Jump to content

सदस्य:Bhagyshri yashvant kumbhar/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                                                                                                                   श्री अंबाबाई मंदिर आणि परिसराची माहिती

हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध आहे .अंबाबाईला पहिला नैवेद्य चांदूरहून येतो त्यानंतर हुपरीचा नैवेद्य दिला जातो. तीस वर्षांपूर्वी मंदिराचे खुदाईकाम करतेवेळी अंबाबाईची मूर्ती आणि महादेवाची पिंडी सापडली आहे. पुराणकाळातील अशी कथा आहे कि हुपरीच्या इंग्रजांच्या मुलग्याला मिश्या नव्हत्या त्यांनी नवस बोलला होता . माझ्या मुलग्याला मिश्या येऊ देत मी तुला चांदीच्या मिश्या वाहीन त्या मुलग्याला ज्यावेळेस मिश्या आल्या त्यावेळेस त्यांनी अंबाबाईला चांदीच्या मिश्या वाहिल्या व अभिषेक घातला त्यानंतर ती मूर्ती मिश्या असणारी पुजण्यात येत होती. पण कालांतराने त्या मिश्या काढल्या व मूर्ती होती तशी पुजण्यात आली. मंदिरासमोर एक बुरुज आहे त्या मंदिरातून पन्हाळ्याला जाण्यास रस्ता आहे . शिवाजी महाराज हे त्यामधून पन्हाळ्याला जात होते. तोही रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे. हुपरीत प्रसिद्ध असे चांदीकाम आहे. तिथे बनवली जाणारी पैंजण, जोडवी अशी अनेक चांदीची आभूषणे फक्त महाराष्ट्रातच नव्हे देशभरात विकले जातात.

नवरात्रउत्सव कार्यक्रम -:
        नवरात्रात मंदिरामध्ये नियमित कार्यक्रम साजरे केले जातात. त्यावेळेस पहाटे पाचला शिवसैनिकांची दौड हि नऊ दिवस असते. तसेच अंबाबाईची पूजा हि वेगवेगळ्या रूपात मांडली जाते. आरती हि चार वेळा केली जाते. मोठं मोठे कार्यक्रम पार पाडले जातात. अश्या प्रकारे उत्सव हा साजरा केला जातो. 

अंबाबाईची यात्रा :- यात्रा हि फेब्रुवारी महिन्यातील पंधरा तारखेनंतर असते. त्यावेळेस नैवेद्य हा अगोदर पोळीचा व नंतर नॉनव्हेजचा दिला जातो. पटांगणामध्ये कुस्तीचे मैदान आहे तिथे यात्रेत मोठी स्पर्धा असते. त्या मंदिरामध्ये गावचा पाटील म्हणजेच काका पाटील याना मान दिला जातो त्यांच्या हस्ते आरती केली जाते. मंदिरामध्ये महादेव,राधाकृष्ण,गणपती,नवग्रह,बालाजी,बिरोबा इ. प्रकारचे मंदिर आहेत. यात्रा हि खूप मोठी साजरी करतात. बाहेरील कमान हि खूप सुंदर आहे. मंदिर हे भव्यदिव्य व प्रशस्त आहे.

भाग्यश्री यशवंत कुभार                       
 मुरगूड बी.ए. १