Jump to content

क्रांती कानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:Abm1994/क्रांती कानडे या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रांती कानडे

क्रांती कानडे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते  भारतीय चित्रपट निर्माते आहेत.[] त्यांच्या चित्रपटांमध्ये पीपल ट्री, सीआरडी (चित्रपट), गांधी ऑफ द मंथ, महेक आणि चैत्र यांचा समावेश आहे.[]त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय,[] UCLA (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस) आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) येथे शिक्षण घेतले.

चित्रपट

[संपादन]

पीपल ट्री

[संपादन]

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असुन ,भारतातील बेकायदेशीर वृक्ष हत्येच्या मुद्द्याशी संबंधित आहे. पोलिस अकादमी मध्ये जेंव्हा वृक्ष तोड होते तेव्हा एक कुटुंब ही वृक्षतोड का केली  गेली हे जाणून घेण्यासाठी सामोर जाते आणि त्या  अकादमीला वृक्षतोड हा दंडनीय दखलपात्र गुन्हा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. ते एका वृक्ष कार्यकर्त्याकडे जातात जो सर्व प्रकारची झाडे वाचवतो. वृक्षांचे रक्षण करण्यासाठी समाज रात्रीच्या वेळी झाडाखाली जमतो पण ते इतके सोपे नाही." []

सी आर डी 

[संपादन]

हा  चित्रपट महाविद्यालयीन जीवनातील  थिएटर या  विषयावर  प्रकाश  टाकतो. सी आर डी फॅसिझम आणि कला क्षेत्रातील तीव्र स्पर्धा अत्यंत नाविन्यपूर्ण वर्णनात्मक शैलीने दाखवतो. सी आर डी ने  रॉटन टोमॅटोजवर १००% रेटिंग मिळवून मोठ्या समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश मिळवले आहे. हा चित्रपट यूएस आणि भारतात थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. लॉस एंजेलस टाईम्सने याला "मनमोहक, साहसी "[]असे संबोधले आहे  आणि द हिंदूच्या प्रशंसित चित्रपट समीक्षक नम्रता जोशी यांनी याला "तेजस्वी, विध्वंसक आणि निर्भय ''[]असे म्हणले आहे जिथे कोणताही भारतीय चित्रपट यापूर्वी गेला नव्हता." द हिंदूच्या[]२०१७ च्या सर्वोत्कृष्ट दहा हिंदी चित्रपटांच्या यादीत हा होता, हफिंग्टन पोस्ट समीक्षक मुर्तझा अली खान यांच्या टॉप टेन यादीत[], आणि Scroll.in समीक्षकाच्या दशकातील पहिल्या दहा चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. नंदिनी रामनाथ यांनी याला "बॉलिवुडमधील दशक: वेगळे स्वप्न पाहण्याचे धाडस करणारे चित्रपट. २०१० आणि २०१९ दरम्यान बनवललेला सर्वात साहसी आणि प्रेमळ चित्रपट " []

गांधी ऑफ द मंथ

[संपादन]

गांधी ऑफ द मंथ मध्ये दिग्गज अभिनेता हार्वे केटेल, नीरज काबी आणि इतर प्रमुख भारतीय कलाकार आहेत. हा चित्रपट भारतातील एका अमेरिकन स्कूल मास्टरबद्दल आहे जे आपल्या विद्यार्थ्यांना कट्टरवाद्यांपासून वाचवण्यासाठी धडपडत आहे. याआधी 'अगेन्स्ट इटसेल्फ' नावाच्या पटकथेला लॉस एंजेलसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलद्वारे फिल्म फंड अनुदान मिळाले.[१०]ज्युरीमध्ये गिल डेनिस ( वॉक द लाइन ), अनुराग कश्यप ( गँग्स ऑफ वासेपूर ) आणि सूनी तारापोरवाला ( सलाम बॉम्बे ) यांचा समावेश होता.[११]  स्क्रिप्टचे मार्गदर्शक ऑस्कर विजेते डॅनिस तानोविक ( नो मॅन्स लँड ), बर्ंड लिचटेनबर्ग ( गुड बाय लेनिन! ), ऑलिव्हिया हेट्रीड ( गर्ल विथ अ पर्ल इयरिंग ) आणि अंजुम राजाबली ( रजनीती ) होते .

महेक

[संपादन]

महेक , हा एक बालचित्रपट असुन यातील ११ वर्षांची मुलगी महेक ही  प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट होण्याचे स्वप्न पाहते, परंतु तिचे ध्येय कसे साध्य करावे याबद्दल ती अनिश्चित आहे. BFI लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेमळ पुनरावलोकनांसाठी त्याचा प्रीमियर झाला. चित्रपट विद्वान आणि लेखक रॅचेल ड्वायर यांनी या चित्रपटाला "चित्रपटाचे रत्न" म्हणले आहे, समीक्षक आणि लेखिका मैथिली राव यांनी "संवेदनशीलता आणि सौम्य विनोदाचा दुर्मिळ संयोजन"[१२]म्हणले आहे. हा चित्रपट जगभरातील उत्सवांना आमंत्रित केले गेला असुन, त्याला हॉलीवूड आणि ह्यूस्टनमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.[१३] ऑस्ट्रेलियातील[१४] आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणुन याला नामांकन होते आणि यूएस मधील ऑटरबेन विद्यापीठात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महेक  दाखवला गेला.[१५] [१६]

चैत्र

[संपादन]

चैत्र हा चित्रपट दिग्गज मराठी लेखक जीए कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित आहे. पारंपारिक हळदी-कुंकू उत्सव या चित्रपटात मांडलेला आहे, तो काव्यात्मक न्याय आणि नियती या विषयांना जोडतो. सर्वोत्कृष्ट लघुपट, लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत (पं. भास्कर चंदावरकर) आणि अभिनयासाठी विशेष ज्युरी पुरस्कार (सोनाली कुलकर्णी) यासह पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत[१७] याने MIFF चित्रपट महोत्सवात दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.[१८]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://pib.nic.in/archieve/lreleng/lyr2002/rjul2002/26072002/r2607200224d.html |title=PIB Press Releases |publisher=Pib.nic.in |date=2002-07-26
  2. ^ "Cinematic Kranti!". Business Line. 2008-06-06. 2013-11-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Fergusson College, Pune". fergusson.edu. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "Peepal Tree". 29 October 2021.
  5. ^ Abele, Robert (3 November 2016). "Review: Indian film 'CRD' both baffling and enchanting". Los Angeles Times. 9 October 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Joshi, Namrata (22 March 2016). "Theatre of the audacious". The Hindu.
  7. ^ Joshi, Namrata (26 December 2017). "The best of Hindi cinema in 2017". The Hindu.
  8. ^ "The 10 Best Hindi Films of 2017". 27 December 2017.
  9. ^ "The decade in Bollywood: The movies that dared to dream differently".
  10. ^ "Professional Program's Kanade wins Indian Festival's first Film Fund grant". 11 February 2010. 2023-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  11. ^ "IFFLA - Newsletter". 2023-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  12. ^ "Reality and dreams".
  13. ^ "> All About Cinema... > Indian children's films win accolades in Houston". Indiantelevision.com. 2008-04-25. 2013-11-08 रोजी पाहिले.
  14. ^ "Mahek".
  15. ^ "Hindi film included in US university syllabus". The Economic Times.
  16. ^ "Kranti Kanade-A new film-maker on the horizon".
  17. ^ http://pib.nic.in/archieve/lreleng/lyr2002/rjul2002/26072002/r2607200224d.html |title=PIB Press Releases |publisher=Pib.nic.in |date=2002-07-26 |accessdate=2013-11-08
  18. ^ "MIFF'2002 Award Winning FilmsMumbai International Film Festival | Mumbai International Film Festival". 2023-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]