सदस्य:विजयालक्ष्मि अप्पाराव चोरगी/20ऑगस्ट कार्यशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'कल्पतरू'कार लक्षमण गोविंद तथा तात्यासाहेब काकडे लक्षमण गोविंद तथा तात्यासाहेब काकडे हे 'कल्पतरू आणि आनंदवृत्त' या सोलापुरातल्या आद्य साप्ताहिकांच्या संपादकीय परंपरेतील चोईथे होते.पारतंत्र्यात त्यांनी लेखणीद्वारे समाजमन घडविण्याचा ते सदृढ करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला.तुरुंगात न जातही राष्ट्राकार्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रोधारक विचारांचा आदर्श घालून देणाऱ्या लाक्ष्मनरावांनी नामदार गोखले आणि न्यायमूर्ती रानड्यांच्या सुधारणावादी विचारांची परंपरा लेखणीच्या माध्यमातून तब्बल ४८ वर्षे समर्थपणे पुढे चालविली.
लक्ष्मणरावाचा जन्म १८ नोव्हेंबर १९०५ रोजी झाला. त्याचं शिक्षण नॉर्थकोट शाळेत फक्त दहावी पर्यंत झालेलं होत. परंतु उपजत बुद्धी आणि घरातल्या संस्कारसंपन्न वातावरणामुळे १९२८ ते १९७६ असा प्रदीर्घ काळ ते संपादकीय जबाबदारी समर्थपणे पेलू शकले. त्यांचे वडील गोविंदराव हे झुंझार आणि स्वाभिमानी संपादक होते. त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव तात्यासाहेब काकडे यांच्याकडे आपल्या हयातीतच १९२८ साली संपादकाची जबाबदारी सोपवली.
आतापर्यंत सोलापुरात त्यांच्याएवढा प्रदीर्घ काळ संपादक म्हणून काम करण्याचा योग आणि लाभ इतर कुणालाही मिळालेला नाही.
फावल्या वेळेचा उद्योग किंवा पैसा मिळविण्याच साधन म्हणून त्यांनी पत्रकारिता केली नव्हती तर सामाजिक जाणीव निर्माण करनं, स्वत्रंत्र चलावलीबाबत शैथिल आणि उदासीनता निर्माण झालेल्या समाजाला चेतना देन या हेतूने त्यांनी आपली संपादकीय लेखणी चालविली. त्यांच्या ४८ वर्षांच्या संपादकीय कार्याकीर्दीत कल्पतरू हे साप्ताहिक १९३० सालात फक्त एकाच वर्षी नुकसान न होता फायद्यात चालेला. येणारा तोटा त्यांनी एल आय सी येजेंत म्हणून मिळणाऱ्या मोबादल्यातून भरून काढला. 

  1. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ

प्रा.डा.श्रीकांत येळेगावकर