Jump to content

सदस्य:श्वेता शिवाजीराव परुळेकर/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेट https://mr.wikipedia.org/s/1tl Jump to navigationJump to search हा लेख १४ मे, २०१८ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता. क्रिकेट Pollock to Hussey.jpg गोलंदाज शॉन पोलॉक व फलंदाज मायकल हसी. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे. सर्वोच्च संघटना आयसीसी उपनाव द जंटलमन्स गेम ("The Gentleman's game") सुरवात १८ वे शतक माहिती संघ सदस्य ११ खेळाडू संघागणिक बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी मिश्र हो, वेगळ्या स्पर्धा वर्गीकरण सांघिक, चेंडूफळी साधन क्रिकेट चेंडू, क्रिकेट बॅट, यष्टी मैदान क्रिकेट मैदान ऑलिंपिक १९०० उन्हाळी ऑलिंपिक केवळ क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने टाकतो.


अनुक्रमणिका १ फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती २ धावा मिळवण्याच्या पद्धती ३ व्युत्पत्ती ४ इतिहास ५ नियम आणि खेळ ५.१ खेळाचे स्वरुप ५.२ धावपट्टी, यष्टी आणि क्रिस ५.२.१ खेळण्याची जागा ५.२.२ यष्टी, बेल्स आणि क्रिस ५.३ बॅट आणि चेंडू ५.४ पंच आणि स्कोअरकिपर ५.५ डाव ५.६ षटके ५.७ संघ रचना ५.८ गोलंदाजी ५.९ क्षेत्ररक्षण ५.१० फलंदाजी ५.११ धावा ५.१२ अतिरिक्त धावा ५.१३ बाद ५.१४ डावाचा शेवट ५.१५ निकाल ६ क्रिकेट सामन्यांचे प्रकार ६.१ कसोटी क्रिकेट ६.२ मर्यादित षटके ६.३ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ६.४ क्लब क्रिकेट ६.५ सामन्यांचे इतर प्रकारp ७ आंतरराष्ट्रीय रचना ७.१ सदस्य ७.१.१ संपूर्ण सदस्य ७.१.२ अव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्य ८ विविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट ९ आकडेवारी ९.१ धावफलक १० संस्कृती १०.१ दैनंदिन जीवनावरील प्रभाव १०.२ कला आणि लोकप्रिय संस्कृती मध्ये १०.३ इतर खेळांवरील प्रभाव ११ क्रिकेटमधील विक्रम १२ हेसुद्धा पहा १३ मॅच फिक्सिंग १४ संदर्भ आणि नोंदी १५ संदर्भ ग्रंथाची यादी १६ बाह्यदुवे फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती त्रिफळाचीत : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो.. पायचीत : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो. झेलबाद : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो. धावचीत : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला धावचीत असे म्हणतात. धावा मिळवण्याच्या पद्धती धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून सीमारेषेपार करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला पोहोचून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला धावचीत असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन पंच पार पाडतात.

क्रिकेटचे कायदे करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे ट्वेंटी२० (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते कसोटी क्रिकेट (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपूर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरुन खेळले जाते, परंतू मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणार्‍या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी कॉर्क पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात. क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १०० हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणार्‍या, महिला क्रिकेटने सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.

व्युत्पत्ती "क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्त्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला creckett म्हटले जात असे.[१] जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्त्रोत आहे, cricc किंवा cryce म्हणजेच crutch किंवा काठी.[२] प्रसिद्ध लेखक सॅम्युएल जॉन्सनच्या शब्दकोशामध्ये, त्याने "cryce, Saxon, a stick" वरुन क्रिकेट हा शब्द तयार केला.[३] जून्या फ्रेंच भाषेत, criquet ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.[२] दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा बूर्गान्यच्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लँडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरुन, असे दिसते की हे नाव मिडल डच वरुन घेण्यात आले असावे[४] krick(-e), म्हणजे बाक असलेली काठी.[२] आणखी एक संभाव्य स्त्रोत म्हणजे मिडल डच शब्द krickstoel, म्हणजे चर्च मध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचा स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पुर्वी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.[५] बॉन विद्यापीठातील युरोपीय भाषांचे तज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकी साठी वापरला जाणारा वाक्प्रचार met de (krik ket)sen (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरुन "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.[६] डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.[७]

इतिहास मुख्य पान: क्रिकेटचा इतिहास क्रिकेटची सुरवात १३०१ च्या सुरवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५०च्या सुमारास creckettचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी फ्री स्कूल ऑग गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at creckett and other plaies."[३][८]


फ्रान्सिस कोटेस, द यंग क्रिकेटर, १७६८ क्रिकेट हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतू १६११ मधील काही संदर्भ[३] असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.[९] १६२४ मध्ये, जॅस्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.[१०] १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारुपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जावू लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्स मध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जूना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.[११]

१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वत:चे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६०च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी उत्क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणार्‍या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टीक"च्या आकाराच्या बॅट ऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये हॅम्ब्लेडॉन क्लबची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये मेरीलिबॉन क्रिकेट क्लब (MCC) ची निर्मिती व जुने लॉर्ड्स मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्र बिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमांचा पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचीतचा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.


परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणार्‍या जहाजावर, १८५९ १९व्या शतकात अंडरआर्म गोलंदाजीची जागा आधी राउंडआर्म आणि नंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काउंटी स्तरावरच्या खेळ संघटना काउंटी क्लब तयार करु लागल्या आणि १८३९ मध्ये ससेक्सची स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली. त्याचदरम्यान ब्रिटीश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौर्‍यावर गेला.

परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काउंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..[१२] १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दिर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरवात १८६५ मध्ये केली.


कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. १८७६-७७ मध्ये, इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली द ॲशेसला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरवात केली.

पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "गोल्डन एज ऑफ क्रिकेट" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतू ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काउंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.

युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन, आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसर्‍या जगातिक महायुद्धाआधी वेस्ट इंडीज, भारत आणि न्यूझीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान, [श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि बांगलादेश ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.

१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काउंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

हॉकी आणि फुटबॉल सारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतू क्रिकेट हा मुख्यत: एके काळी ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पुर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटीशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मुळ धरु शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे स्थित ब्रिटीशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणार्‍या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.

नियम आणि खेळ मुख्य पान: क्रिकेटचे नियम क्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ आहे.[१३][१४] एक संघ धावा करण्याचा प्रयत्नात फलंदाजी करतो, तर दुसरा संघ गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबतच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवतो. प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेटच्या काही प्रकारांमध्ये, सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे गरजेचे असे, अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो.

खेळाचे स्वरुप क्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला डाव (innings) असे म्हणतात. सामन्याच्या आधीच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत. डावा दरम्यान एक संघ क्षेत्ररक्षण करतो आणि दुसरा फलंदाजी. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अदलाबदली करतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात, परंतू फलंदाजी करणार्‍या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर असतात. फलंदाजीची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरु होण्याच्या अगदी सुरवातीला जाहीर केली जाते, परंतू ती पून्हा बदलली जावू शकते.

सामना सुरु होण्या आधी एका संघाचा कर्णधार (जो स्वत: सुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो) नाणेफेक करतो, नाणेफेक जिंकणारा कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असतो.

क्रिकेटचे मैदान हे बहुदा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. मैदानाच्या मधोमध आयताकृती खेळपट्टी असते. खेळाच्या मैदानाच्या कडा सीमारेषेने अंकित केलेल्या असतात. ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टँडचा भाग, एक दोर किंवा रंगवलेली रेषा असते

खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना लाकडी लक्ष्य असते ज्याला यष्टी असे म्हणतात; दोन टोकांच्या यष्ट्यांमध्ये २२ यार्ड (२० मी)चे अंतर असते. खेळपट्टी रंगवलेल्या रेषांनी अंकित केलेली असते: यष्ट्यांच्या रेषेत गोलंदाजी क्रिस, आणि त्याच्यापुढे चार फुटांवर (१२२ सेंमी) फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिस. यष्ट्यांच्या संचामध्ये तीन उभ्या यष्टी आणि त्यावर दोन लहान आडव्या बेल्स असतात. कमीत कमी एक बेल पडल्यानंतर किंवा एखादी यष्टी पडल्यानंतर (बहुतेकदा चेंडूमुळे, किंवा फलंदाजाचा हात, कपडे किंवा एखादी गोष्ट लागून) गडी बाद होतो. परंतू चेंडू लागूनही जर बेल किंवा यष्टी पडली नाही तर तो बाद ठरवला जात नाही.

कोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे (यष्ट्यांचे) मालकत्व करत असतो (तो ज्या यष्ट्यांच्या जवळ असेल त्या) आणि प्रत्यक्षात फलंदाजी करताना सोडून, जेव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आत असताना मैदानाला टेकलेली असते. जर तो त्याच्या क्रिसच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना त्याच्याकडील यष्ट्या पडल्या तर तो बाद होतो, परंतू दुसरा फलंदाज सुरक्षित असतो.[१५]

Muralitharan bowling to Adam Gilchrist.jpg123456778910111212 1 पंच 2 यष्टी 3 नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज 4 गोलंदाज 5 चेंडू 6 खेळपट्टी 7 क्रीस 8 स्ट्रायकिंग फलंदाज 9 यष्टी 10 यष्टिरक्षक 11 पहिली स्लीप 12 परतीचे क्रीस दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिसच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रीसमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.

क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.

मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रीसच्या बाजूला स्क्वेयर लेगजवळ दुसरा.

दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिसच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रीसमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.

क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.

मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रीसच्या बाजूला स्क्वेयर लेगजवळ दुसरा. गोलंदाज सहसा यष्ट्यांच्या काही यार्ड (मीटर) मागे जातो, पुन्हा यष्ट्यांकडे धावत येतो (ह्याला रन-अप म्हणतात) आणि गोलंदाजी क्रीस मध्ये पोहोचल्यावर हात वर करुन (ओव्हर आर्म) चेंडू सोडतो करतो. (चेंडू सोडण्याआधी जर तो क्रीसच्या पुढे गेला, किंवा कोपरातून हात जास्त वाकवला, तर तो चेंडू नो बॉल ठरवला जातो, अशा चेंडूवर फलंदाज बाद होत नाही आणि फलंदाजी करणार्‍या संघअला एक अतिरिक्त धाव मिळते. जर चेंडू यष्ट्यांच्या फलंदाजाच्या समोरुन तो जिथे पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे खूप दूरुन किंवा फलंदाजाच्या अगदी मागून किंवा फलंदाजाच्या डोक्यावरुन यष्ट्यांच्या पलिकडे गेल्यास त्याला वाईड म्हटले जाते, आणि फलंदाजी करणार्‍या संघाला एक अतिरिक्त धाव दिली जाते.) चेंडू अशा प्रकारे टाकला जातो, ज्यायोगे तो खेळपट्टीवर टप्पा घेईल किंवा अगदी क्रीस मध्ये टप्पा पडेल अशा बेताने (यॉर्कर), किंवा टप्पा न पडता क्रीसच्या पलिकडे जाईल (फुल टॉस), अशा प्रकारे चेंडू टाकला जावू शकतो.

नो बॉल किंवा वाईड हे चेंडू षटकातील सहा चेंडूंमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.

चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवणे आणि बॅटने टोलवण्याचा प्रयत्न फलंदाज करतो. (ह्या मध्ये बॅटचे हँडल किंवा दांडा आणि ग्लोव्हजचा समावेश असतो.) जर गोलंदाज, यष्ट्या उखडण्यात यशस्वी झाला तर फलंदाज बाद होतो आणि त्याला त्रिफळाचीत असे म्हणतात. जर फलंदाजाला बॅटने चेंडू अडवता आला नाही, परंतू जर शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा अडथळा निर्माण होऊन, चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून अडवला गेला तर फलंदाज पायचीत, किंवा "एलबीडब्लू" म्हणून बाद होवू शकतो.

जर फलंदाजाने चेंडू व्यवस्थित टोलावला आणि चेंडूचा टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने तो थेट झेलला तर फलंदाज झेलबाद होतो. जर चेंडू गोलंदाजाचेच झेलला तर त्यास कॉट अँड बोल्ड म्हणतात; तर यष्टीरक्षकाने झेलला तर, कॉट बिहाईंड किंवा यष्ट्यांमागे झेलबाद असे म्हणतात.

जर फलंदाज चेंडू टोलवण्यात यशस्वी झाला आणि त्याचा झेल घेतला गेला नाही, तर दोन्ही फलंदाज मिळून त्यांच्या संघासाठी धावा जमावण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या लांबीइतके धावून आपापल्या जागा बदलतात आणि विरुद्ध क्रीसच्या आत आपल्या बॅट टेकवतात. दोन्ही फलंदाजांनी यशस्वीपणे आपले स्थान बदलून, क्रीसच्या आत बॅट मैदानाला टेकवल्यानंतर एक धाव मिळते. फलंदाज एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करु शकतो तसेच तो एकही धाव न काढण्याचा पर्यायही स्वीकारु शकतो. धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याचा धोका असतो. जर क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने चेंडू पकडून फलंदाजी करणारे फलंदाज क्रिसच्या आत येण्याआधी यष्ट्या उध्वस्त करण्यात यश मिळवले, तर फलंदज धावचीत होतो. काही वेळा फलंदाज धावायला सुरवात करतात, आणि विचार बदलून पुन्हा मूळ जागी परतू शकतात.

