Jump to content

सदस्य:वैष्णवी भारत पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोन्साय
    बोन्साय म्हणजे मोठया झाडाचं रूपांतर छोट्या झाडात करणे व छोट्या  कुंडीत जगवलेले मोठे झाड.
    हि कला प्राचीन चीन मधली बागायती चा एक प्रकार, जी जपान ने पुन्हा  विकसित केली.
    जपानी मध्ये बोन्साय शब्दाचा अर्थ असा :-
बोन म्हणजे एक खोल पात्र
 साय म्हणजे त्या  पात्रात जगवलेले झाड.
     लहान झाडाला मोठ्या झाडाचा आकार म्हणजे बोन्साय झाड.
बोन्साय  तयार करण्यासाठी
    1. कापणी
    2. तारकाम
    3.आकार
1. कापणी
        कोणतही एक छोट झाड घ्या. झाडाच्या समांतर फांद्या मधील एक फांदी कापावी. समांतर फांद्या ठेवायच्या नाहीत. झाडाला फांदी हि ऊजवी, डावी कडे आणि  मागच्या बाजूला असाव्यात. बाकीच्या फांद्या कापाव्या.
      ज्या फांद्या खाली वाकत असलेल्या फांद्या पण कापाव्यात.
2. तारकाम
       झाडाचे तारकाम हे झाडाच्या आकार देण्यासाठी, ज्या फांद्या सरळ असतात त्यांना वळण देण्यासाठी. तारकाम करण्यासाठी हलक्या धातूची तार (अॅल्युमिनीयम) घ्यावी. झाडाच्या मुळ खोडा साठी जाड तार व बारीक फांद्या साठी बारीक तार.
    मुळ खोडाला आणि बाकीच्या फांद्यांना 45 अंश कोनात तार गुंडाळावी.
तार गुंडाळताना जास्त सैल गुंडाळू नये कारण त्याचा फायदा नाही  व फिट्ट गुंडाळू नये कारण मुळ खोड खराब होत.
3. आकार
        मुळ झाडाचा आकार मिळवण्या साठी बोन्साय ला आकार द्यावा लागतो.
     झाडाचे मुळ खोडाला नागमोडी आकारात वाकवावे. खोडाच्या फांद्या नागमोडी आकार दयावा.
      आकार देताना असा आकार द्यावा जेणे झाडाच्या फांद्या जवळ जवळ नसतील. समांतर फांद्या येऊ दयायच्या नाहीत.
 
 आता झाड बाहेर काढूण ,झाडाच्या खालच्या बाजूची माती काढूण घ्यावी आणि झाडाची मोठी मूळ कापावी, छोटी मळे कापली झाड जगणार नाही.  मोठी मूळ कापल्यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाड छोट्या आकारात जगतं.
     एका 2.5 ते 3 इंच च्या पात्रात हे झाड लावावे. त्या पात्राला 2 बुळूके मारावीत जेणेकरून पाणी वाहून जाईल.  तया पात्रात माती टाकावी ( माती ही नदीतली असावी, त्यात खत, छोटे अर्धा इंचाचे दगडं टाकावीत). एका छोट्या काटीने त्या पात्रातील हवा काढून घ्यावी त्यामुळे माती मुळां पर्यंत पोहोचते.
     आता झाडाला कारंज्या सारखं पाणी द्यावे

चित्र:बोन्साय.jpg
चित्र:बोन्साय पात्र्.jpg
बोन्साय पात्र्
बोन्साय