सदस्य:सचिन वसंत पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांगावा पुस्तक परिचय

     *आपुलकीचा सांगावा*
                  ✍️ सौ विजया हिरेमठ

_________________________________

        लेखक सचिन वसंत पाटील यांचा 'सांगावा' हा कथासंग्रह नुकताच वाचून झाला. या पुस्तकातील प्रत्येक कथा ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारी आहे. ग्रामीण मराठी भाषेमुळे कथेतील प्रत्येक घटना जश्याच्या तश्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझा शेती किंवा ग्रामीण भागाशी फारसा संबंध न आल्यामुळे बरेच शब्द अनोळखी वाटले पण कथांच्या ओघात संदर्भ सापडत गेले आणि बर्‍याच नवीन शब्दांची ओळख झाली. तसे पाहता सर्वच कथा वास्तव व मनाला चटका लावणार्‍या आहेत. पण काही ठराविक कथांविषयी थोडक्यात लिहीण्याचा मी प्रयत्न करते.

भूल:- अपेक्षेपेक्षा चांगले आलेले पीक आपल्या आजारी आईचा बळी घेणार या भीतीपोटी आपणच रक्ताचे पाणी करून पिकवलेले पीक स्वतःच्या हाताने जमिनदोस्त करणार्‍या आईवेड्या शेतकऱ्याची ही कथा आहे. उत्पनापेक्षा माणूस श्रेष्ठ हे ही कथा सांगून जाते. काळीज:- शेतकर्‍यांसाठी त्याचे शेत म्हणजे त्याचे काळीज. स्वतःच्या पोराच्या हट्टासाठी आपली वडिलोपार्जित जमीन कंपनीला देऊ केल्यानंतर फक्त शरीराने जीवंत राहणार्‍या शामूआण्णाची ही कथा. रानाबरोबर रान व्हावं लागतं तेव्हा काळी आई पिकती... फुलती...हेच खरं. वाट:- आपल्या आयुष्यात गोडवा आणणार्‍या साखरेसाठी ऊसाचे पीक घेणार्‍या शेतकऱ्याचे आयुष्य मात्र कडवट. ऊस लावल्यापासून तो कारखान्याला जाऊन त्याचा पैसा हातात येईपर्यंत शेतकऱ्याचे मात्र रक्ताचे पाणी करून टाकतो. शेतकरीराजा म्हणून संबोधल्या जाणार्‍या आपल्या देशात पावलोपावली शेतकऱ्याचे कसे शोषण होते याची कथा अतिशय वाचनीय आहे. मरणकळा:- आपल्या आजारी वडिलांसाठी इच्छा असतानाही काहीच करू न शकणार्‍या एका शिक्षकाने रोज भोगलेल्या मरणकळांची ही कथा. ही कथा वाचताना मन अगदी हेलावून गेले, डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले माझे मलाच समजले नाही. एकदा हातातील वेळ आणि माणूस निघून गेल्यानंतर दुःख करणे एवढेच आपल्या हातात राहते. आपण त्या व्यक्तीसाठी जिवंतपणी काहीच करू शकलो नाही तर आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकत. पावना:- या कथेत लेखकाने शेतकर्‍याला करावे लागणारे कष्ट अतिशय कळकळीने मांडले आहे. शेताप्रमाणेच शेतकऱ्याचा जीव आपल्यासाठी राबणाऱ्या जनावरासाठी तिळतिळ तुटत असतो याची तीव्र जाणीव या कथेतून होते. तसेच 21 व्या शतकातही शेतकर्‍याला आपल्या व्यापातून वेळ काढून पै पाहूण्यांमधे मनसोक्त रुळता येत नाही. अनोळखी अवेळी आलेल्या पाहूण्याचे आदरातिथ्य न करता रात्रभर त्याच्यावर पाळत ठेउन बसलेल्या शेतकऱ्याची ही कथा.

        याव्यतरिक्त 'मांडवझळा' मधून कुत्र्याचे मनोगत. 'धग' मधून एका गरीब कामगार इस्त्रीवाल्याच्या भावना लेखकांनी अतिशय सुंदर आपल्या कल्पनेबाहेर मांडल्या आहेत. कथांमधील शेती, हवामान, वेळ आणि व्यक्तीचे वर्णन खूपच वास्तविक वाटते. आणखी खूप लिहिण्यासारखे आहे. पण माझे शब्द अपुरे पडत आहेत. म्हणून तुम्ही स्वतः च एकदा आवश्य वाचा... हाच माझा तुम्हाला 'आपुलकीचा सांगावा'..!

- सौ. विजया हिरेमठ

कोल्हापूर रोड सांगली. 