जर फलंदाजाने टोलावलेला चेंडू टप्पा न पडता थेट सीमारेषेपार गेला तर त्याला षट्कार म्हणतात, आणि फलंदाजी करणार्‍या संघाच्या खात्यात सहा धावा जमा होतात. जर चेंडू मैदानाला स्पर्श करुन सीमारेषेपार गेला तर त्याला चौकार म्हणतात, ज्याबद्दल फलंदाजाला चार धावा मिळतात. अशा वेळी चेंडू सीमारेषेपार जाण्याआधी फलंदाजाने धावण्यास सुरवात केलेली असू शकते, परंतू चेंडू सीमारेषेपार गेल्याने, त्या धावा मोजल्या जात नाहीत.

फलंदाजा चेंडू टोलावू शकला नाही तरीही तो अतिरिक्त धावांसाठी प्रयत्न करु शकतो : त्याला बाय म्हणतात. जर चेंडू त्याच्या अंगाला लागून गेला तर त्याला लेग बाय म्हणतात.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज टोलावू शकला नाही आणि जर तो त्याच्या क्रीसच्या बाहेर आला, तर यष्टिरक्षक चेंडू पकडून यष्टी उडवू शकतो, त्यास यष्टीचीत असे म्हणतात.

नो बॉल खेळून फलंदाज दंडापेक्षा अधिक धावा वसूल करण्याचा पर्याय निवडू शकतो. जर त्याने असे केले तर तो केवळ धावचीत बाद होवू शकतो.

फलंदाजाने धावा मिळवणे थांबविल्यानंतर चेंडू मृत होतो, आणि तो गोलंदाजाकडे गोलंदाजीसाठी पून्हा दिला जातो. जेव्हा तो रन अप घेण्यास चालू करतो तेव्हाच चेंडू पून्हा जिवंत झाला असे मानले जाते. फलंदाजांनी आपल्या जागा बदलल्या तरीही षटक पूर्ण होईपर्यंत गोलंदाज एकाच बाजूला गोलंदाजी करु शकतो.[१६]

फलंदाज बाद न होता, त्याच्या डावामधून स्वतःच्या इच्छेने निवृत्त होवू शकतो.

बाद झालेल्या फलंदाज तात्काळ मैदानातून बाहेर जातो, आणि त्याची जागा त्याच्याच संघातील दुसरा फलंदाज घेतो. मात्र, यष्ट्या पडल्या किंवा झेल घेतला गेला, तरीही फलंदाज प्रत्यक्षात तो पर्यंत बाद होत नाही जो पर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे निर्णयासाठी दाद मागत नाही. पंचांकडे दाद मागण्यासाठी गोलंदाज परंपरागत "How's that" (हाऊज दॅट) किंवा "Howzat" (हाऊझॅट) म्हणून दाद मागतात. (अनेकदा जरी फलंदाज अपीलाची गरज न वाटता मैदानातून निघून जातात). काही सामन्यांमध्ये, विशेषत: कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ डीआरएस वापरून तिसर्‍या पंचाकडे दाद मागण्याची विनंती करतात, ज्यामध्ये टीव्ही रिप्ले तसेच हॉक-आय, हॉट-स्पॉट आणि स्निकोमीटर ह्या घटकांचा समावेश होतो.

गोलंदाजाने सहा वेळा चेंडू फेकल्यानंतर त्याचे षटक पूर्ण होते, त्याच्या जागी त्याच्या संघातील दुसरा नियुक्त गोलंदाज गोलंदाजी करतो, आणि आधीचा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे स्थान घेतो. फलंदाज आपल्याच स्थानावर राहतात, आणि नवीन गोलंदाज दुसर्‍या बाजूने गोलंदाजी करण्यात सुरवात करतो, त्यामुळे स्ट्रायकर आणि नॉन-स्ट्रायकर यांच्या भूमिका विरुद्ध होतात. यष्टीरक्षक आणि दोन्ही पंच नेहमी आपली स्थाने बदलतात आणि अनेक क्षेत्ररक्षकसुद्धा तसे करतात आणि खेळ पुढे सुरु राहतो. एका डावात गोलंदाज एकापेक्षा जास्त षटके टाकू शकतो, परंतू त्याला दोन षटके सलग टाकण्याची मुभा नसते.

डाव तेव्हा संपतो जेव्हा फलंदाज करणार्‍या संघाचे ११ पैकी १० फलंदाज बाद होतात (सर्वबाद – एक फलंदाज मात्र नेहमी "नाबाद" राहतो), किंवा निर्धारित षटके खेळून पूर्ण होतात, किंवा फलंदाजी करणारा संघ त्यांचा डाव पुरेशा धावा असल्याने घोषित करतो.

सामन्याच्या स्वरुपावरुन डाव आणि षटकांची संख्या ठरते. मर्यादित षटके नसलेल्या सामन्यात पंच, ठराविक वेळेपर्यंत सामना चालू ठेवण्या ऐवजी (दुसर्‍या संघाने वेळ वाया घालवू नये साठी) दिवसाच्या शेवटच्या सत्रात किती षटके टाकली जावे हे ठरवतात.

सर्व डाव पूर्ण झाल्यानंतर सामना संपतो. अपुर्‍या सुर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे पंच एखादा सामना थांबवू शकतात. परंतू सहसा सामना तेव्हा संपतो जेव्हा एक संघ त्याचा एक किंवा दोन्ही डाव पूर्ण करतो, आणि दुसर्‍या संघाकडे त्यांच्यापेक्षा जास्त धावा असतात. चार-डावांच्या सामन्यामध्ये शेवटच्या संघाला कधीकधी दुसरा डाव खेळण्याचीही गरज नसते, तेव्हा सदर संघाने डावाने विजय मिळवला असे म्हणतात. जर विजेत्या संघाचा डाव पूर्ण झाला नसेल, आणि अजूनही उदाहरणार्थ पाच फलंदाज नाबाद आहेत किंवा त्यांनी फलंदाजीच केलेली नाही तर असा संघ "पाच गडी राखून विजयी" मानला जातो. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला आणि दुसर्‍या संघापेक्षा ५० धावा कमी करु शकला, तर विजेता संघ "५० धावांनी विजयी" झाला असे म्हटले जाते. दोन्ही संघांनचे डाव पूर्ण झाले आणि त्यांच्या धावा सुद्धा समान असतील तर अशा दुर्मिळ वेळी बरोबरी झाली असे म्हणतात.

जे सामने मर्यादित षटकांचे नसतात, ते सामने अनिर्णित राहण्याचीही शक्यता असते. सहसा सामन्याची वेळ संपते परंतू कमी धावा असलेल्या संघाचे काही फलंदाज बाद होणे अजूनही बाकी असते तेव्हा सामना अनिर्णितावस्थेत संपतो. ह्याचा सरळ प्रभाव पडतो तो संघांच्या डावपेचांवर. जेव्हा संघाने पुरेशा धावा जमवलेल्या असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे अशी आशा असते, तेव्हा तो संघ डाव घोषित करतो. त्यांना सामना अनिर्णित होणे टाळायचे असते. परंतू ह्यामध्ये दुसरा संघ पुरेशा धावा करुन विजय मिळवण्याचा धोकासुद्धा असतो.

धावपट्टी, यष्टी आणि क्रिस मुख्य पाने: खेळपट्टी, विकेट, व पॉपिंग क्रीस हेही बघा: यष्टी (क्रिकेट)आणि बेल्स (क्रिकेट) खेळण्याची जागा

क्रिकेट मैदानाचा नमुना. क्रिकेटचा खेळ गवताळ क्रिकेट मैदानावर खेळला जातो.[१७] क्रिकेटच्या नियमांमध्ये मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत,[१८] परंतू, सहसा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी खेळपट्टी म्हणून ओळखली जाते.[१७]

खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग १० फूट (३.० मी) रुंद असतो. खेळपट्टीवर असलेले लहान गवत जसजसा सामना पुढे जातो तसतसे कमी होत जाते. त्याच प्रमाणे क्रिकेट मॅट सारख्या कृत्रिम पृष्ठभागावर सुद्धा खेळले जावू शकते. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना, २२ यार्ड (२० मी) अंतरावर, लाकडी लक्ष्य ठेवलेले असते, ज्याला विकेट असे म्हणतात. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघासाठी हे एक लक्ष्य असते आणि फलंदाजी करणारा संघ, धावा जमवण्यासाठी विकेटचे रक्षण करतो.

यष्टी, बेल्स आणि क्रिस

तीन यष्ट्या असलेली विकेट. ही मैदानामध्ये ठोकली जाते आणि त्याच्या वरती दोन बेल्स ठेवल्या जातात. खेळपट्टीवरील प्रत्येक विकेटमध्ये एका सरळ रेषेत उभ्या केलेल्या तीन लाकडी यष्ट्यांचा समावेश असतो. त्यांच्या डोक्यावरती दोन लाकडी बेल्स ठेवल्या जातात; बेल्स धरुन विकेटची एकूण उंची २८.५ इंच (७२० मिमी) असते आणि तीन यष्ट्यांची, त्यांच्या मधील छोटी जागा धरुन एकूण रुंदी असते ९ इंच (२३० मिमी).

दोन्ही बाजूच्या विकेटच्या सभोवती चार रेघांनी आखलेल्या क्षेत्राला क्रीस असे म्हणतात, हे फलंदाजासाठी "सुरक्षित क्षेत्र" असते आणि ते गोलंदाजीची मर्यादा निश्चित करते. ह्यांना "पॉपिंग" (किंवा फलंदाजी) क्रीस, गोलंदाजी क्रीस आणि दोन "परतीचे (रिटर्न)" क्रिस असे म्हणतात.

यष्ट्या गोलंदाजी क्रीसच्या रेषेत अशा प्रकारे ठेवलेल्या असतात ज्यायोगे दोन टोकांच्या गोलंदाजी क्रीसमधील अंतर २२ यार्ड (२० मी) असेल. गोलंदाजी क्रीज ८ फूट ८ इंच (२.६४ मी) लांब असते, आणि मधली यष्टी अगदी मधोमध उभा केलेला असतो. पॉपिंग क्रीसची लांबीसुद्धा तितकीच असते, आणि ती गोलंदजी क्रीसला समांतर आणि यष्ट्यांच्या समोर ४ फूट (१.२ मी) अंतरावर आखलेली असते. परतीची किंवा रिटर्न क्रीस इतर दोन क्रीसच्या काटकोनात असते; त्या पॉपिंग क्रीजच्या दोन्ही शेवटाला चिकटून असतात आणि गोलंदाजी क्रीसच्या टोकांना जोडून कमीत ८ फूट (२.४ मी) मापाच्या असतात.

गोलंदाजीवेळी चेंडू सोडताना गोलंदाचा मागचा पाय दोन क्रीसच्या मध्ये आणि पुढच्या पायाचा किमान थोडासा भाग पॉपिंग क्रीसच्या आत असणे गरजेचे असते. गोलंदाजाने हा नियम मोडल्यास पंच तो चेंडू "नो बॉल" ठरवतात, आणि फलंदाजी संघाला एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त चेंडू बहाल केला जातो.

फलंदाजाच्या दृष्टीने पॉपिंग क्रीसचे महत्त्व असे आहे की, त्यामुळे त्याच्या सुरक्षित क्षेत्राची मर्यादा स्पष्ट होते. तो त्याच्या "क्रीस बाहेर" असल्यास यष्टिचीत किंवा धावचीत होवू शकतो.

बॅट आणि चेंडू मुख्य पाने: क्रिकेट बॅट व क्रिकेट चेंडू Used white ball वापरलेला लाल चेंडू वापरलेला गुलाबी चेंडू तीन भिन्न प्रकारचे क्रिकेट चेंडू: वापरलेला सफेद चेंडू. सफेद चेंडू मुख्यत्वे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वापरला जातो, विशेषतः सामने प्रकाशझोतात रात्री खेळवले जातात तेव्हा. (डावीकडे). वापरलेला लाल चेंडू. लाल चेंडू कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेट आणि इतर काही क्रिकेट प्रकारांमध्ये वापरला जातो. (मध्य). वापरलेला गुलाबी चेंडू. गुलाबी चेंडू अलिकडच्या काळात प्रकाशझोतात खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांसाठी वापरला जावू लागला आले. (उजवीकडे). तीनही चेंडू सारख्याच आकाराचे आहेत. खेळाचे मुख्य सार आहे, गोलंदाज खेळपट्टीवरील त्याच्या बाजूने दुसर्‍या बाजूला बॅट घेवून "स्ट्राईकवर" असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करतो.

