सदस्य:Amu Niks

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रा.

सीलोनमध्ये (श्रीलंका) लिहीलेल्या पालि भाषेतील दिपवंस आणि महावंस या बौद्धांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात "महारठ्ठ" देशाचा उल्लेख आहे. पालि भाषेतील महारठ्ठ याचे संस्कृतात "महाराष्ट्र" आसे रुपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे. महावंस हा ग्रंथ इ.स नंतर पाचव्या शतकात लिहीला गेला. दिपवंस त्याच्या बऱ्याच अगोदर लिहीला गेला आहे.

महावंसात असे म्हटले आहे की, स्थविर मोग्गलीपुत्त तिस्स याने (तिसऱ्या) धम्मसंगतीचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देश समुहाला धम्म स्थापनेसाठी कार्तिक महीन्यात स्थविरांना पाठवले. कोनकोनत्या धर्मोपदेशकांना कोठेकोठे पाठवले त्याची सविस्तर माहीती महावंसामध्ये आढळते. त्यात 'महारठ्ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशाला पाठवले' असा उल्लेख आहे.

अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश आहे असा उल्लेख आहे. अहिहोळाचा लेख शके ५५६ म्हणजे इ.स. ६३४ चा आहे. हयू-एन-त्सँग आपल्या प्रवासवर्णनात ज्या 'मो-हो-लो-छीया' या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजे महाराष्ट्र असे विद्वानांचे मत आहे. हयू-एन-त्सँग महाराष्ट्रात इ.स. ६४१ - ४२ मध्ये होता.

सुप्रसिद्ध भूगोलशास्त्रज्ञ टोलोमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला "अरियके" असे नाव दीले आहे. टोलोमी इ.स. नंतरच्या दुसऱ्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया विश्वविद्दालयात खगोलशास्त्र शिकवित होता. कर्नाटकातील कलगदगी येथील लोक आजही महाराष्ट्राला 'अरि' असे संबोधतात असे ठाणे जिल्ह्याच्या बाॕम्बे गॕझेटीयर मध्ये लिहीले आहे.

मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. पण त्यापूर्वीच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासाची माहिती मिळत नाही. सम्राट अशोकाच्या पाचव्या धम्माज्ञेचे शिलालेख सौराष्ट्रातील गिरनार, कटकजवळील धौली, जंगम जिल्ह्यातील जौगढ, हिमालयाजवळील खालसी, अफगाणिस्तानातील शाहबाझगढी आणि पाकिस्तानातील मानसेहरा येथील खडकांवर कोरलेले आढळतात. त्या शिलालेखात आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी आणि धम्माचे प्रतिपालन करण्यात प्रजेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोकाने ज्या निरनिराळ्या प्रदेशात धम्माधिकारी पाठविले, त्यात रस्तिक, पेटनिक आणि अपरांत ह्या देशांचा उल्लेख आहे. डाॕ. भांडारकरांच्या मते, अपरांत म्हणजे उत्तर कोकण. त्याची प्रांतिक राजधानी सुप्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा होती. पेटनीक म्हणजे हल्लीच्या पैठण शेजारील प्रदेश आणि रस्तिक म्हणजे रथी किंवा महारथी लोक राहात असलेला प्रदेश..

(आंध्रच्या सातवाहनांनी आपल्या राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करतांना त्यांना रथी - महारथींनी तसेच भोज - महाभोजांनी बराच विरोध केला असला पाहीजे. म्हणून त्यांना 'अरि' म्हणजेच शत्रू असे नाव पडले असले पाहीजे. त्यावरुन अरियके असे नाव रथी - महारथींच्या प्रदेशाला इ.स. पूर्वी पहिल्या शतकात पडले असले पाहिजे आणि म्हणूनच टोलोमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला आरियके असे म्हटले आहे).