सदस्य:Ankush Bobade

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ

राज्यात निर्माण करावयाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये होणारे अध्ययन-अध्यापन आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असणे आवश्यक आहे. याकरीता शैक्षणिक दृष्ट्या पुरेसे स्वातंत्र्य व स्वायत्तता मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर या शाळांच्या संलग्नतेकरीता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे (एमआयईबी) नवीन बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. दिनांक २ जानेवारी, २०१८ च्या शासन निर्णयान्वये संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.[१]

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या काही विशेष बाबी

  • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे स्वायत्त मंडळ आहे.
  • मंडळा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शिक्षण मिळणार. इंग्रजी भाषेच्या समृद्धीकरणावर भर दिला जाणार असून भविष्यात पूर्व प्राथमिकपासून संस्कृत भाषेचाही समावेश असणार आहे.
  • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची रचना व कार्यपद्धती आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असेल.
  • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपरिषद, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा आदी प्रकारांच्या शाळांना दिली जाणार आहे.
  • महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधून मातृभाषेतून शिक्षण दिले जाणार असून त्याची थीम ‘लोकल टू ग्लोबल’ अशी आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधून अद्ययावत शिक्षण मिळत आहे. पण काही विद्यार्थ्यांना मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याचा मानस महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा आहे.
  1. ^ https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201801031145194821.pdf