बॅट ही (सहसा सफेद विलो वृक्षाच्या) लाकडापासून बनवली जाते आणि ज्याचा आकार वर गोलाकार दांडा जोडलेल्या पात्यासारखा असतो. पात्याची रुंदी कमाल ४.२५ इंच (१०८ मिमी) इतकी तर एकूण लांबी कमाल ३८ इंच (९७० मिमी) इतकी असते.

चेंडू हा शिवण असलेला जाड कातड्याचा आणि गोलाकार असतो, ज्याचा घेर ९ इंच (२३० मिमी) इतका असतो. ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पर्यंत वेग असलेल्या चेंडूच्या टणकपणा हा चिंतेचा विषय असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी फलंदाज विविध संरक्षक साधने वापरतात, जसे पॅड्स (नडगी आणि गुडघे यांच्या संरक्षणासाठी), फलंदाजी ग्लोव्हज् हातांसाठी, हेल्मेट डोक्याच्या संरक्षणासाठी आणि बॉक्स पँटच्या आतमध्ये (गुप्त भागाच्या संरक्षणासाठी). काही फलंदाज शर्ट आणि पँटच्या आतमध्ये जास्तीचे पॅड्स वापरतात जसे मांडीचे पॅड्स, हाताचे पॅड्स, बरगडी रक्षक आणि खांद्याचे पॅड्स. चेंडूला "शिवण" असते: चेंडूचे कातडी आवरण, दोरी आणि आतील कॉर्कला जोडण्यासाठी टाक्यांच्या सहा ओळी असतात. नवीन चेंडूवरील शिवण ही व्यवस्थित दिसते त्यामुळे जास्त अंदाज येवू न देता चेंडू पुढे टाकण्यास गोलंदाजाला मदत होते. क्रिकेट सामना सुरु असताता, चेंडूची गुणवत्ता इतकी खालावत जाते की एका क्षणी तो न वापरता येण्याजोगासुद्धा होतो आणि ह्या दरम्यान चेंडूची हालचाल बदलत जाते, आणि त्याचा प्रभाव सामन्यावर पडतो. त्यामुळे खेळाडू चेंडूचे भौतिक गुणधर्म बदलून त्याचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला लकाकी आणणे आणि घामाने किंवा थुंकीने तो ओला करणे वैध आहे. कधी कधी चेंडू स्विंग करण्यासाठी जाणूनबुजून एकाच बाजूला लकाकी सुद्धा आणता येते, परंतू चेंडूवर आणखी कोणती गोष्ट घासणे, चेंडूच्या आवरणावर ओरखाडणे किंवा चेंडूची शिवण उसवणे हे अवैध आहे.

पंच आणि स्कोअरकिपर मुख्य पाने: पंच (क्रिकेट) व स्कोअरकीपर

पंच मैदानावरील खेळाच्या नियमनाची कामगिरी दोन पंच पाहतात. त्यामधील एक गोलंदाजी टोकाकडे विकेटच्या मागे उभा राहतो, आणि दुसरा "स्क्वेअर लेग" स्थानावर उभा असतो, हे स्थान "स्ट्राईक"वर असलेल्या फलंदाजाच्या १५-२० मीटरवर असते. पंचांचे मुख्य काम असते ते विविध बाबींवर निर्णय देण्याचे. जसे चेंडू योग्य रितीने टाकला गेला आहे का (तो नो किंवा वाईड नाही), जेव्हा धाव काढली जाते, आणि फलंदाज बाद झाला आहे की नाही (ह्यासाठी क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने पंचांकडे सहसा हाऊज दॅट म्हणून अपील करणे गरजेचे असते). मध्यांतर केव्हा होईल हे सुद्धा पंच निश्चित करतात. तसेच खेळण्यासाठी परिस्थिती योग्य आहे किंवा नाही आणि खेळाडूंसाठी ओलसर खेळपट्टी किंवा अपुरा सुर्यप्रकाश ह्या सारख्या घातक परिस्थितीमध्ये खेळ थांबवणे किंवा रद्द करणे हे सुद्धा पंचांच्या हातात असते.

मैदानाबाहेर आणि ज्या सामन्यांचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण होते, त्या सामन्यांमध्ये सहसा तिसरे पंच असतात. ज्या निर्णयांसाठी ध्वनीचित्रफितीच्या (व्हिडीओ) पुराव्याची गरज असते अशा वेळी ते निर्णय घेतात. संपूर्ण आयसीसी सदस्य असलेल्या दोन संघांमधील आंतरराष्ट्रीय कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात तिसरे पंच असणे अनिवार्य आहे. ह्या सामन्यांमध्ये सामनाधिकारीसुद्धा असतात. खेळ क्रिकेटच्या नियमांनुसार चालू आहे का हे पाहणे त्यांचे काम असते.

धावा आणि सामन्याच्या इतर तपशीलाची माहिती ठेवणे, हे दोन अधिकृत (प्रत्येक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एक) स्कोअरकीपरचे काम असते. पंचांनी हातांनी केलेल्या निर्देशांनुसार स्कोअरकीपर आपले काम करतात. जसे पंच तर्जनी वर करून फलंदाज बाद असल्याचे दर्शवतात; दोन्ही हात वर करुन ते फलंदाजाने षट्कार मारल्याचे दाखवतात. क्रिकेटच्या नियमांनुसार धावांच्या नोंदणीकरता स्कोअरकीपर असणे गरजेचे आहे; धावांच्या मोजणीशिवाय ते खेळा संबंधित लक्षणीय प्रमाणात अतिरिक्त तपशीलसुद्धा नोंदवतात.

डाव डाव (एक किंवा अनेक) ही फलंदाजी संघाच्या सामूहिक कामगिरीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.[१९] काहीवेळा फलंदाजी संघाचे सर्व अकरा सदस्य फलंदाजी करु शकतात, परंतू विविध कारणांमुळे ते सर्वच जण तसे करु शकत नाहीत. प्रत्येक संघ एक किंवा दोन डाव खेळेल हे सामन्याच्या प्रकारावरुन ठरते.

गोलंदाजाचे मुख्य लक्ष्य हे, क्षेत्ररक्षकांच्या मदतीने फलंदाजांना बाद करणे हे असते. फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा "आऊट" म्हणतात, म्हणजेच त्याला मैदाना सोडावे लागते आणि त्याची जागा त्याच्या संघातील दुसरा फलंदाज घेतो. जेव्हा सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद होतात, तेव्हा सर्व संघ बाद होतो आणि डाव संपतो. शेवटच्या बाद न झालेल्या फलंदाजाला, एकट्याने फलंदाजी चालू ठेवण्यास परवानगी नसते, त्यासाठी कमीत कमी दोन फलंदाज मैदानात असणे गरजेचे असते. ह्या फलंदाजाला "नाबाद" असे म्हणतात.

डाव लवकर संपण्याची तीन कारणे असू शकतात: फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव "घोषित" केल्यास, फलंदाजी संघाने त्यांचे लक्ष्य गाठून सामना जिंकल्यास, किंवा खराब हवामानामुळे किंवा वेळ संपल्याने सामना संपल्यास. ह्या सर्व परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन फलंदाज "नाबाद" राहून डाव संपतो. ह्याला अपवाद एकच, जेव्हा एखादा गडी बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर येण्याआधी डाव घोषित झाल्यास.

मर्यादित षटकांच्या सामन्यात, दोन फलंदाज "नाबाद" असतील, परंतू शेवटचे निर्धारित षटक टाकून झाले असल्यास डाव संपतो.

षटके मुख्य पान: षटक (क्रिकेट) गोलंदाज एकामागोमाग एक असा सहा वेळा चेंडू फेकतो, सहा चेंडूंच्या ह्या संचाला षटक असे म्हणतात. इंग्रजीमध्ये षटकाला Over असे म्हणतात कारण सहा चेंडू फेकून झाल्यानंतर पंच "Over!" असे म्हणतात. एक षटक पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने त्याच संघातील दुसरा गोलंदाज षटकाची सुरवात करतो, तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाजू सुद्धा बदलल्या जातात, परंतू फलंदाज आपापल्या जागीच राहतात. एकच गोलंदाज लागोपाठ दोन षटके टाकू शकत नाही, परंतू तो गोलंदाज एकाच बाजूने एक वगळून एक अशी अनेक षटके टाकू शकतो. षटक पूर्ण झाल्यानंतर फलंदाज आपली जागा बदलत नाही त्यामुळे पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकर फलंदाज आपोआप नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत जातो आणि तसेच उलटपक्षी होते. (कधीकधी दोघांपैकी एक फलंदाज दूसर्‍यापेक्षा फलंदाजीत बलशाली असतो, तेव्हा तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरुन तो पुढच्या षटकामध्ये "स्ट्राईक"वर राहू शकेल.) षटक संपल्यानंतर पंच सुद्धा आपल्या जागा बदलतात त्यामुळे स्क्वेअर लेग जवळील पंच आता नॉनस्ट्राईकरच्या टोकाला विकेटच्या मागे उभा राहतो आणि त्याची जागा नॉनस्ट्राईकरवरचा दुसरा पंच घेतो.

कसोटी क्रिकेट मध्ये एक गोलंदाज कितीही षटके टाकू शकतो तर मर्यादित षटकांच्या सामन्यात, प्रत्येक गोलंदाज टाकू शकणार्‍या षटकांवरसुद्धा मर्यादा असते.

संघ रचना प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. खेळाडूच्या प्राथमिक कौशल्यावरुन त्या खेळाडूला तज्ञ फलंदाज किंवा गोलंदाज म्हटले जाते. एका संतूलित संघात सहसा पाच किंवा सहा तज्ञ फलंदाज आणि चार किंवा पाच तज्ञ गोलंदाज असतात. क्षेत्रक्षणाच्या विशिष्ट आणि महत्त्वाच्या जागेमुळे प्रत्येक संघात एक तज्ञ यष्टिरक्षक असतो. प्रत्येक संघाचे नेतृत्व एक कर्णधार करतो. फलंदाजीची क्रमवारी निश्चित करणे, क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवणे, गोलंदाज बदलणे, खेळाची रणनीती ठरवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते.

जो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्हीत पारंगत असतो त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात. जो क्रिकेटपटू फलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये पारंगत असतो त्याला "यष्टिरक्षक फलंदाज", आणि काही वेळा अष्टपैलूसुद्धा म्हटले जाते. खरे अष्टपैलू अभावानेच आढळतात कारण बहुतेक खेळाडू हे एकतर फलंदाजी किंवा गोलदाजीवरच लक्ष केंद्रित करतात.

गोलंदाजी

पाकिस्तानचा तेजगती गोलंदाज शोएब अख्तर, ह्याच्या नावावर सर्वात जलद ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.[२०] मुख्य पान: गोलंदाजी गोलंदाज "धाव किंवा रन-अप" घेऊन आपल्या गोलंदाजी क्रीस पर्यंत पोहोचतो. काही गोलंदाज अगदी मंद गतीने गोलंदाजी करतात त्यामुळे त्यांना चेंडूफेक करण्याआधी अगदी थोडे अंतर धावावे लागते. तेज गोलंदाजांना चेंडू वेगाने टाकण्यासाठी जास्त मोठी आणि जोरात धाव घ्यावी लागते.

सहसा गोलंदाज चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी पॉपिंग क्रिझच्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला नो-बॉल म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला वाईड चेंडू म्हणतात. वाईड अथवा नो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.

गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो.

तेजगती गोलंदाज ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करतात आणि काही वेळा ते फलंदाजाला पराभूत करण्यासाठी केवळ वेगावर अवलंबून राहतात, कारण वेगाने आलेल्या चेंडूला प्रतिसाद देण्यासाठी फलंदाकडे फारच कमी वेळ असतो. तर काही तेजगती गोलंदाज वेळ आणि कपट या दोहोंचे मिश्रण करत गोलंदाजी करतात. काही गोलंदाज चेंडू हवेत वळविण्यासाठी (स्विंग) चेंडूच्या शिवणीचा वापर करतात. ह्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला फसवून चेंडू टोलवण्याच्या टायमिंग मध्ये गल्लत करण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या किंवा स्लीप मधील फलंदाजाच्या हातात जावू शकतो किंवा यष्ट्यांवर आदळून फलंदाज बाद होवू शकतो.

दुसर्‍या प्रकारच्या गोलंदाजीला "फिरकी" गोलंदाजी म्हणतात. ज्यामध्ये गोलंदाज तुलनेने कमी वेगात गोलंदाजी करतो आणि चेंडू वळवून गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला अशा गोलंदाजीपासून खूप सावध राहावे लागते कारण सहसा असे चेंडू बरेचदा त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीत आणि तो जाळ्यात अडकून बाद होण्याची शक्यता असते.

जलद आणि फिरकी गोलंदाजांच्या मध्ये असतात ते "मध्यमगती गोलंदाज" जे सक्तीने अचूकतेवर अवलंबून असतात. धावांच्या गतीला चाप बसवणे आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा ह्यांचा मुख्य हेतू असतो.

सर्व गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार विभागले जातात. क्रिकेटच्या परिभाषेप्रमाणेच ही वर्गवारीसुद्धा अतिशय गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे, गोलंदाज LF म्हणजेच डावखुरा जलदगती किंवा LBG म्हणजेच उजव्या हाताने "लेग ब्रेक" आणि "गुगली" टाकणारा गोलंदाज आहे असे म्हटले जाते.

गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही. जर गोलंदाजाने बेकायदेशीरपणे कोपर सरळ केले तर स्क्वेअर लेग जवळचे पंच तो चेंडू नो-बॉल ठरवू शकतात: ह्याला चेंडू "फेकणे" असे म्हणतात, आणि तो उघडकीस आणणे कठीण असते. सध्याच्या नियमांप्रमाणे गोलंदाज कोपर जास्तीत जास्त १५ अंश कोनात वाकवू शकतात.

क्षेत्ररक्षण मुख्य पान: क्षेत्ररक्षण (क्रिकेट)

उजखोर्‍या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षकांची स्थाने क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू एकत्रच मैदानावर उतरतात. त्यातील एक जण यष्टिरक्षक असतो जो स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या विकेटच्या मागे उभा राहतो. यष्टिरक्षण हे सहसा तज्ञाचे काम असते आणि त्याचे तो मुख्यत्वे फलंदाजाने न टोलवलेले चेंडू पकडतो, जेणे करुन बाईजमुळे अवांतर धावा जाणार नाहीत. तो खास बनवलेले ग्लोव्ह्ज वापरतो (क्षेत्ररक्षकांपैकी फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्ह्ज वापरु शकतो), गुप्त भागावर बॉक्स, आणि पायांवर पॅड्स वापरतो. तो एकमेव क्षेत्ररक्षक असा असतो जो फलंदाजाला यष्टिचीत करु शकतो.

सध्या गोलंदाजी करीत असलेल्या गोलंदाजाव्यतिरिक्त, इतर नऊ फलंदाज एका रणनीतीनुसार कर्णधार, मैदानावर विविध ठिकाणी उभे करतो.

क्षेत्ररक्षकांपैकी कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो तो त्याने ठरवलेल्या रणनीतीनुसार कोण (आणि कशी) गोलंदाजी करेल हे ठरवतो; आणि गोलंदाजाच्या सल्ल्यानुसार क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी लावण्याची जबाबदारी त्याचीच असते.

क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये, जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेण्याची परवानगी असते. सदर बदली खेळाडूला गोलंदाजी किंवा यष्टिरक्षण करण्याची मुभा नसते, तसेच तो कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाही. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी तंदरुस्त झाल्यास बदली खेळाडूला मैदान सोडावे लागते.

फलंदाजी मुख्य पान: फलंदाजी

इंग्लिश क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस १८८३ मध्ये फलंदाजीसाठी तयार होताना. त्याचे पॅड्स आणि बॅट हे आता वापरात असलेल्याशी जवळपास एकसारखे आहेत. ग्लोव्ह्जमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. बरेच नवे फलंदाज अनेक संरक्षक साधने वापरतात. कोणत्याही एका वेळी, मैदानावर दोन फलंदाज असतात. विकेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि धावा काढण्यासाठी एक फलंदाज स्ट्राईकवर असतो. त्याचा साथीदार, जेथून गोलंदाजी केली जाते तेथे नॉन-स्ट्राईकवर असतो.

अनिवार्य नसले तरीही, सहसा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने संघाचा कर्णधार फलंदाजीची क्रमवारी ठरवतो. ठरलेल्या क्रमवारीनुसर फलंदाज फलंदाजीस मैदानात उतरतात. पहिले दोन फलंदाज–"सलामीवीर"–सहसा नव्या ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रतिकूल चेंडूचा सामना करतात. संघातील सक्षम फलंदाज सहसा वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात, आणि संघातील गोलंदाज–जे विशेषत: कमी क्षमतेचे फलंदाज असतात (अपवाद वगळता)–शेवटी फलंदाजीस उतरतात. सुरवातीला जाहीर केलेली फलंदाजी क्रमवारी अनिवार्य नसते; जेव्हा गडी बाद होतो तेव्हा फलंदाजी न केलेला फलंदाज मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो.

जर फलंदाज "निवृत्त" झाला (सहसा दुखापतीमुळे) आणि पुन्हा फलंदाजीस उतरला नाही, तर तो "नाबाद" समजला जातो आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मोजला जात नाही, परंतू त्याचा डाव संपला असल्यामुळे तो बाद असतो. बदली फलंदाजाची परवानगी नसते.

एक तज्ञ फलंदाज अनेक "फटके" किंवा "स्ट्रोक" बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही परिस्थितीमध्ये वापरतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो बॅटच्या सपाट पृष्ठभागाने (ब्लेड) चेंडू व्यवस्थित टोलविणे. चेंडूने बॅटची कडा घेतली तर त्याला "edge" असे म्हणतात. फलंदाज नेहमीच चेंडू जोराने टोलावण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला फलंदाज मनगट वळवून आणि फक्त चेंडू अडवून अशा ठिकाणी दिशा देतो जेथे क्षेत्ररक्षक नसतील आणि धाव घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.


ऑस्ट्रेलियाचा फलंदाज व्हिक्टर ट्रंपर, ड्राइव्ह करण्यासाठी पुढे येताना क्रिकेटमध्ये फटक्यांची मोठी विविधता आहे. ज्या मध्ये स्विंग करण्याची शैली आणि दिशेनुसार अनेक नावे आहेत: उदा., "कट", "ड्राइव्ह", "हूक", "पुल".

जर चेंडू यष्ट्यांवर आदळणार नासे आणि धावा करण्याची सुद्धा संधी नसेल; अशा वेळी फलंदाजाला फटका खेळण्याची गरज नासते, तो चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यासाठी सोडून देवू शकतो. त्याच प्रमाणे, चेंडू बॅटवर लागल्यानंतर त्याने धाव काढण्याचा प्रयत्न करायलाच हवा असेही नाही. त्याप्रमाणे तो चेंडू अडविण्यासाठी त्याच्या पायाचासुद्धा वापर करु शकतो, परंतू हे धोकादायक सुद्धा होवू शकते कारण त्यामुळे फलंदाज पायचीत होण्याची शक्यता असते.

पूर्वी, फलंदाजाला दुखापत झाल्यास आणि तो धावा धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्यास, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचा कर्णधार फलंदाजाला धावक (रनर) घेण्यास परवानगी देवू शकत असे. क्षमता नसलेल्या फलंदाजाऐवजी धावा करणे हे धावकाचे एकमेव काम असे, आणि त्याला फलंदाजासारखाच वेश परिधान करणे आणि साधने वापरणे आवश्यक असे. ह्याचा गैरवापर होत आहे असे वाटल्या मुळे २०११ पासून आयसीसीने धावकाच्या वापरावर बंदी लादली.[२१]

धावा मुख्य पान: धाव (क्रिकेट)

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०००० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.[२२] कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फटका मारताना वरील चित्रात तो दिसत आहे. २०१० मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होता.

उजखोरा फलंदाज, फलंदाजी करताना चेंडू ज्या ठिकाणी टोलावण्याचा प्रयत्न करतो. डावखोर्‍या फलंदाजासाठी ह्याच चित्राचे प्रतिबिंब असेल. स्ट्राईकवर असलेला फलंदाज (म्हणजेच "स्ट्राइकर") चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवतो, आणि धावा करण्यासाठी चेंडू बॅटने अशा प्रकारे टोलवतो जेणे करुन क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत करण्याआधी त्याच्याकडे आणि त्याच्या साथीदाराकडे खेळपट्टीच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे धावण्यासाठी पुरेसा वेळ असेल. धावेची नोंद होण्यासाठी दोन्ही फलंदाजांच्या हातातील बॅट किंवा शरिराचा एखादा भाग क्रिसमध्ये असावा लागतो. (फलंदाज धावताना त्यांची बॅट घेऊनच धावतात). प्रत्येक पूर्ण धाव धावसंख्येमध्ये भर घालते.

चेंडू एकदा टोलवून एका पेक्षा जास्त धावा करणे शक्य असते: एक ते तीन धावांइतके फटके जास्त मारले जातात, परंतू मैदानाच्या आकारामुळे चार किंवा जास्त धावा करणे अवघड असते. ही उणीव भरुन काढण्यासाठी, चेंडू जमिनीला लागून किंवा टप्पे पडून सीमारेषेपर्यंत टोलवल्यास चार धावा (चौकार) दिल्या जातात आणि चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता सीमारेषेपार पोहोचल्यास सहा धावा (षट्कार) दिल्या जातात. ह्या वेळी फलंदाजांनी धाव घेणे गरजेचे नसते.


कसोटी आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज, ब्रायन लाराच्या नावावर आहे. पाच धावांचे फटके फार दूर्मिळ असतात, त्यासाठी सहसा क्षेत्ररक्षक चेंडू परत करत असताना झालेल्या "ओव्हरथ्रो" वर अवलंबून रहावे लागते. स्ट्राइकरने विषम अंकी धावा काढल्यास दोन्ही फलंदाज आपापल्या बाजू बदलतात, त्यामुळे नॉन-स्ट्राइकर फलंदाज आता स्ट्राइकर होतो. फक्त स्ट्राइकर फलंदाज वैयक्तिक धावा करुन शकतो, परंतू सर्व धावा संघाच्या धावसंख्येत मोजल्या जातात.

धाव घेण्याचा निर्णय सहसा चेंडू कोणत्या कोठे गेला आहे हे व्यवस्थित पाहू शकणारा फलंदाज घेतो. त्यावेळी तो सहसा: "येस", "नो" आणि "वेट" अशा अर्थाचे संदेश देतो.

धाव घेणे हा एक मोजूनमापून पत्करलेला धोकाच असतो कारण जर फलंदाज क्रिसमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने यष्ट्या उध्वस्त केल्या तर फलंदाज धावचीत होवू शकतो.

संघाची धावसंख्येचा अहवाल ही केलेल्या धावा आणि बाद झालेले फलंदाज अशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ, जर पाच फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या २२४ धावा असेल, तर २२४ धावांवर ५ गडी बाद असे म्हटले जाते. (ह्याचा थोडक्यात "पाच बाद २२४" असे म्हटले जाते आणि २२४/५ किंवा ५/२२४ असे लिहीले जाते).

अतिरिक्त धावा मुख्य पान: अवांतर धावा (क्रिकेट) क्षेत्ररक्षण करणार्‍या संघांनी केलेल्या चुकांमुळे फलंदाजी करणार्‍या संघाला वाढीव धावा मिळतात त्यांना अवांतर धावा असे म्हणतात. खालील चार प्रकारे ह्या धावा दिल्या जातात:

नो बॉल: नियम मोडण्याच्या दोन प्रसंगांमध्ये गोलंदाजाला एका अवांतर धावेचा दंड केला जातो (अ) हातांची चुकीची हालचाल करुन चेंडू फेकणे; (ब) पॉपिंग क्रिसच्या पुढे जावून गोलंदाजी करणे (ओव्हरस्टेपिंग); (क) रिटर्न क्रिसच्या बाहेर पाय राहणे. ह्या दंडात्मक धावेशिवाय, गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, गोलंदाजी करणार्‍या संघाने क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास तो चेंडू नो बॉल ठरवला जातो. खेळाच्या लहान प्रकारात (२०-२०, एकदिवसीय) फ्री-हिटचा नियम केला गेला आहे. पुढच्या पायाच्या नो-बॉल नंतरचा चेंडू हा फलंदाजासाठी फ्री-हीट असतो. ह्या चेंडूवर फलंदाजाला धावचीत सोडून इतर कोणत्याही प्रकाराने बाद होण्याची भिती नसते. वाईड: गोलंदाजाने फलंदाजाच्या कक्षेबाहेर चेंडू टाकल्यास एक अतिरिक्त धाव दिली जाते; नो-बॉल प्रमाणेच वाईड बॉल टाकल्यास गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. वाईड चेंडू जर सीमारेषे पार गेला, तर फलंदाजी करणार्‍या संघाला पाच धावा दिल्या जातात (वाईडसाठी एक आणि सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे चार). बाय: फलंदाज चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाजवळून मागे निघून गेला आणि फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाला तर अवांतर धाव दिली जाते (बायमुळे मिळणार्‍या धावांना प्रतिबंध करणे हा चांगल्या यष्टिरक्षकाचा एक गुण असतो). लेग बाय: चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करताना, फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागून फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाल्यास अतिरिक्त धावा दिल्या जातात. गोलंदाजाने नो किंवा वाईड बॉल टाकल्यास, त्याच्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि त्यामुळे फलंदाजी करणार्‍या संघाला अशा जास्तीच्या चेंडूवर अधिक धावा करण्याची संधी मिळते. बाय आणि लेग बाय ह्या चेंडूंवर धावा करण्यासाठी फलंदाजाला धावावे लागते (जर, चेंडू सीमारेषेपार गेला नाही तर) परंतू ह्या धावा फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये मोजल्या न जाता, संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये मोजल्या जातात.

