सदस्य:Andrew fernandes

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थोडा विचार करा आजवर किती पाणी आपण या जमिनीतून उपसा करुन वापरलय . ...अगदी बेमुर्वतखोर पणे वापरलय ..... पण आता हे पाणी परत जमिनीला परत द्यायची वेळ आलीय . यावर्षी पाउस चांगला पडणार आहे .

हीच वेळ आहे .

आता माझ्या मित्र यादीत अदमासे 1400 मित्र आहेत .

प्रत्येक जण वेगवेगळ्या सोसायटीत राहतो .

म्हणजे 1400 सोसायटीच्या छतावर पडणारे पाणी याचा विचार करुया.

प्रत्येक सोसायटीच्या छतावरचे अदमासे २ लाख लिटर पाणी जर जमिनीत मुरवले तर ८० कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल .

माझ्या चौदाशे मित्रांच्या मित्रयादीत प्रत्येकी १०० मित्र जरी पकडले तर हा आकडा किती वर जाईल .

प्रत्येक सोसायटीला rain water harvesting चा खर्च अदमासे ६००० ( जास्तीत जास्त ) यापलिकडे जात नाही .

म्हणजे एक लिटर पाणी जमिनीत मुरवायचा खर्च फक्त 3 पैसे ईतका येतो .

हेच एक लिटर पाणी तुम्ही विकत घेता तेंव्हा मात्र २० रु लिटर या दराने घेता .

आपण सर्वानी हा संकल्प सोडला तर काही हजार कोटी लिटर पाणी जमिनीला परत देवू शकतो .

सलग दोन तीन वर्षे हे पाणी जमिनीत परत गेल तर पुन्हा एकदा तुमच्या विहिरीला बोअर ला मुबलक पाणी असेल .

पाणी कपातीची वेळच येणार नाही .

कसही करा पण यावर्षी पासून ही पाण्याची उधारी परत करायला सुरुवात करुयात .

सगळ्या गोष्टी सरकार करणार नाही .

खरतर ही उधारी तुम्ही वैयक्तिक केलीय तेंव्हा ही उधारी फेडण ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे .

चला या निसर्गाच्या कर्जातून मोकळे व्हा .

ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा .....