सदस्य:सतेज दणाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य अकादमी चा युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांंच्या फेसाटी या कादंंबरीस जाहीर झाला.जत च्या दुष्काळी आणि कन्नड - मराठी भाषिक सीमा भागातील सर्वसामान्य अल्पभूधारक , कष्टकरी,वंंचित आणि पशुपालक धनगर समाजाचे जीवन प्रादेशिक व भाषिक वैशिष्ट्यासह फेसाटीत गोरे यांंनी मांंडले आहे.नाथा चा महाविद्यालयीन जीवनापर्यतचा प्रवास आत्मपर निवेदनातून कथन केला आहे.ही नाथा च्या अनेकपदरी संंघर्षाची कथा आहे तशीच ती धनगर समाजाच्या संंघर्षाची कथा आहे. आपले हे संंघर्षमय खडतर, धघधगते जीवन जनसामान्यांंना सांंगावे या भूमिकेतून नवनाथ हा फेसाटी चा लेखक व्यक्त होत राहतो. या बाजूचा विचार करता फेसाटी हे नवनाथ चे आत्मकथन आहे तसे ते धनगर समाजाचे वास्तव जीवन सांंगणारे आत्मकथनही आहे.हे नवनाथ गोरे यांच्या 'जीवनात जे भोगलंं,तेच 'फेसाटी'त मांंडलंं या विधानातून सार्थ ठरते.