बाद मुख्य पान: बाद (क्रिकेट) फलंदाज बाद होण्याचे एकूण ११ मार्ग आहेत: त्यापैकी पाच प्रकार हे सामान्य आहेत तर सहा अगदी दुर्मिळ. सामान्यतः बाद होण्याचे प्रकार आहेत "त्रिफळाचीत", "झेलबाद", "पायचीत" (lbw), "धावचीत", आणि (काहीश्या कमी वेळा) "यष्टिचीत". दुर्मिळ प्रकार आहेत "हिट विकेट", "चेंडू दोन वेळा टोलावणे", "क्षेत्ररक्षणात अडथळा", "चेंडू हाताळणे " आणि "टाईम्ड आउट" हे व्यवसायिक खेळांत जवळजवळ अज्ञात आहेत. अकरावा प्रकार – रिटायर्ड आउट – हा मैदानावरील बाद होण्यातला नसून उलट ज्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला श्रेय दिले जात नाही.

बाद होण्याची पद्धत जर स्पष्ट असेल (उदाहरणार्थ "त्रिफळाचीत" आणि बर्‍याचवेळा "झेलबाद") तर फलंदाज पंचांनी त्याला बाद देण्याची वाट न पाहता स्वेच्छेने मैदान सोडून बाहेर जातो. अन्यथा पंचांनी फलंदाजाला बाद देण्यासाठी, क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाने (सहसा गोलंदाजाने), पंचांकडे "अपील" करणे गरजेचे असते. यासाठी ते "हाउज दॅट?" किंवा संक्षिप्त स्वरुपात "हाऊझॅट?" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करुन "आऊट!" असे म्हणतात. नाहीतर डोके नकारार्थी हलवून "नॉट आऊट" म्हणजेच नाबाद असे म्हणतात. जेव्हा फलंदाज बाद झाल्याचा दाव अस्पष्ट असतो तेव्हा सहसा जोरदार अपील केले जाते. अशी वेळ बहुदा पायचीत, धावचीत किंवा यष्टिचीत प्रकारामध्ये येते.

झेल: जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.[२३] त्रिफळाचीत: जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो आणि कमीत कमी एक बेल जागेवरुन खाली पडते, तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. जर चेंडू यष्टींना लागला परंतू बेल पडल्या नाहीत तर फलंदाज नाबाद ठरतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.[२४] पायचीत (lbw): जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताला न लागता फलंदाजाच्या पायावर, पॅड्सवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींवर आदळला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. हा नियम मुख्यतः फलंदाजाला चेंडू बॅट ऐवजी पायाने किंवा शरीराने अडवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. पायचीत होण्यासाठी, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडणे किंवा फलंदाजाला लेग-स्टंपच्या रेषेबाहेर लागणे अपेक्षित नसते. तो ऑफ-यष्टीच्या बाहेर पडल्यास हरकत नसते.[२५] धावचीत: जेव्हा जवळचा फलंदाज त्याच्या क्रिसमध्ये नसेल, तेव्हा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील खेळाडूने जर चेंडू मारुन यष्टी उडवली तर त्याला धावचीत म्हणतात. ह्यासाठी चेंडू अचूकपणे यष्ट्यांवर मारावा लागतो, किंवा फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, सहसा तो यष्टीरक्षक किंवा यष्टीजवळच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकावा लागतो. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात नसताना देखील "धावचीत" होवू शकतो; तो फक्त त्याच्या क्रिसबाहेर असणे गरजेचे असते.[२६] यष्टिचीत: चेंडु खेळतांना जेव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो, परंतू धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि चेंडू त्याला चकवून यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेव्हा यष्टीरक्षक त्याची यष्टी उडवतो तेव्हा, बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात.[२७] गोलंदाज व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे श्रेय दिले जाते. नो बॉल वर फलंदाज धावचीत होवू शकतो परंतू यष्टीचीत होऊ शकत नाही. हिट विकेट: चेंडू खेळत असताना किंवा नुकत्याच टोलावलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो.[२८] चेंडू दोन वेळा टोलावणे: हा प्रकार खूप दुर्लभ असून, धोकादायक खेळ आणि क्षेत्ररक्षकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा उपाय म्हणून अंमलात आणला गेला. कायदेशीररित्या जर चेंडू खेळल्यानंतर, यष्ट्यांवर जात असेल तरच फलंदाज दुसर्‍यांदा चेंडू अडवू शकतो. बाकीवेळा फलंदाजाला बाद ठरवले जाते.[२९] क्षेत्ररक्षणात अडथळा: हा सुद्धा एक दुर्लभ प्रकार आहे. जर फलंदाजाने मुद्दामच क्षेत्ररक्षकास अडथळा निर्माण केला (शारिरिकदृष्ट्या किंवा तोंडी) तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.[३०] चेंडू हाताळणे: फलंदाज हेतुपुरस्सर विकेट वाचवण्यासाठी चेंडूला हात लावू शकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, की जेव्हा फलंदाजाने बॅट पकडलेली असते तेव्हा त्याचे ग्लोव्हज किंवा हात हे बॅटचा भाग असतात, त्यामुळे चेंडू ग्लोव्हजला लागून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यास फलंदाज झेलबाद होतो.[३१] टाईम्ड आउट: एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही..[३२] रिटायर्ड आउट: पंचांच्या परवानगी शिवाय एखादा फलंदाज बाद होण्याआधी निवृत्त होवू शकतो, त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.[३३] बहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो, तेव्हा तो स्ट्रायकर असतो. जर नॉन-स्ट्रायकर बाद झाला तर तो सहसा धावचीत किंवा क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्याने, चेंडू हाताळल्याने आणि टाईम्ड आऊट होवू शकतो.

बाद झालेला नसतानाही फलंदाज मैदान सोडून जावू शकतो. जर फलंदाजाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला, तर तो तात्पुरता निवृत्त होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीला येतो. हे रिटायर्ड हर्ट किंवा रिटायर्ड इल म्हणून नोंदवले जाते. निवृत्त झालेला फलंदाज नाबाद असतो आणि जर तो बरा झाला तर पुन्हा फलंदाजी करु शकतो. दुखापत झालेली नसतानाही फलंदाज निवृत्त झाल्यास त्याला रिटायर्ड आऊट म्हणून बाद दिले जाते; कोणाही खेळाडूला ह्याचे श्रेय दिले जात नाही. कोणताही फलंदाज नो बॉलवर त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, यष्टीचीत किंवा हिट विकेट ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. तसेच वाईड चेंडूवर तो त्रिफळाचीत, झेलबाद, पायचीत, किंवा चेंडू दोन वेळा टोलावणे ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. यापैकी काही प्रकारांमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकलेला नसतानाही फलंदाज बाद होवू शकतो. स्ट्राईकवर नसलेला फलंदाज जर चेंडू टाकण्याआधी क्रिसच्या बाहेर गेला तर, गोलंदाज त्याला धावचीत करु शकतो, आणि फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा आणि रिटायर्ड आउट या पद्धतीने केव्हाही बाद होवू शकतो. टाईम्ड आऊट हा प्रकार नैसर्गिरित्याच चेंडू न टाकता बाद होण्याचा असतो. बाकी सर्व प्रकारांमध्ये चेंडू टाकला गेल्यानंतरच फलंदाज बाद दिला जातो.

डावाचा शेवट मुख्य पान: डावाचा शेवट (क्रिकेट) एखाद्या डावाचा शेवट खालील प्रसंगी होतो:

अकरा पैकी दहा फलंदाज बाद झाले; ह्याला संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात संघातील फलंदाजी करु शकणारा फक्त एकच फलंदाज खेळण्यासाठी बाकी राहिला, एक किंवा जास्त फलंदाज दुखापतीमुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील; ह्यावेळी सुद्धा, संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात शेवटी फलंदाजी करणार्‍या संघाच्या विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण झाल्या निर्धारित षटके टाकून झाली (एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, सहसा ५० आणि ट्वेंटी२० सामन्यात २० षटके) कर्णधाराने दोन किंवा जास्त फलंदाज नाबाद असतानाही डाव घोषित केला (हे सहसा एकदिवसीय सामन्यात लागू होत नाही) निकाल मुख्य पान: निकाल (क्रिकेट) जर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी धावा करुन सर्वबाद झाला, तर तो संघ " क्ष धावांनी पराभूत" झाला असे म्हणतात. (येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या धावांमधील फरक). जर शेवटी फलंदाजी करणार्‍या संघाने विजयासाठी आवश्यक धावा केल्या, तर त्यास " क्ष गडी राखून विजयी" असे म्हणतात, जेथे क्ष म्हणजे इतके गडी बाद झाले नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या पार करताना फक्त सहा गडी गमावले तर तो संघ "चार गडी राखून विजयी" झाला असे म्हणतात.

प्रत्येकी दोन डावांच्या सामन्यात, एका संघाच्या पहिल्या आणि दुसर्‍या डावाच्या एकत्र धावा ह्या, दुसर्‍या संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी असून शकतात. अशा वेळी जास्त धावसंख्या असणारा संघ एक डाव आणि क्ष धावांनी विजयी झाला असे म्हणतात, आणि त्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरज नसते. येथे क्ष म्हणजे दोन्ही संघांच्या एकून धावांमधील फरक असतो.

जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला, आणि दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना बरोबरीत सुटला असे म्हणतात; हा निकाल दोन डावांच्या सामन्यात खूपच दूर्मिळ असा आहे. खेळाच्या पारंपारिक प्रकारात, जर सामन्यासाठी नेमून दिलेली वेळ कोणत्याही एका संघाने विजय मिळविण्याआधी संपली तर तो सामना अनिर्णित म्हणून घोषित केला जातो.

जर सामना प्रत्येकी एका डावाचा असेल, तर सहसा प्रत्येक डावात टाकली जाणारी षटके निर्धारित केली जातात. ह्या सामन्यांना "मर्यादित षटकांचे" किंवा "एकदिवसीय" सामने म्हणतात, आणि बाद झालेले गडी विचारात न घेता, जास्त धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता नसते. जर अशा प्रकारचा सामना खराब हावामानामुळे काही काळ स्थगित झाला तर एका जटिल गणिती सुत्राने, ज्याला डकवर्थ-लुईस पद्धत असे म्हणतात, एक नवे लक्ष्य संघासमोर ठेवले जाते. जर आधीच मान्य केलेली षटके कोणत्याही संघाने पूर्ण केली नाहीत, आणि पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळ पुर्ववत सुरु होवू शकला नाही तर असा एकदिवसीय सामना सुद्धा "निकाल नाही" म्हणून घोषित केला जावू शकतो.

क्रिकेट सामन्यांचे प्रकार क्रिकेट हा एक बहुआयामी खेळ आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार, खेळाचे विविध मानक आणि भूमिकांचे स्तर आणि सामना किती वेळ चालावा यासाठीची वेळ ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, वेळेनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकावेळी एक ह्याप्रमाणे दोन डाव मिळतात आणि दुसरा आहे षटकांनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एक डावात मर्यादित षटके खेळावयास मिळतात. पहिल्या प्रकाराला प्रथम श्रेणी क्रिकेट असे म्हणतात, हे सामने तीन ते पाच दिवसाचे खेळवले जातात ("अमर्याद वेळेच्या" सामन्यांची उदाहरणे देखील आहेत); आणि दुसरा प्रकार आहे मर्यादित षटकांचे क्रिकेट कारण ह्या प्रकारात प्रत्येक संघाला ५० किंवा २० षटके गोलंदाजी करावी लागते, आणि ह्या सामन्यांचा कालावधी हा केवळ एका दिवसाचा असतो (खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे सामन्याची वेळ वाढवली जावू शकते.).

