठी जवळपास ३५ ते ४० हजार रुपये इतका अंदाजे खर्च येतो. [3]
तिच्यासमोर आणखी एक आव्हान होते. ते म्हणजे ती डावखुरी असल्याने तिच्यासाठी योग्य अशी उपकरणे उपलब्ध नव्हती. डावखुऱ्या दीक्षासाठी गोल्फ क्लब शोधणे इतके अवघड झाले होते की तिने काही काळ उजव्या हाताने खेळण्याचाही प्रयत्नही केला. खेळांसाठीची उपकरणे आयात करणाऱ्यांनीही फारसा रस दाखवला नाही कारण अवघे १० टक्के गोल्फर्स डावखुरे असतात. अखेर ऑस्ट्रेलियाला एका स्पर्धेसाठी गेलेली असताना दीक्षाला एक असे गोल्फ स्टोअर सापडले, जिथे व्यावसायिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तिच्यासाठी उपलब्ध होती.
व्यावसायिक कारकीर्द
[संपादन]दीक्षाने वयाच्या १२व्या वर्षी इंडियन गोल्फ युनियनच्या राष्ट्रीय उप-कनिष्ठ सर्किटमध्ये भाग घेत आपल्या करियरची सुरुवात केली. आपल्या कामगिरीमुळे ती अंडर-१५ आणि अंडर-१८ गटात अव्वल भारतीय महिला गोल्फपटू ठरली, आणि २०१५मध्ये लेडीज युरोपियन टूरदरम्यान तिने महिला हिरो इंडियन ओपनमध्ये स्वतःची छाप सोडत देशातील अव्वल महिला हौशी गोल्फर बनली. [3] [2]
हौशी खेळाडू म्हणून व्यावसायिक स्पर्धेत दीक्षाला पहिला विजय २०१७ साली हिरो महिला प्रो गोल्फ टूरमध्ये प्राप्त झाला. त्याच वर्षी तुर्कीमध्ये तिने डेफलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. असा विजय मिळवणारी ती पहिली भारतीय गोल्फर आहे. [2]
२०१८ मध्ये तिने सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली, जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, आणि थायलंडच्या क्वीन सिरिकिट कप सांघिक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्कोअर नोंदवणारी भारतीय ठरली. [7]
डिसेंबर २०१८ मध्ये या तरुणीने व्यावसायिकरीत्या गोल्फमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियात काही स्पर्धा खेळल्यानंतर ती मार्च २०१२ मध्ये प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने केप टाऊन येथे दक्षिण आफ्रिकन ओपन जिंकली. लेडीज युरोपियन टूरवर असा विजय मिळवणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरली आणि एकूणच दुसरी भारतीय खेळाडू ठरली. [1]