__________________________________ कथासंग्रह : सांगावा (तिसरी आवृत्ती) लेखक : सचिन वसंत पाटील प्रकाशक : गवळी प्रकाशन इस्लामपूर पृष्ठे १४८ किंमत २२० रूपये ०८:५२, १ मार्च २०१८ (IST)०८:५२, १ मार्च २०१८ (IST)०८:५२, १ मार्च २०१८ (IST)०८:५२, १ मार्च २०१८ (IST)०८:५२, १ मार्च २०१८ (IST)०८:५२, १ मार्च २०१८ (IST)सचिन वसंत पाटील (चर्चा) ०८:५२, १ मार्च २०१८ (IST)



सांगावा कथासंग्रह

       मोलाचा ठेवा'सांगावा'
                ✍️ प्रा. राजा माळगी

__________________________________

        १९८० नंतर खेडे झपाट्याने बदलत जाऊ लागले, जागतिकीकरणाचे प्रत्यक्ष परिणाम गावगाड्यावर झाले. शेती या मुख्य व्यवसायावर संकट कोसळले. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. राजकारणामुळे ग्रामीण माणसाची मानसिकता बदलून गेली. त्याची मुल्ये बदलली या ग्रामीण विश्वाचे आणि ग्रामीण माणसाचे झालेले आंतर्बाह्य परिवर्तन मराठी कथेतून टिपण्याची गरज होती ते सचिन वसंत पाटील यांनी 'सांगावा' या पहिल्याच कथासंग्रहातून टिपत साहित्य क्षेत्रात पदार्पन केले. 
       ग्रामीण जीवनाचे उभे आडवे ताणेबाणे प्रथमच त्यातील छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात कथेच्या रुपाने त्यांनी साकारले आहेत. त्यांच्या कथेत कणखर सकसता, आजच्या आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत, बदलत्या वास्तवाचे भान, सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता, दैनंदिन जीवनातील शासंक भीती, यांत्रीक जीवनातील कृत्रीमता, संस्काराची न पुसली जाणारी वलये, वास्तवाची निदान करणारी शोधदृष्टी आणि तरल भावस्पर्शी संवेदनांची वीण आहे. त्यामुळे 'सांगावा' म्हणजे समकालीन ग्रामीण साहित्यामध्ये मोलाचा ठेवा ठरावा अशी कलाकृती आहे.
         सचिन पाटील एका सामान्य कुटूंबात जन्माला आले, शिक्षण आणि विदग्ध साहित्य यांची कुठलीही पूर्वपरंपरा नसतानाही जिद्द आणि अथक परिश्रमाने त्यांनी आपली लेखणी चालवली. त्यातूनच कथा साकारत गेली. ती समर्थ आहे भविष्यात ती सशक्त होईल असा विश्वास वाटतो. त्यांच्या भविष्यकालीन लेखणास मन:पूर्वक शुभेच्छा..! 

(महाराष्ट्र साहित्य परिषद लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०११)

- प्रा. राजा माळगी मराठी विभाग प्रमुख कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर. मोबा. 9421711367


कथासंग्रह : सांगावा(दुसरी आवृत्ती) लेखक : सचिन वसंत पाटील प्रकाशन : गवळी प्रकाशन इस्लामपूर पृष्ठे : १४८ किंमत : २२० रूपये सवलतीत १०० रूपये संपर्क ८२७५३७७०४९. २३:३८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२३:३८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२३:३८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२३:३८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)सचिन वसंत पाटील (चर्चा) २३:३८, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)


     सांगावा:तिसरी आवृत्ती 
           ✍️सचिन वसंत पाटील. 
     कोणत्याही पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणे ही बाब लेखक म्हणून कुणाही लेखकास अतिशय आनंद देणारी व अभिमानाची असते. तशाच काहीशा संमिश्र भावना 'सांगावा'ची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मनोदय प्रकाशक राजेंद्र गवळी यांनी व्यक्त केल्यानंतर माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत. मागे वळून पाहताना आश्चर्य वाटते, सात वर्षांत तीन आवृत्ती ही अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. 
      'अवकाळी विळखा' या कथासंग्रहामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना मांडणारा लेखक अशी ओळख निर्माण झाली पण 'सांगावा' मुळे लेखक असण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, तो आजतागायत कायम आहे. आजही माझे सगळे लेखन वाचणारा एखादा वाचक मित्र भेटतो त्यावेळी म्हणतो," 'सांगावा' ची मजा तुझ्या दुसर्‍या पुस्तकात नाही रे..!" त्यावेळी मित्रांनो मी भरून पावतो. मग गवळींनी घेतलेला तिसऱ्या आवृत्तीचा निर्णय योग्य आहे असं वाटतं. 
      जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे सरांनी वेळात वेळ काढून प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल व जेष्ठ साहित्यिक समिक्षक डॉ. सयाजीराजे मोकाशी सरांनी मलपृष्ठावरील मजकूर तत्परतेने पाठविला त्याबद्दल त्यांचे शतश: आभार. गवळी प्रकाशनानेही ही आवृत्ती प्रकाशित करण्याचे मनावर घेतले व आपणासारख्या जाणकार वाचकांच्या पाठबळामुळेच नेहमी लेखनीस बळ मिळते... खूप खूप आभार सर्वांचे..!

- सचिन वसंत पाटील भ्रमणध्वनी ८२७५३७७०४९