विशेषतः, दोन-डावांच्या सामन्यांमध्ये खेळण्याची वेळ दर दिवशी कमीत कमी सहा तास इतकी असते. मर्यादित षटकांचे सामने सहसा सहा तास किंवा जास्तवेळ चालतात. प्रत्येक दिवशी औपचारिकरित्या सहसा काही अंतराने जेवण आणि चहासाठी तसेच अनौपचारिकपणे लहानसा विराम पेयांसाठी घेतला जातो. नवोदित क्रिकेटपटूंना एका दिवसापेक्षा जास्त चालणार्‍या सामन्यांमध्ये क्वचित खेळतात; ह्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये केली जाते, डाव घोषित करता येण्याजोगे सामने, ज्यात निर्धारित जास्तीत जास्त वेळ किंवा सामन्याची निर्धारित एकूण षटके आणि फलंदाजी करणार्‍या संघ सर्वबाद झाला किंवा त्यांनी डाव घोषित केला; आणि मर्यादित षटकांचे सामने, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या डावासाठी षटके निर्धारित केली जातात. ज्यामध्ये ३० ते ६० षटकांचे आणि लोकप्रिय अशा २० षटकांच्या प्रकाराचा समावेश होतो. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये इनडोअर क्रिकेट आणि गार्डन क्रिकेट हे अतिशय लोकप्रिय आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या, सिंगल विकेट क्रिकेट हा प्रकार खूपच यशस्वी ठरला आणि १८ व १९व्या शतकातील ह्यांचे सामने हे महत्त्वाचे सामने म्हणून पात्र ठरलेले आहेत. ह्या प्रकारामध्ये, प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात, आणि एका वेळी एकच फलंदाज मैदानावर असतो आणि त्याचा डाव संपेपर्यंत त्यालाच प्रत्येक चेंडूंचा सामना करावा लागतो. मर्यादित षटकांचे सामने सुरु झाल्यापासून सिंगल विकेट फारच कमी खेळला जातो.

कसोटी क्रिकेट मुख्य लेख: कसोटी क्रिकेट

जानेवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यानचा कसोटी सामना. काळ्या रंगाची विजार घातलेले पंच दिसत आहेत. कसोटी क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट आणि क्लब क्रिकेट ह्या तिन्ही प्रकारांमध्ये पारंपारिकरित्या सफेद गणवेश आणि लाला चेंडू वापरला जातो. कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोच्च स्तर आहे. कसोटी सामने हे आयसीसीसचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या संघांदरम्यान खेळवले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने असतात.

"कसोटी सामने" हा वाक्प्रचार खूप नंतर वापरात आला असला तरीही, १८७६-७७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मोसमात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतर आणखी आठ संघांनी कसोटीचा दर्जा प्राप्त केला: दक्षिण आफ्रिका (१८८९), वेस्ट इंडीज (१९२८), न्यूझीलंड (१९२९), भारत (१९३२), पाकिस्तान (१९५२), श्रीलंका (१९८२), झिम्बाब्वे (१९९२-२००६, २०११-२०१९)[३४][३५], बांगलादेश (२०००), अफगाणिस्तान (२०१७) आणि आयर्लंड (२०१७)

वेल्सचे खेळाडू इंग्लंडकडून खेळण्यास पात्र आहेत, परिणामतः तो इंग्लंड आणि वेल्स संघ आहे. तसेच वेस्ट इंडीज संघात कॅरेबियन बेटांवरील अनेक राज्यांचे खेळाडू आहेत, ज्यात मुख्यत: बार्बाडोस, गुयाना, जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, लीवर्ड बेटे आणि विंडवर्ड बेटे यांचा समावेश होतो.

दोन संघांदरम्यान खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांना "मालिका" असे म्हणतात. कसोटी सामना पाच दिवसांपर्यंत चालतो आणि एका मालिकेत साधारणत: तीन ते पाच सामने असतात. निर्धारित वेळेत जे कसोटी सामने पूर्ण होत नाहीत ते अनिर्णित म्हटले जातात. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यतेमुळे शेवटी फलंदाजी करणारा आणि खूप मागे असणारा संघ बचावात्मक पावित्रा घेवून सामना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याची लहानशी सुद्धा संधी देण्यापासून परावृत्त होतो.[३६]

१८८२ पासून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या जास्तीत जास्त कसोटी मालिका द ॲशेस चषकासाठी खेळवल्या गेल्या. त्याशिवाय इतर चषकांसाठी खेळवल्या गेलेल्या द्विदेशीय मालिकांमध्ये पुढील मालिकांचा समावेश होतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान विस्डेन चषक, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान फ्रँक वोरेल चषक, भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावसकर चषक ह्यांचा समावेश होतो.

मर्यादित षटके मुख्य लेख: मर्यादित षटकांचे क्रिकेट हेही बघा: आंतरराष्ट्रीय एकदिवसीयआणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०

वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर व्हिव्ह रिचर्ड्सला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मानले जाते. प्रथम श्रेणी कंट्री क्लब्स दरम्यान १९६३च्या मोसमात खेळवल्या गेलेल्या नॉकआऊट चषक स्वरुपात मर्यादित षटलकांचे क्रिकेट सुरु केले गेले. १९६९ मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा सुरु करण्यात आल्या. ही संकल्पना हळूहळू क्रिकेट खेळणार्‍या इतर अग्रगणी देशांमध्ये रुजली गेली आणि पहिला मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये खेळवला गेला. १९७५ साली, पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आणल्या गेल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी किट आणि सफेद चेंडूने खेळवले जाणारे प्रकाशझोतातील सामने ह्यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रास खेळला जाणारा प्रकार म्हणजे "एकदिवसीय सामना". हा सामना सहसा एका दिवसात संपतो म्हणून त्याला तसे नाव दिले गेले आहे. एखाद्या सामन्यान खराब हवामानामुळे व्यत्यय आल्यास किंवा तो पुढे ढकलला गेल्यास दुसर्‍या दिवशी पुढे खेळवला जावू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्याचा मुख्य उद्देश म्हणजे परंपरागत अनिर्णितावस्थेत सामना न संपता निश्चित निकाल लावणे हा आहे. परंतू जर धावा एकसमान झाल्या तर सामना बरोबरीत सुटतो किंवा खराब हवामानामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपू शकतो. प्रत्येक संघ एक डाव खेळतो आणि त्यांना निर्धारित षटकांना तोंड द्यावे लागते, सहसा जास्तीत जास्त ५०. क्रिकेट विश्वचषक एकदिवसीय प्रकाराने खेळला जातो आणि २०१५ चा मागील विश्वचषक हा सह-यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पुढील विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये खेळवला जाईल.

ट्वेंटी२० हा मर्यादित षटकांचा नवीन प्रकार असून ह्याचा मुख्य उद्देश सामना अंदाजे तीन तासात पूर्ण करणे हा असून, तो सहसा सायंकाळच्या सत्रात खेळवला जातो. २००३ मध्ये जेव्हा ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली तेव्हा त्याचा उद्देश हा कामगारांची संध्याकाळच्या वेळात करमणूक व्हावी हा होता. हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरवात झाली. पहिली ट्वेंटी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा २००७ मध्ये सुरु झाली आणि भारतीय संघाने ह्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामागोमागच्या स्पर्धा पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०), वेस्ट इंडीज (२०१२), श्रीलंका (२०१४) आणि वेस्ट इंडीज (२०१६) ह्या संघांनी जिंकल्या. पहिल्या आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२० स्पर्धेनंतर अनेट स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धांचा जन्म झाला. ह्यातील सर्वात पहिली होती भारतीय क्रिकेट लीग जी एक बंडखोर लीग मानली गेली कारण ह्या स्पर्धेला बीसीसीआयने मान्यता दिली नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय प्रीमियर लीग नावाची स्वतःची एक वेगळी अधिकृत स्पर्धा सुरू केली. अधिकृत स्पर्धा खूपच यशस्वी झाली आणि ती आता दरवर्षी भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आणि प्रेक्षक सहभागी होतात. याउलट भारतीय क्रिकेट लीग बंद करण्यात आली. भारतीय प्रीमियर लीगच्या यशानंतर जगभरात अनेक ठिकाणी स्थानिक स्पर्धा सुरु झाल्या. अलीकडे सुरु झालेल्या २०-२० चँपियन्स लीग स्पर्धेत विविध देशातील स्थानिक क्लबचे संघ सहभागी होतात. ह्या स्पर्धेत वरिष्ठ क्रिकेट संघ असलेल्या देशांतील अग्रमानांकीत स्थानिक संघ एकमेकांविरुद्ध लढतात.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा मुख्य लेख: प्रथम श्रेणी क्रिकेट

यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब १८७५ मध्ये. १८९३ मध्ये काउंटी चँपियनशीपचे पहिले विजेतेपद ह्या संघाला मिळाले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटचा अंतर्भाव होतो. ही संज्ञा सहसा आयसीसीचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या सर्वात वरच्या पातळीवरील स्थानिक क्रिकेटशी संदर्भात वापरली जाते, परंतू याला अपवाद आहेत. इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा बहुतांशी भाग हा काउंटी अजिंक्यपद स्पर्धा खेळणार्‍या १८ काउंटी क्लब्सद्वारा खेळला जातो. सदर संकल्पना ही १८व्या शतकापासून अस्तित्त्वात आहे परंतू स्पर्धेला अधिकृत दर्जा १८९० मध्ये देण्यात आला. ह्यातील सर्वात यशस्वी क्लब यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब हा आहे. त्यांनी मार्च २०१७ पर्यंत ३० विजेतेपदे मिळवली आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धा १८९२-९३ मध्ये शेफील्ड शील्डच्या रुपाने सुरु झाली. ऑस्ट्रेलियामधील प्रथम-श्रेणी संघ हे विविध राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. न्यू साउथ वेल्स संघाने २०१४ पर्यंत एकूण ४५ विजेतेपदे मिळवली आहे.

भारतात रणजी करंडक नावाने प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा १९३४ मध्ये सुरु झाली. २०१६-१७च्या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते. २०१६-१७ पर्यंत ४१ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ मुंबईचा होता.

ह्याशिवाय इतर ठिकाणी होणार्‍या स्पर्धा प्लंकेट शील्ड (न्यूझीलंड), करी चषक (दक्षिण आफ्रिका) आणि शेल चषक (वेस्ट इंडीज). ह्यापैकी काही स्पर्धा ह्या अलीकडेच अद्ययावत आणि नामांतरीत केल्या गेल्या आहेत.

मर्यादित षटकांच्या स्थानिक स्पर्धेची सुरवात १९६३ साली इंग्लंडमधील जिलेट चषक ह्या नॉकआऊट स्पर्धेने झाली. देश सहसा नॉकआऊट आणि लीग ह्या दोन्ही स्वरूपात मर्यादित षटकांच्या हंगामी स्पर्धा आयोजित करतात. अलिकडच्या काळात, राष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे ज्या सहसा नॉकआऊट प्रकारे खेळवल्या जातात आणि काही ह्या लहान स्वरूपातील साखळी स्पर्धा आहेत.

क्लब क्रिकेट

इंग्लंडमधील क्लब क्रिकेट सामन्याचा एक नमुना क्लब क्रिकेट हा क्रिकेट खेळाचा प्रामुख्याने हौशी, पण तरीही औपचारिक अशी स्पर्धा आहे, ज्यात संघ सहसा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या खेळतात. जरी क्रिकेटचे नियम पाळले जात असले तरी ह्या प्रकारांमध्ये अनेक विविधता आहेत.

क्लब क्रिकेट मध्ये वारंवार साखळी किंवा चषक स्वरुपात स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामने वेळ किंवा षटकांच्या माध्यमातून निर्धारित केले जातात. मर्यादित षटकांचे सामने सहसा प्रत्येक डावात २० ते ६० षटकांपर्यंत सिमीत असतात. वेळेनुसार निर्धारित सामने हे पारंपारिक असले तरीही कमी प्रमाणात खेळले जातात. सामना संध्याकाळचे काही तास ते दोन दिवस इतकावेळ चालणारा असू शकतो. आधुनिक नाविन्यपूर्ण स्वरूपाची स्पर्धा ट्वेंटी२० स्वरूपाची आहे, ज्यात सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही लीग स्पर्धांचा समावेश आहे.

खेळाच्या दर्जामध्ये अर्ध-व्यावसायिक ते कधीतरी एक मनोरंजन ह्यानुसार बदल होत राहतो आणि क्लब क्रिकेटचा आनंद एक स्पर्धात्मक सामाजिक घटक म्हणून घेतला जातो. अनेक क्लबचे पॅव्हिलियन किंवा क्लब हाऊस असलेले स्वतःचे मैदान असते, ज्यावर नियमितपणे खेळ खेळले जातात. काही क्लब हे भटके असतात जे इतर मैदाने वापरतात.

व्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर जगभरात अनेक लीग स्थापन झाल्या आहेत, ज्यापैकी सर्वात जुनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील बर्मिंगहॅम अँड डिस्ट्रीक्ट प्रीमियर लीग ही १८८८ मध्ये स्थापन झाली.

सामन्यांचे इतर प्रकारp मुख्य लेख: क्रिकेटचे प्रकार

जेर्व्हिस बे, ऑस्ट्रेलिया येथील सुरु असलेला एक फ्रेंच क्रिकेट सामना जगभरात क्रिकेट ह्या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये इनडोअर क्रिकेट, फ्रेंच क्रिकेट, बीच क्रिकेट, क्विक क्रिकेट, त्याशिवाय क्रिकेट पासून प्रेरणा घेऊन तयार केले गेलेले सर्व प्रकारचे पत्त्यांचे खेळ व बोर्ड गेम्स यांचा समावेश होतो. उपलब्ध असलेली साधने किंवा सहभागी खेळाडूंना त्याचा आनंद घेता यावा आणि सोप्या पद्धतीने खेळता यावा ह्याकरता खेळाचे नियम एकसारखे बदलत असतात.

