सदस्य:Amolace

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

== ‘दक्षिण काशी – शब्दयात्रा’ लेख क्रमांक 3 : करवीर क्षेत्र महात्म्य ==


‘दक्षिण काशी – शब्दयात्रा’ लेख क्रमांक 1 ची लिंक – https://kolhapurtimes.in/dakshin-kashi/

‘दक्षिण काशी – शब्दयात्रा’ लेख क्रमांक 2 ची लिंक – https://kolhapurtimes.in/dakshin-kashi-2/

प्रत्यक्ष श्रीविश्वनाथाच्या आज्ञेवरून ऋषी अगस्त्य आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी करवीरनगरी अर्थात,दक्षिण काशीकडे प्रस्थान ठेवले.त्यांच्या कथांतून,त्यांच्या उल्लेखातुन ‘दक्षिण काशी’ हे नामाभिधान प्रथमतः आढळते.

महाश्रेष्ठ कोल्हापूर |जलरूपाने असती विश्वेश्वर |विष्णूने रूप धरले गिरीवर |वालुकारूपें मुनिवृंद | प्रयाग बिंदू माधव |महालक्ष्मी रूपे शिव |सरस्वती ब्रह्मदेव |वास निरंतर तयांचे |

काशीचे अधिष्ठाता शिव तर करवीरनगरीची अधिष्ठात्री आदिमाया. काशीप्रमाणेच करवीरनगरीला अष्टदिशांना अष्टवसुंचा वास आहे.उत्तरेला वारणा-कृष्णा पूर्वेला मनकर्णिका,दक्षिणेस वेदा-यक्षा आणि पश्चिमेला मयूरीशिवा असे वर्णन ग्रंथातून आढळते.अर्थात,कुंभी-कासारी,तुळसा-भोगावती आणि गुप्त सरस्वती अशी मिळून आपली पंचगंगा बनली आहे अशी श्रद्धा आहे.काशीची गंगा आणि आपली पंचगंगा.काळानुसार,नद्यांचे प्रवाह आणि नावात बदल झालेले असू शकतात परंतु,पाच नद्या हे वर्णन चपखल आहे.यांपैकी मनकर्णिका ही नदी नसून ते पाण्याचे कुंड आहे जे मंदिर परिसरात आहे,आधी होते.आता ते बुजवण्यात आले आहे/असावे.हे कुंड काशीच्या माणिकर्णिकेसारखेच पवित्र आणि फलदायी मानले जात असे. चारी दरवाज्यांवर पूर्वेला रामेश्वर ,दक्षिणेला चक्रेश्वर ,पश्चिमेला कलहेस(कलेश,चंद्रकलाधारी) शंकर आणि उत्तरेला गुप्त मल्लिकार्जुन शिव उपस्थित आहेत. अगस्त्य लोपामुद्रेला सांगतात,”करवीर नगरीचे अधिकपण म्हणजे इथे दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष दत्तात्रेय येऊन अन्नग्रहण करतात.इथे प्रत्यक्ष अन्नपूर्णेचा वास आहे.याच ठिकाणी अंबामातेने केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर याचा वध केला.त्याच्या अत्याचाराने ग्रासलेली प्रजा देवीला शरण गेली आणि अश्विनाचे नऊ दिवस युद्ध करून देवीने त्याला यमपुरीस धाडले. ”

केलीदेहली/साक्षी गणेशाचे पूजन करून भक्त आपली येथील परिक्रमा सुरु करतात.त्यांनतर भवानीशंकराला प्रणिपात केल्यानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ होतो.त्याआधी,वाटेमध्ये कुकुटेश्वर,कनकेश्वर ,गोरम्भादेवी,अप्सरेश्वर,दत्तपादुका,विश्वेश्वर आदींचे दर्शन करून मुक्तिमंडपात प्रवेश झाला की महासरस्वती,महांकालीची प्रार्थना करून गाभाऱ्यात येऊन आदिमायेच्या वत्सल रूपाचे दर्शन घेता येते.

नमस्तेतु गरुडारुढै कोलासुर भयंकरी ! सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते !!

पुराणातील आणि काही ग्रंथातील हे ‘दक्षिण काशीचे’ वर्णन !!!

हे मंदिर नक्की कोणी बांधले याचा विशेष ठोस पुरावा नसला तरी,मंदिराच्या जीर्णोद्धाराचे शिलालेख किंवा काही उल्लेख आढळतात. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येत असते म्हणुन मंदिराची डागडुजी किंवा वाढ करणे शास्त्रसंमत नाही,परिणामी,आजूबाजूला मंदिर परिसरात इतर लहान लहान मंदिरांची संख्या लक्षणीय दिसते.

श्रीयंत्रावर हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते.मंदिर बांधणी आणि नंतरचा जीर्णोद्धार करतानाही मंदिरसौंदर्यावर विशेष लक्ष दिले गेले आहे.हिंदू धर्मशास्त्रात मंदिर बांधणीचे एक विशेष शास्त्र अभ्यासले गेले आहे.मंदिर हे फक्त देवता निवासाचे ठिकाण नसून एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आणि धर्म,अर्थ,काम,मोक्षाची शिकवण देणारे स्थान म्हणुन त्याचा विचार केला गेला आहे. तेथील भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादक,आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्य म्हणता येईल. मुख्य देवालयाच्या बाहेरिल बाजुस चौसष्ट नृत्य करणा-या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते.येथील नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्लपकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल.मंदिरपरिसरात दीपमाळांचा छोटा समुह आहे. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा आहे.या घंटेचा नाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो.हा दरवाजा घाटी दरवाजा म्हणुन प्रसिद्ध आहे.

या मंदिराची,करवीरनगरीची आणि मूलत: आई अंबाबाईची महती सांगणारी अर्वाचीन म्हणता येईल अशी रचना म्हणजे आदिशंकराचार्यांनी रचलेले महिषासुरमर्दिनी स्तोत्र –

सुर वर वर्षिणी दुर्धरधर्षिणी, दुर्मुखमर्षिणी घोषरते। दनुजन रोषिणी दुर्मदशोषिणी, भवभयमोचिनी सिन्धुसुते।। त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी, किल्विषमोचिणी हर्षरते। जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्य कपर्दिनी शैलसुते।।

महामायेच्या कन्या,पत्नी,माता, योद्धा,अन्नपूर्णा,भक्तवत्सल,भवतारिणी अशा अनेक रूपांचे वर्णन यांत पहायला मिळते.

पुढच्या लेखात – करवीर तेव्हा,करवीर आता.

ताज्या घडामोडींसाठी आमचे फेसबुक पेज Like आणि Follow करा https://www.facebook.com/kolhapurtimesofficial/

ताज्या घडामोडींसाठी आमचा Whatsapp group Join करा https://chat.whatsapp.com/ETGce4FI2R5BImbBvKCTBm