सदस्य:विष्णू वासमकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलिंग्डन महाविद्यालय विलिंग्डन महाविद्यालयाची स्थापना १९१९ मध्ये झाली पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी (स्थापना १८८४) हे महाविद्यालय संलग्न आहे . महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गोविंद चिमणाजी भाटे हे होते. या महाविद्यालयाची मोठी परंपरा आहे.या महाविद्यालयात मान्यवरांनी शिक्षण घेतले आहे.उदा. बॅ.पी.जी.पाटील, पु. ल.देशपांडे ,माजी उप राष्ट्रपती बी.डी.जत्ती, सुभाष भेंडे , म.द.हातकणंगलेकर, मालतीबाई किर्लोस्कर , डॉ.एन.बी.पाटील( शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू),वसंत कानेटकर इ.या महाविद्यालयातील प्राध्यापकांची परंपरा मोठी आहे.त्यामध्ये गुरुदेव रा.द.रानडे, प्रा.श्री.जोग,डॉ.वि.रा.करंदीकर,कवी गिरीश, गं.ना.जोगळेकर प्रा.म.द.हातकणंगलेकर इत्यादींंचा समावेश होतो.