इनडोअर क्रिकेटचा शोध पहिल्यांदा १९७० साली लागला.[३७] हा बर्‍याच अंशी मैदानावर खेळल्या जाणार्‍या क्रिकेट सारखाच आहे, फरक इतकार की येथे प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक स्वतंत्र लीग स्पर्धा असलेला हा प्रकार युनायटेड किंग्डम मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणखी एक कमी खेळला जाणारा इनडोअर क्रिकेटचा प्रकार हा लहान जागेत, नरम चेंडूने आणि पॅड्सशिवाय खेळला जातो. हा प्रकार काही वर्षांनंतर शोधला गेला आणि तो जास्त करुन दक्षिण गोलार्धात खेळला जातो. त्याशिवाय ह्या प्रकाराच्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा खेळवल्या जातात, ज्यामध्ये विश्वचषक स्पर्धेचा सुद्धा समावेश होतो.

युके मध्ये, क्रिकेटचा गार्डन क्रिकेट प्रकार लोकप्रिय आहे. देशभरात हा खेळ प्रौढ आणि मुले उद्याने किंवा मैदानांवर खेळतात. ह्या खेळात क्रिकेट बॅट आणि चेंडूचा जरी वापर केला जात असला तरी पॅड किंवा ग्लोव्ह्जचा वापर होत नाही. खेळाचे नियम हे संघातील खेळाडू आणि जागेचा आकार ह्यानुसार बदलतात.

उपनगरीय यार्ड किंवा वाहनांसाठीच्या रस्त्यांवर कुटूंबातील सदस्य आणि युवक बॅकयार्ड क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेट खेळतात आणि भारत व पाकिस्तानातील शहरांमध्ये त्यांच्या लांब अरुंद रस्त्यांवर मोजदाद ठेवता येणार नाहीत इतक्या प्रमाणात "गल्ली क्रिकेट" किंवा "टेप बॉल क्रिकेट" खेळले जाते. काही वेळा सुधारित नियम वापरले जातात: उदा. एक टप्पा पडलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकाने हाताने झेलल्यास फलंदाज बाद होतो; किंवा जर कमी खेळाडू असतील तर सर्वजण आळीपाळीने गोलंदाजी आणि फलंदाजी करतात व इतर क्षेत्ररक्षण करतात. टेनिस चेंडू आणि घरच्या घरी तयार केलेल्या बॅट सहसा वापरल्या जातात, आणि यष्टी म्हणून अनेक गोष्टी वापरल्या जातात.

क्विक क्रिकेट मध्ये, गोलंदाजाला गोलंदाजी करण्याआधी फलंदाज तयार होण्याची वाट पाहण्याची गरज नसते, त्यामुळे सामना खूप वेगात खेळला जातो, त्यामुळे त्याकडे लहान मुले आकर्षित होतात. हा प्रकार युके मध्ये शारिरिक शिक्षणाचा धडा म्हणून वापरला जातो. खेळाचा वेग अजून वाढविण्यासाठी आणि "टिप अँड रन" किंवा "टिप्सी रन" किंवा "टिप्पी-गो" यासारखे बदल केले जातात. याचा अर्थ चेंडूचा बॅटला चुकून किंवा जरासा स्पर्श झाला तरीही फलंदाजाला धाव घेणे गरजेचे असते. हा नियम, फलंदाजाचा चेंडूला अडवून धरण्याचा अधिकार काढून घेवून सामना वेगात पुढे जावा या हेतूने केला जातो.

सामोआमध्ये क्रिकेटचा किलीकिटी प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये हॉकी स्टीकच्या आकाराची बॅट वापरली जाते. मूळ इंग्लिश क्रिकेटमध्ये, हॉकी स्टीकऐवजी आधूनिक सरळ बॅट १७६०च्या सुमारास जेव्हा गोलंदाज चेंडू रोल किंवा घरंगळत टाकण्याऐवजी टप्पा टाकू लागले तेव्हापासून वापरात आली. एस्टोनियामध्ये हिवाळ्यात आईस क्रिकेट खेळण्यासाठी संघ एकत्र येतात. तेव्हा खेळ सामान्य उन्हाळी हवामानाऐवजी असह्य, हिवाळी वातावरणात खेळला जातो. याखेरीज इतर नियम हे प्रत्येकी-सहा-खेळाडूंच्या प्रकारासारखेच असतात.

आंतरराष्ट्रीय रचना मुख्य लेख: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती , व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा

आयसीसी सभासद देश. (सर्वोच्च स्तरावरील) कसोटी खेळणारे देश नारिंगी रंगात; सहयोगी सदस्य देश पिवळ्या रंगात; संलग्न सदस्य देश जांभळ्या रंगात दाखविले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती - क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना असून, त्याचे मुख्यालय दुबई मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली, त्यानंतर १९६५ मध्ये तिचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे झाले, आणि सध्याचे नाव १९८९ मध्ये घेतले गेले.

आयसीसीचे एकूण १०४ सदस्य आहेत: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.[३८] क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजिन आणि शासन ह्यासाठी आयसीसीस जबाबदार असते. हीच समिती सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते, जे देशात खेळल्या जाणार्‍या सामन्यांचे नियमन करते. राष्ट्रीय संघाची निवड करणे तसेच मायदेशातील आणि परदेशातील दौर्‍यांचे आयोजन करणे ही जबाबदारी सुद्धा क्रिकेट मंडळाकडे असते. वेस्ट इंडीजमध्ये ही कामे चार राष्ट्रीय आणि दोन बहुराष्ट्रीय सदस्यांनी बनलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळातर्फे केली जातात.

सदस्य मुख्य लेख: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश संपूर्ण सदस्य संपूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. संपूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व संपूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, संपूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यास पात्र असतात.[३९] वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर कॅरिबियन प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.

क्र देश प्रशासकीय संघटना ह्या तारखेपासून सदस्य [३९] सध्याची क्रमवारी कसोटी एकदिवसीय टी२० १ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ १५ जुलै १९०९ ४ ४ २ २ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट ऑस्ट्रेलिया १५ जुलै १९०९ ३ २ ६ ३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्रिकेट ६ जुलै १९९२ १० ११ १३ ४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट दक्षिण आफ्रिका १५ जुलै १९०९ २ १ ७ ५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड क्रिकेट ३१ मे १९२६ ५ ५ १ ६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान क्रिकेट मंडळ २८ जुलै १९५२ ६ ६ ३ ७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश क्रिकेट मंडळ २६ जून २००० ९ ७ १० ८ भारतचा ध्वज भारत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ३१ मे १९२६ १ ३ ५ ९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ ३१ मे १९२६ ८ ९ ४ १० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका क्रिकेट २१ जुलै १९८१ ७ ८ ८

  • १९ जुलै २०१७ पर्यंत अद्ययावत[४०]

Aमे १९६१ मध्ये निवृत्त, पुन्हा दाखल १० जुलै १९९१.

अव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्य सर्व सहयोगी आणि संलग्न सदस्य कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नासतात, परंतू विश्व क्रिकेट लीगमधील त्यांच्या यशापयशावरून आयसीसी त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देते. अव्वल सहा संघांना एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा मिळतो, ज्यामुळे ते पूर्ण सभासद सदस्य देशांशी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरतात. सध्या एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा असलेले सहयोगी आणि संलग्न संघ खालीलप्रमाणे आहेत.:

देश प्रशासकीय संघटना ह्या तारखेपासून सदस्य सध्याची एकदिवसीय क्रमवारी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ २००१[४१] १० कॅनडाचा ध्वज कॅनडा क्रिकेट कॅनडा १९६८[३९] १६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड क्रिकेट आयर्लंड १९९३[३९] ११ केनियाचा ध्वज केनिया क्रिकेट केनिया १९८१[३९] १३ Flag of the Netherlands नेदरलँड्स कोनिंक्लिज्के नेदरलँड्से क्रिकेट बाँड १९९६[३९] १२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड क्रिकेट स्कॉटलंड १९९४[३९] १५ विविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट

अजंता मेंडीस (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये पहिल्यांदा सहा बळी घेणारा क्रिकेटपटू १९०० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला.[४२] १९९८ मध्ये, राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला, ह्यावेळी सामने प्रत्येकी ५०-षटकांचे खेळले गेले. दिल्ली येथे पार पडलेल्या २०१० राष्ट्रकुल खेळांमध्ये ट्वेंटी२० क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतू भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.[४३]

क्वांगचौ, चीन मधील २०१० आशियाई खेळांमध्ये [४४] आणि इंचॉन, दक्षिण कोरिया येथील २०१४ आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळवले गेले.[४५] भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.[४६] यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. राष्ट्रकुल खेळ परिषदेने आयसीसीला २०१४ आणि २०१८ राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतू आयसीसीने त्यास नकार दिला.[४७] २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली,[४८] परंतू मुख्यतः बीसीसीआयच्या विरोधामुळे, २०१३ मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही.[४९] इएसपीएनच्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणार्‍या तोट्यामुळे होता. एप्रिल २०१६ मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष डेव्ह रिचर्डसन म्हणाले की, ट्वेंटी२० क्रिकेटला २०२४ ऑलिंपिक खेळात सामील होण्याची संधी आहे, परंतू आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरुन बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे.[५०]

आकडेवारी मुख्य लेख: क्रिकेट आकडेवारी आयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतू कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतू ह्याउलट तसे होत नाही. द गाईड टू क्रिकेट हे फ्रेड लिलीव्हाईट ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक १८४९ ते त्याच्या मृत्यु १८६६ पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून १८६४ साली इंग्लिश क्रिकेटपटू जॉन विस्डेन (१८२८-१८८४) ह्याने विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक सुरु केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे.

काही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

डाव (I): फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव. नाबाद (NO): फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला. धावा (R): कारकिर्दीत काढलेल्या धावा. सर्वोत्कृष्ट धावसंख्या (HS/Best): एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा. फलंदाजीची सरासरी (Ave): एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. Ave = R/[I-NO] शतके (100): कारकिर्दीतील १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव. अर्धशतके (50): कारकिर्दीतील ५० ते ९९ पर्यंत धावा केलेले डाव. (शतके ही अर्धशतकांमध्ये मोजली जात नाहीत). खेळलेले चेंडी (BF): नो बॉल धरून खेळलेले चेंडू (वाईड चेंडू मोजले जात नाहीत). स्ट्राईक रेट (SR): प्रति १०० चेंडूंतील धावा. (SR = [100 * R]/BF) धावगती (RR): षटकामागे फलंदाजाने (किंवा फलंदाजी करणार्‍या संघाने) केलेल्या धावा. मूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

षटके (O): गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके. चेंडू (B): गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतू पूर्वी पासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे. निर्धाव षटके (M): गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके (ज्या षटकांमध्ये एकही धाव दिली गेली नाही). धावा (R): दिलेल्या धावा. बळी (W): बाद केलेले गडी. नो बॉल (Nb): टाकलेले नो बॉल. वाईड (Wd): टाकलेले वाईड बॉल. गोलंदाजी सरासरी (Ave): प्रति बळी दिलेल्या धावा. (Ave = R/W) स्ट्राईक रेट (SR): प्रति बळी टाकलेले चेंडू. (SR = B/W) इकॉनॉमी रेट (Econ): प्रति षटक सरासरी धावा. (Econ = धावा/टाकलेली षटके). धावफलक हेसुद्धा पाहा: स्कोअरिंग (क्रिकेट)

सामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून टॅली स्टीक वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने १७७६ मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला.[५१] १८४६ मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून लॉर्ड्सवर विकला गेला.[५२]

धावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होवून क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. १८४८ मध्ये, फ्रेड लिलिव्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटींग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. १८५८ मध्ये, केनिंग्टन ओव्हलने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, "अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन इच साईड". १८८१ मध्ये, मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते.[५१]

संस्कृती दैनंदिन जीवनावरील प्रभाव

इनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन सिडनी, ऑस्ट्रेलिया राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणीच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशावर सुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषत: इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" (अनफेअर (अयोग्य)), "हॅड अ गुड इनिंग्स", "स्टीकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरुन बरेच चित्रपट तयार केले गेले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरुन रुढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.[५३]

कसोटी क्रिकेट खेळणार्‍या देशातील व्यक्तिंमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बर्‍याच प्रमाणात प्रसार झाला आहे.

