सदस्य:Amir Wahab Deshmukh/s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुस्लिम को-ऑपेराटीव्ह बँक पुणे या बँकेची इनामदार यांनी अत्यंत कर्तबगारीने वाढ केलेली असून , बँकेच्या ठेवी ६ कोटी रुपयांवरून २५० कोटी रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत . त्याशिवाय या बँकेच्या पूर्वी चारच शाखा होत्या . इनामदार यांनी १६ शाखांची भर घालून बँकेच्या २० शाखा केल्या .

गृहनिर्मिती , वित्तीय व शैक्षणिक या क्षेत्रांमधे  इनामदारांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले . त्यामुळे पुण्याच्या प्रत्येक मुस्लिम कुटुंबामधील किमान एक तरी व्यक्ती या उपक्रमांचा -शैक्षणिक , नोकरी विषयक किंवा गृह योजनेचा फायदा घेत आहे . इनामदारांच्या या विविध उपक्रमामुळे मुस्लिम जमातीचा केवळ तोंडवळाच  बदलला गेला नाही तर त्यांच्या वैचारिक बैठकींमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे श्रेया  इनामदार याना दिले जाते .

चोवीस एकरांच्या ओसाड आझम कॅम्पसमध्ये पूर्वी फक्त दोन प्राथमिक शाळा आणि २ हायस्कूल होती . या जागेवर पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर  शिक्षणापर्यंत विविध प्रकारचे शिक्षण देणाऱ्या चोवीस शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण करण्याचे शर्य केवळ इनामदार यांचेच आहे . शिशु म्हणून या आझम प्रांगणामध्ये एकदा का प्रवेश घेतला कि तो वकील , दंतवैद्य , वस्तू- शिल्पकार , औषधनिर्माता , शिक्षक ,व्यवस्थापतज्ञ किंवा  माहितीतंत्रज्ञ म्हणूनच बाहेर पडू शकेल अशा विविध शैक्षणिक सोयी इनामदार यांनी निर्माण करून ठेवल्या आहेत