सदस्य:Akshay patil108/ s1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पट्टणकोडोली बिरदेव मंदिर

विठ्ठल-बिरदेव चांगभलंचा अखंड जयघोष, खारीक-भंडाऱ्याची उधळण, कैताळ-हलगीचा निनाद अशा वातावरणात पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेव यात्रेला प्रारंभ होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी भंडा-यामध्ये न्हाऊन निघत विठ्ठल-बिरदेवाचे दर्शन घेतात.हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेवाची यात्रा चार दिवस भरते. धनगर समाजाचे विविध राज्यांतील भक्तगण पट्टणकोडोली येथे लाखोंच्या संख्येने दाखल झालेले असतात. धार्मिक परंपरेनुसार यात्रेला प्रारंभ होते.सकाळी मानाच्या तलवारीचे पूजन चावडीवर होते. जोशी, आवटे, चौगुले, नाजरे, धनगर समाजाचे पंच आदींचा लवाजमा फरांडे बाबांच्या भेटीसाठी वाजत गाजत निघत असतो .प्रथेप्रमाणे विविध मंदिरांना भेटी देत भक्तगणांचा मेळा दगडी गादीजवळ दाखल होतो.तीन दिवस येथे फरांडे बाबा विराजमान झाले असतात. मानक-यांनी त्यांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याची विनवणी केला जातो. त्यानंतर पुन्हा सर्वजण सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे निघते. या वेळी फरांडे बाबांच्या पोटावर तलवारीने वार करण्याचे हेडामनृत्य बाबांच्या जयघोषात पार पडते.या वेळी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आल्याने अवघा परिसर पिवळा धम्मक झालेला असतो . परंपरेप्रमाणे बाळलोकर, खारीक, पैसे यांचीही उधळण करण्यात येते . मंदिरात पोहोचल्यानंतर पूजाविधी झाल्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम पार पडतो.यात्रेनिमित्त प्रशासनाने चोख व्यवस्था व नेटका पोलीस बंदोबस्त बंदोबस्त असते. कोल्हापूर-हुपरी मार्गावर असलेल्या पट्टणकोडोली गावात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी एकेरी वाहतूक राबविण्यात आली असते. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रामार्गाची डागडुजी केल्याने वाहतूक सुरळीत सुरू राहतो.https://www.esakal.com/paschim-maharashtra/vittal-biroba-pattankodoli-yatta-starts-kolhapur-226040