कला आणि लोकप्रिय संस्कृती मध्ये हेसुद्धा पाहा: कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट

विल्यम ब्लेक आणि जॉर्ज गॉर्डन बायरन ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या कामामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.[५४] त्रिनिदाद मधील लेखक सी.एल्.आर. जेम्स यांनी लिहीलेले पुस्तक बियाँड अ बाऊंड्री (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.[५५] कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक पी. जी. वुडहाऊस यांची १९०९ मधील कादंबरी, माईक नावाजलेली आहे.

व्हिज्युअल आर्ट मधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये अल्बर्ट शेव्हालियर टेलरचे केंट व्हर्सेस लँकाशायर ॲट कँटरबरी (१९०७) आणि रसेल ड्रायसडेलचे द क्रिकेटर (१९४८), हे "२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे."[५६] फ्रेंच प्रभाववादी कामीय पिसारोने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौर्‍याची चित्र काढली होती.[५४] फ्रान्सिस बेकन, ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.[५४] एक कॅरेबियन कलाकार वेंडी नाननची क्रिकेटची चित्रे [५७] १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.[५८]

त्याशिवाय ईए स्पोर्ट्स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हिडीओ गेम्स प्रसिद्ध आहेत.[५९]

इतर खेळांवरील प्रभाव

टॉम विल्स, क्रिकेटर आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचा सहसंस्थापक क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.[६०] ऑफ सीजन मध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम विल्सला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फूट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी मेलबर्न फुटबॉल क्लब स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.[६१] हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानावर खेळला जातो.

१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि ब्रुकलीन, न्यूयॉर्क येथील माजी क्रिकेटपटू हेन्री चाडविक हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता.[६२]

क्रिकेटमधील विक्रम कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी हेसुद्धा पहा Portal.svg क्रिकेट दालन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद आयसीसी खेळाडू क्रमवारी आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद क्रिकेटमधील संज्ञा आयसीसी टी२० अजिंक्यपद आयसीसी क्रिकेट विश्वचषक क्रिकेटमधील विक्रमांची यादी कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी अंध क्रिकेट महिला क्रिकेट क्रिकेटमधील सामान्य दुखापती मॅच फिक्सिंग कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' या पुस्तकाचा ’फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.

संदर्भ आणि नोंदी

"जॉन लीच, फ्रॉम लॅड्स टू लॉर्डस" (इंग्रजी मजकूर). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २९ जून २०११ रोजी मिळविली). १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य) गिल्डफोर्ड कोर्ट केस मध्ये तंतोतंत तारीख १७ जानेवारी १५९७ (ज्युलियन तारीख) नोंदवली गेली आहे, जे ग्रेग्रीयन वर्ष १५९८ आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
Birley, पान. ३.
Altham, पान. २१.
मिडल डच ही भाषा फ्लँडर कांऊटीमध्ये वापरात होती.
Bowen, p. 33.
टेरी, डेव्हिड (२००८). "सतराव्या शतकातील क्रिकेटचा खेळ: खेळाची पुनर्रचना" (इंग्रजी मजकूर). स्पोर्ट्सलायब्ररी. १८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
गिलमेइस्टर यांच्या सिद्धांताचा सरांश जॉनी एडोज यांच्या द लँग्वेज ऑफ क्रिकेट ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे., ISBN 1-85754-270-3.
Underdown, पान. ३.
Underdown, पान. ४.
मॅककॅन, pp. xxxiii–xxxiv.
मॅककॅन, पान. xli.
द ऑस्ट्रेलियन इलेव्हन: द फर्स्ट ऑस्ट्रेलियन टीम, ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय. २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
"कायदा १ (खेळाडू)". लॉज ऑफ क्रिकेट (इंग्रजी मजकूर). मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
इस्टअवे, रॉब (२००४). व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड. ग्रेट ब्रिटन: रॉबसन वर्क्स. पान क्रमांक २४. आय.एस.बी.एन. 1-86105-629-X.
"कायदा २८ (द विकेट इज डाऊन)". लॉज ऑफ क्रिकेट (इंग्रजी मजकूर). मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी - लॉज ऑफ क्रिकेट: नियम २३. लॉर्ड्स.ओआरजी. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
"क्रिकेट परिमाणे". २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
"नियम १९ (सीमारेषा)". मेरिलिबॉन क्रिकेट क्लब. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम १२. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
"सर्वात जलद गोलंदाजी". गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स (इंग्रजी मजकूर). ३ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले.
"धावकाच्या नियमाचा गैरवापर होत आहे, आयसीसी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
"नोंदी / कसोटी, ए.दि. व टी२० यांच्या एकत्रित नोंदी / फलंदाजीतील नोंदी; कारकिर्दीतील सर्वाधिक धावा" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १७ नोव्हेंबर २०१३. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३२. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३०. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३६. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३८. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३९. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३५. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३४. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३७. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३३. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३१. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम २. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.
"झिम्बाब्वेचा कसोटी दर्जा रद्द". बीबीसी स्पोर्ट. १८ जानेवारी २००६. १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
"कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर झिम्बाब्वेची बांगलादेशवर मात". बीबीसी स्पोर्ट. ८ ऑगस्ट २०११. १३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
इस्टअवे, रॉब, व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड (ॲनोव्हा, २००५), पान. १३४.
"शॉर्टर, सिंपलर, सिलियर " इन इएसपीएन क्रिकइन्फो, ७ सप्टेंबर २००७.
"आयसीसी सदस्य, जागतिक नकाशा". आयसीसी-क्रिकेट.कॉम (इंग्रजी मजकूर). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले..
"थोडक्यात इतिहास ..." (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
"आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी मजकूर). आयसीसी डेव्हलपमेंट (इंटरनॅशनल) लिमीटेड. १६ मार्च २०१६ रोजी पाहिले.
"क्रिकइन्फो-इतर देश-संघ-अफगाणिस्तान" (इंग्रजी मजकूर). क्रिकइन्फो. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
बुचनन, इयान (१९९३). "१९०० खेळात क्रिकेट". In मॅलन, बिल. जर्नल ऑफ ऑलिंपिक हिस्ट्री (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑलिंपिक हिस्टोरियन्स) १ (२): ४.
"क्रिकेट २०१० खेळांमध्ये नाही" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २३ जानेवारी २००६. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
"गुआंगझोऊ आशियाई खेळ".
"२०१४ आशियाई खेळ".
"भारत पुन्हा २०१४ आशियाई खेळांमध्ये नाही".
"आयसीसीचा २०१८ राष्ट्रकुल खेळात सहभागी न होण्याचा निर्णय" (इंग्रजी मजकूर). रॉयटर्स. २४ जुलै २०१४. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
"क्रिकेटला ऑलिंपिकची मान्यता" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १२ फेब्रुवारी २०१०. १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
कैसर मोहम्मद अली (१ जुलै २०१३). "बीसीसीआयचा क्रिकेटला ऑलिंपिक खेळ होऊ देण्याच्या योजनेला नकार". डेली मेल (इंग्रजी मजकूर) (लंडन). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
"आयसीसी अध्यक्ष डेव्हिड रिचर्डसनची विश्व टी२०ची पहिली फेरी १८ संघांची आणि सुपर १२ फेज असण्याची इच्छा" (इंग्रजी मजकूर). १६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
मॉर्टायमर, गेव्हिन (६ जून २०१३). अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट इन १०० ऑब्जेक्ट्स. सर्पेंट्स टेल. pp. ७६–७७. आय.एस.बी.एन. १८४६६८९४०६ Check |isbn= value (सहाय्य).
फ्लेचर, जेफ (जून १९९९). कॉलिन्स जेम क्रिकेट. हार्पर कॉलिन्स. पान क्रमांक २३४. आय.एस.बी.एन. ०००४७२३४०६ Check |isbn= value (सहाय्य).
सिंग, विकास (३० डिसेंबर २००३). "पाँटिंग इन ब्रॅडमन्स्क्यू अवतार". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी मजकूर). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
स्मार्ट, अलास्टेर (२० जुलै २०१३). "द आर्ट ऑफ क्रिकेट: इनफ टू लीव्ह यू स्टम्प्ड", द टेलिग्राफ. १८ मार्च २०१७ रोजी पहिले.
रोजनगार्टन, फ्रँक. अर्बन रेव्हॉल्युशनरी: सी.एल्.आर. जेम्स अँड द स्ट्रगल फॉर न्यू सोसायटी. युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिप्पी, २००७. आयएसबीएन ८७-७२८९-०९६-७, पा. १३४
मीकॅम, स्टीव्ह (६ जून २००९). "माँटमार्ट्रे, विथ युकॅलिप्टस". सिडनी मॉर्निंग हेराल्ड (इंग्रजी मजकूर) (फेयरफॅक्स). ३१ ऑगस्ट २००९ रोजी पाहिले.
"बीबीसी न्यूज – इन पिक्चर्स: कॅरेबियन क्रिकेट आर्ट, इन द मिडल ". १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
** एफडीसी १०१ क्रिकेट: डॉन ऑफ न्यू वर्ल्ड. १ मार्च २००७ मध्ये प्रकाशित. अ लिटील पिस ऑफ आर्ट अँड हिस्ट्री फ्रॉम ब्लेचले पार्क पोस्ट ऑफिस, मिल्टन केन्स MK3 6EB, युके. http://www.bletchleycovers.com
Staff, I. G. N. (17 मार्च, 2009). "The Greatest Graphics of All Time".
ब्लेनी, जेफ्री (२०१०). अ गेम ऑफ अवर ओन: द ओरिजिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल. ब्लॅक आयएनसी. pp. १८६. आय.एस.बी.एन. १-८६३९५-३४७-७ Check |isbn= value (सहाय्य).
de Moore, Greg (२००८). टॉम विल्स: हीज स्पेक्टॅक्युलर राईज अँड ट्रॅजिक फॉल. ॲलन अँड अनविन. pp. ७७, ९३–९४. आय.एस.बी.एन. ९७८-१-७४१७५-४९९-५ Check |isbn= value (सहाय्य).
टायगिएल, ज्युल्स (२०००). पास्ट टाईम: बेसबॉल ॲज हिस्ट्री. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. pp. १६. आय.एस.बी.एन. ०१९५०८९५८८ Check |isbn= value (सहाय्य).

संदर्भ ग्रंथाची यादी आल्थम, हॅरी (१९६२). अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट, व्हॉल्युम १ (ते १९१४). जॉर्ज ॲलन अँड अनविन. बिर्ले, डेरेक (१९९९). अ सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लिश क्रिकेट. ऑरम. आय.एस.बी.एन. १-८५४१०-७१०-० Check |isbn= value (सहाय्य). बॉवेन, रोलँड (१९७०). क्रिकेट: अ हिस्ट्री ऑफ इट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एरे अँड स्पॉट्टीस्वूड. मेजर, जॉन (२००७). मोअर दॅन अ गेम. हार्परकॉलिन्स. मॅककॅन, टिम (२००४). ससेक्स क्रिकेट इन एटीन्थ सेंच्युरी. ससेक्स रेकॉर्ड सोसायटी. अंडरडाऊन, डेव्हिड (२०००). स्टार्ट ऑफ प्ले. ॲलन लेन. बाह्यदुवे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) "क्रिकेट". ऑनलाइन एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका. साचा:Dmoz क्रिकइन्फ़ो(डॉट)कॉम – (cricinfo.com) [दाखवा]बचसं क्रिकेटचे प्रकार [दाखवा]बचसं क्रिकेट कौशल्य [दाखवा]बचसं क्रिकेट खेळात फलंदाज बाद होण्याचे प्रकार [दाखवा]बचसं सांघिक खेळ वर्ग: २०१८ मधील मुखपृष्ठ सदर लेखमुखपृष्ठ सदर लेखक्रिकेटखेळमैदानी खेळचेंडूचे खेळ दिक्चालन यादी श्वेता शिवाजीराव परुळेकर सजगता (1) सूचना(2) माझ्या चर्चामाझ्या पसंतीबीटामाझी निरीक्षणसूचीमाझे योगदानसनोंद-निर्गमलेखचर्चावाचास्रोत संपादित कराइतिहास पहापहाराअधिक शोध शोधा विकिपीडिया मुखपृष्ठ धूळपाटी कार्यशाळा साहाय्य/मदतकेंद्र अलीकडील बदल अविशिष्ट लेख चावडी दूतावास (Embassy) ऑनलाइन शब्दकोश दान इतर प्रकल्पात विकिमिडिया कॉमन्स छापा/ निर्यात करा ग्रंथ तयार करा PDF म्हणून उतरवा छापण्यायोग्य आवृत्ती साधनपेटी येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा विशेष पृष्ठे शाश्वत दुवा पानाबद्दलची माहिती विकिडाटा कलम लेखाचा संदर्भ द्या लघु यूआरएल(Short URL)

इतर भाषांमध्ये বাংলা English ગુજરાતી हिन्दी ಕನ್ನಡ മലയാളം தமிழ் తెలుగు اردو ११४ अधिक दुवे संपादा या पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१९ रोजी २०:२९ वाजता केला गेला. येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध