सदस्य:साखरे गोविंद दौलतराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेंडू खुर्द
  महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेंडू खुर्द हे गाव आहे.

एक मध्यम आकाराचे हे गाव आहे. पेंडू खुर्द या गावात एकूण 282 कुटुंबे आहे. हे गाव तालुक्याचे ठिकाण पासून 11 किमी अंतरावर आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 55 किमी अंतरावर वसलेले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1292 एवढी आहे तर सध्या 1400 च्या जास्त असेल.

या गावाच्या आसपास पालम,लोहा,पूर्णा,परभणी नांदेड,ही शहरे आहेत. हे ठिकाण परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या हद्दीवर आहे नांदेड जिल्हाच्या लोहा या तालुक्याच्या पूर्वेकडे हे गाव वसले आहे.

या गावात माळी, हटकर, धनगर, मराठा, सुतार, सोनार, बौद्ध, मांग, मुस्लिम, वडर या जातीचे लोक राहतात. या गावाची पोस्ट सेलू आहेत तर त्यांचा पिन कोड 431720 अशा आहे. त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय व आचार्य विनोबा भावे प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. आश्रम शाळा ही पहिली ते सातवी पर्यंत ची आहे तर त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय पाचवी ते 1दहावीपर्यंत आहे जिल्हा परिषद शाळा ही पहिली ते चौथी तर 0 ते 6 वयोगटातील मुलांना अंगणवाडी सुविधा उपलब्ध आहे.

पंचायती राज्य कायद्यांनुसार व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पण आहे त्याचे 4 वार्डात यांचे विभाजन करण्यात आले एकूण 11 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. पेंडू खुर्द या गावाला भिडून च पेंडू बुद्रुक हे गाव आहे या गावात श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांची मोठे देवस्थान आहे. त्या देवाचा जन्म या गावात शके 1814 तर समाधी शके 1875 ची आहे. एक छोटेसे पंढरपूर म्हणून या गावाकडे पाहिले जातो. पंधरवाडा एकादशीला येथे छोटी यात्रा भरते तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन कीर्तन विविध कार्यक्रम व यात्रा महोत्सव असतो. या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावातील 50% लोक शेती तर 25% लोक नोकरी तर राहिलेली 25% गावात पारावर बसतात. पालम तालुक्यात कापसासाठी अग्रेसर म्हणून या गावांकडे पहिले जात तसेच सोयाबीन तूर मूग ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात या गावची जमीन काळे स्वरूपाची आहे. शाळेत येणे जाण्यासाठी या गावाला बसची सुविधा उपलब्ध आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत या गावाची साक्षरता 32% तर पुरुष साक्षरता 85% ,महिला साक्षरता 59% आहे. या गावात बाजारपेठ उपलब्ध नाहीत तर तालुक्याच्या ठिकाणी बाजार करण्यासाठी जावे लागते. गावात प्राथमिक रुग्णालय सुविधा, रस्ते उपलब्ध नाहीत.