सदस्य:वनिता पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. वनिता पटवर्धन, एम्. एड्., पीएच्. डी. (मानसशास्त्र)

·        प्रज्ञा मानस संशोधिका, ज्ञान प्रबोधिनी येथे मानद प्राध्यापक. तेथे सुमारे ४० वर्षे काम.

·        मानसशास्त्रातील Psychometry, Organizational Behavior/Industrial Psychology, Educational Psychology, Guidance & Counseling या शाखांमध्ये विशेष काम.

·        बुद्धिमत्ता, विचार प्रक्रिया, मनोमापन, प्रतिभा विकसन, वाचन व अभ्यास कौशल्ये, स्त्री नेतृत्व, निर्णय क्षमता, भावनिक समृद्धी, कणखर व्यक्तिमत्त्व, संघकार्य, प्रशिक्षण पद्धती, संशोधन पद्धती, पालकत्व, योग असे अभ्यासाचे विषय.

·        पदव्युत्तर, पदवीपूर्व वर्गांना अध्यापन; संशोधन; प्रशिक्षण; मार्गदर्शन व समुपदेशन असा चौफेर अनुभव

·        एकूण १९ चाचण्या, पुस्तके, पुस्तकातील प्रकरणे, इ. स्वतंत्र/संयुक्त प्रकाशित; तसेच अनेक लेखही प्रसिद्ध.

·        Assessment of Competencies for Enhancement (ACE) या भारतातील पहिल्या प्रौढांच्या online मानसशास्त्रीय चाचणी संचाच्या निर्मितीमध्ये प्रमुख सहभाग.

·        एकूण २९ शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रसिद्ध. सा. फु. पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्रातील पीएच्. डी. पदवीसाठी ७ विद्यार्थ्याना मार्गदर्शिका. स्वतःचे छोटे-मोठे १८ संशोधन प्रकल्प पूर्ण. अनेक संस्थांना संशोधनाविषयी मार्गदर्शन. अनेक परिषदांमध्ये विशेष सहभाग.

·        हजारो जणांना – विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, नोकरदार, अधिकारी, महिला - मनोमापन करून मार्गदर्शन; तसेच त्यांना अनेक soft skills विषयी प्रशिक्षण. त्यानिमित्त भारतभर प्रवास.

·        ह्युस्टन, ब्लुमिंग्टन (अमेरिका); नॅाटींगहॅम, ग्लासगो (यु. के.); अस्मारा (आफ्रिका); सिंगापूर येथेही प्रशिक्षण, संशोधन, अध्यापन केले.

·        मान्यताप्राप्त योग शिक्षिका

·        आकाशवाणी पुणे केंद्रावर मानसशास्त्राविषयी नियमितपणे काही कार्यक्रम.