सदस्य:सागर शंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सागर शंकर यांचा जन्म २ जून १९९१ रोजी फुटजवळगाव येथे झाला. फुटजवळगाव हे अतिशय लहान गाव आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी नजीक हे गाव आहे. उजनी धरणाच्या फुगवटा भागात हे गाव वसलेले आहे. उजनी धरणात पहिल्यांदा पाणी धरले गेले तेव्हा अकोले खुर्द या गावात उजनी धरणाचे पाणी शिरले. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला शेतजमिनी असणारे अकोले खुर्द गावच्या लोकांनी शेतात येण्याजाण्याचा त्रास वाचवण्यासाठी ओढ्याच्या दुसऱ्या बाजूलाच वस्ती केली. ही वस्ती विस्तारत गेली आणि फुटजवळगावची निर्मिती झाली. अर्थातच फुटून जवळच गेलेले गाव म्हणजे फुटजवळगाव. या फुटजवळगावत सागर शंकर यांचा जन्म झाला. अंगणवाडी ते चवथीपर्यंतचे शिक्षण फुटजवळगावातच झाले. पुढील शिक्षणासाठी ते अकोले खुर्द या त्यांच्या मूळ गावी जाऊ लागले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अकोले खुर्दमध्येच झाले. त्यानंतर टेंभुर्णी येते मराठी या विषयातून बी.ए. पूर्ण केले. बी.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा मिळाली आणि ते पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गेले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात त्यांनी एम.ए. केले. त्याचबरोबर नाट्यशास्त्र विभागातून त्यांनी सर्टिफिकेट कोर्स आणि ब्रिज कोर्स पूर्ण केले. त्यांच्या अंगी असलेल्या संशोधक वृत्तीस शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाने चालना मिळाली. 'आणीबाणी आणि मराठी कविता' या विषयावर त्यांनी संशोधन करून एम.फील. ही पदवी संपादन केली. सद्या ते 'ऐतिहासिक कादंबरीतील रंजनपरता'या विषयावर पीएच.डी पदवीसाठी संशोधन करत आहेत. तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या एका मोठ्या प्रकल्पावरही ते संशोधक म्हणून काम करत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील बोली भाषांचा ते अभ्यास करत आहेत.