सदस्य:समिक्षा ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                                   भ्रष्टाचार
         ‘भ्रष्टाचार’ हा शब्द तसा बहु परिचित आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय हे काही नवीन नाही. पण तरीही भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न पडतोच. आणि तो कधीपासून सुरू होतो, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचारावर कोणीही कितीही चर्चा केली तरी त्याचं एक उत्तर सापडणं कठीण. भ्रष्टाचाराची आज घडीत सर्वच ठिकाणी आपली पाळेमुळे रुजलेली दिसतात. तरी भ्रष्टाचार म्हटल की नेते आणि प्रतिष्ठित लोकांची काही नावे समोर येतात. पण भ्रष्टाचार तिथूनच सुरु होतो का? तर, खोलवर जाऊन पाहिले तर भ्रष्टाचार हा अगदी लहानात-लहान  घटकापासून सुरू झालेला दिसतो. लहानात-लहान घटक म्हणजे शाळा-महाविद्यालयांमध्ये जो प्रकार सर्रास पाहायला मिळतो. व्यक्तिगत पातळीवर पाहता आजकाल शाळेतील मुले जी कॉपी (नक्कल) करतात. तिथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. असे म्हणायला हरकत नाही.आणि विशेष म्हणजे कॉपी (नक्कल) त्यांना काही गैर किंवा आपण चुकीचे करत आहोत असे वाटत नाही. उलट बहुतांशी मुलांचे त्यावर उत्तर हे  “त्याला काय होतंय, सगळेच करतात.” असेच असते. पण हळूहळू हे त्याला काय होतंय सगळेच करतात. पण हळूहळू हे त्याला काय होतंय हेच पुढेही सुरू राहते. आणि मग आपण काही चुकीचे करत नाही. हेच त्यांच्या मनात ठाम बिंबल जात. म्हणजेच लहानपणापासून होणारे संस्कार याला जबाबदार आहेत असेच म्हणावे लागेल. आपण सर्वापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती,कमीत कमी वेळात यशाच्या अपेक्षेने त्यांची पावले या मार्गाला वळतात. आणि त्याच मार्गावर यशस्वीरीत्या चालणेही त्यांना सोयीस्कर वाटते. म्हणून पुढे जाऊन अन्य क्षेत्रातही भ्रष्टाचार होताना दिसतो. आपल्या वेतनातून मिळणारा पैसा हा आपल्या अवास्तव गरजा भागवण्यास अपुरा वाटू लागतो. आणि मग कोणत्याही मिळेल त्या मार्गाने आपल्या गरजा भागवण्यास तयार होतात.
        भ्रष्टाचार ही समाजापुढे एक मोठी समस्या आहे. आणि त्याची सुरुवात जर लहानात-लहान घटकापासून होत असेल, तर त्याच समाजातील प्रत्येक स्तराने भ्रष्टाचारवर आळा घालण्याची गरज आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांवर जर जास्त गुणांची अपेक्षा लादली नाही, किंवा त्यांच्या कुवतीप्रमाणे जर त्याला वागु दिले तर तो कॉपी(नक्कल) सारख्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्याचा नक्कीच टाळेल. आणि त्यातूनच समाजातील पुढच्या स्तरावरील भ्रष्टाचार कमी होईल अशी आशा बाळगली जाऊ शकते. कारण भ्रष्ट आचरण आधी  स्वतःला पटावे लागते. आणि आपण करत आहोत हे चूक आहे. स्वतःची समाजाची फसवणूक करत आहोत. असे जेव्हा वाटेल तेव्हा तो कोणतेही भ्रष्ट वर्तन करणे शक्य नाही. 
       आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की प्रत्येक क्षेत्रात अगदी दवाखाना, शिक्षण, राजकारण, शिक्षण, सरकारी कार्यालय अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार होत असतो. समाजात भ्रष्टाचार हा एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नाही. प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्ट लोक दुसऱ्याकडे पाहून आपल्या गुन्हा लपवण्यासाठी किंवा कमी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो. राजकारणी, सरकारी कर्मचारी खाजगी कंपन्या, बिल्डर्स यांपासून ते दुकाने, भाजीविक्रेते, अगदीच सर्व स्तरातील उत्पादक विक्रेत्यांपर्यंत हा भ्रष्ट मार्ग अवलंबताना दिसतात. परंतु त्या भ्रष्टाचाराची कारणे शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न केला तर तो आपल्या वाढत्या गरजा, आजूबाजूच्या उच्चभ्रू लोकांचे राहणीमान पाहून त्याप्रमाणे कमी वेळात वागण्याच्या प्रयत्न आणि एखाद्या कडून पैसे देऊन काम करून घेणे अगदी लहानपणापासूनच याची सुरुवात होते असे म्हणायला काहीच हरकत नाही.
        भ्रष्टाचार ही समस्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक असल्यामुळे राष्ट्राच्या प्रगती आणि विकासालाही अडथळा असल्याचे दिसते. भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे. पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असलेली काही प्रमाणातच दिसते. आणि या कायद्यातही नवनवीन बदल होत असलेले दिसतात परंतु नुसते कायदे करून प्रश्न सुटतील का? असा प्रश्न पडतो. वेगवेगळे कायदे आहेत पण जनमानसात रुजल्याप्रमाणे कायदे हे फक्त मोडण्यासाठीच असतात. कायद्याचे पालन झाले असते तर प्रश्न आणि समस्या उद्भवल्याच नसत्या परंतु तसे होताना दिसत नाही.भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी कायदयाबरोबरच योग्य त्या नीती मूल्ये प्रत्येकाने अंगिकारणे गरजेचे आहे.