सदस्य:विकी रामचंद्र बाचिम
जय शिवराय..! जय शंभूराजं..!
महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण
२१ व्या शतकात मानवाने अनेक शोध लावले आणि मानव त्याच्या बुद्धी च्या बळावर एका उंच शिखरावर पोहोचला आहे. यात एक लाजीरवाणी गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे,ती म्हणजे महिला..!
बुद्धिमत्तेने तल्लीन पण विचाराने शुन्य असे हे जीवन आहे मानवाचे. ह्या आधुनिक युगात देखील स्त्री-पुरुष विषमता यासारखी अतिशय तुच्छ दर्जाची रीत चालू आहे. भारतातील काही गावांमध्ये स्त्री यांनी पुरुषांसमोर येणे, त्यांच्या बरोबर जेवण करणे आज देखील नाकारले जाते. पत्नी हवी, आई हवी पण तीला योग्य तो दर्जा देण यत नाही..
मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे कितपत योग्य आहे, त्यांना ही समान शिक्षणाचा अधिकार आहे. तसे राज्यघटनेत नमुद केले आहे, तरीही याचा विरोध केला जातो. महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या पत्नी साक्षर करून पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यावेळेस त्यांना समाजाचा रोष पत्कारावा लागला.. पण ह्या आधुनिक युगात देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होणे हे कुठेतरी चूकीचं आहे. तरीही शासनाकडून अनेक योजना आणि सुविधा देण्यात येत आहत मुलींना शिक्षणापासून दुर्लक्षित ठेऊ नयेत म्हणून.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,शाहूमहाराज, राममोहन रॉय यांसारख्या अनेक महामानवांनी स्त्रियांना समाजात योग्य दर्जा मिळावा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत म्हणून वेळोवेळी अनैतिक आणि अविचारी चाली-रीती मोडून काढल्या. आज अनेकजण ह्या महामानवांनी पुजतात त्यांच्या ख्याती गातात पण त्यांनी काय केले त्यांचे थोर विचार, कार्यपद्धती यांकडे मात्र दुर्लक्ष..
समाजात जर महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त करून द्यायचे असतील तर प्रथम ह्या समाजविरोधी लोकांचे मतपरिवर्तन करणे हाच पर्याय. शासन आज अनेक प्रकारच्या योजना आणत आहे पण याची माहिती तळागाळापर्यंत पोहचताना कुठेतरी कठीण आहे. म्हणून स्थानिक समाजसेवी मंडळे, महिलाबचतगट तसेच मदतीला पोलीस वर्ग यांच्या सहाय्याने छोटेमोठे उपक्रम करून याची जनजागृती करता येईल. हाच एकमेव पर्याय..!
उदा. मुंबई, मालाड आप्पापाडा विभागात शिवस्वराज्य निर्मिती प्रतिष्ठाण अंतर्गत महिला फेडरेशन आणि महिलाबचतगट सह पोलीस वर्गासह महिला सुरक्षा यांवर उपक्रम राबविण्यात येत आहेत.