सदस्य:राजेश शेंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दस पारमित शिलाचार :- पंचशील जिवनाचा पाया मजबुत करणे. सदाचार :- आर्यअष्टांगीक मार्ग जिवनातील दुःखाचा समूळ नाश. सदगुनाचार :- म्हणजे दस पारमिता. बुद्धाच्या दिशेने वाटचाल किंवा अरहंत पदाला पोहचण्याची शिली म्हणजे दस पारमिता होय. पारमिता म्हणजे पुन्याचा संचय करणे. पार+मिता = पारमिता भाव चक्राच्या पलीकडे जाणे, संसार सागरा पलीकडे जाणे. १. शील पारमिता :- शील म्हणजे पवित्र चरित्र, शील म्हणजे नैतिकता अकुशल पासून अलिप्त आणि कुशल करण्याची प्रवृत्ती बाळावने, शील म्हणजे पाप भिरुता शिलाचा सुगंध सर्वत्र दरवळतो. धम्म पदातील ही गाथा आपण पाहु. ५४. न पुप्फ गन्धो पटिवातमेति, न चन्दनं तगरमल्लिकावा सतञ्च गन्धो पटिवातमेति, सब्बा दिसा सप्पुरिसो पवायति। (चंदन, तगर, कमल अथवा जूही – इन (सभी) की सुगंधों से शील-सदाचार की सुगंध बढ़-चढ़ कर है।) अर्थ :- फुलांचा सुगंध किंवा चंदन, जाई व मोगऱ्याचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही. मात्र सज्जनाच्या शिलाचा सुगंध वाऱ्याचा दिशेने तर वाह्तोच, परंतु सर्वही दिशांना सत्पुरुष आपला सुगंध पसरवित असतात. ५५. चन्दनं तगरं वापि, उप्पलं अथ वस्सिकी एतेसं गंधजातानं, सीलगन्धो अनुत्तरो। (तगर और चंदन की गंध, उत्पल (कमल) और चमेली की गंध – इन भिन्न-भिन्न सुगंधिकों से शील की गंध अधिक श्रेष्ठ है।) अर्थ :- चंदन, तगर किंवा कमल तसेच जाईचा सुगंधापेक्षाही शिलाचा सुगंध सर्वश्रेष्ठ होय. जेतवन विहारात विहरत असताना व भंते आनंद यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना भगवंतानी या दोन्ही गाथा म्हटलेल्या आहेत. एका संध्या समयी भंते आनंद, गंभीर ध्यानातून उठुन बुध्द जेथे बसले होते, तेथे बुद्धाजवळ जाऊन ध्यानात असताना निर्माण झालेला प्रश्न त्यांचा समोर व्यक्त केला. तो प्रश्न असा की, “भगवान अशा तीन वस्तु आहेत की, ज्यांचा सुगंध फक्त वाऱ्याच्याच दिशेने वाहतो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने नव्हे. जसे मुळांचा सुगंध चंदनाचा सुगंध, आणि फुलांचा सुगंध, परंतु भगवान अशी एखादी वस्तू जगात आहे का? की ज्याचा सुगंध वाऱ्याच्याच दिशेने नव्हे, तर उलट दिशेने ही वाहु शकतो.” भगवंतानी याचे उत्तर देतांना म्हटले, “आनंदा अशी एक वस्तु आहे की, ज्याचा सुगंध नुसत्या वाऱ्याच्याच दिशेने नव्हे तर उलट दिशेने किंवा सर्व दिशांनाही वाहत असतो. आणि तो आहे शिलाचा सुगंध .” आनंद या जगातील एखादी व्यक्ती, बुद्धाला शरण जात असेल, धम्माला शरण जात असेल, संघाला शरण जात असेल जी व्यक्ती जीव हत्ये पासून अलिप्त राहत असेल, न दिलेले घेत असेल, कामवासने पासून अलिप्त राहत असेल, असत्य बोलण्यापासून अलिप्त राहत असेल, कुठलेही मति गुंग करणारे मद्य किंवा वस्तु सेवन करीत नसेल, व अशा तऱ्हेने सदाचारी गृहस्थी जिवन जगत असेल, ज्यास द्रव्य लोभाचा कलंक नसेल, जी व्यक्ती स्वतंत्र्य आणि उदार असेल, जी व्यक्ती मुक्त हस्ते दान करीत असेल, जी व्यक्ती दयाळु असेल, जी व्यक्ती भिक्षादानात आनंद मानत असेल, भिक्षुगणात ज्याची स्तुती केली जात असेल, अशी व्यक्ती खेड्यातील असो की शहरातील, ती स्त्रि असो की पुरुष अशा व्यक्तीचा या कुशल कर्माचा सुगंध त्या शिलाचा सुगंध आनंद हा वाऱ्याचा दिशेने ही नाही, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही वाहतो. असे सांगुन भगवंतानी वरील ५४ आणि ५५ गाथा म्हटल्या. म्हणून एका कवीने म्हटले आहे. शिलाला जिवनात जपाचे, गेले जरी सर्वस्व शीलवंताच्या चरणी नमते, विश्वातील वर्चस्व शील अभंग राहीला आपुले, असा रहा कटिबद्ध गेले सांगुन बुध्द , गेले सांगुन बुध्द २. दान पारमिता :- द्रव्य दान, विद्यादान, धर्म्विद्यादान, गरीबासाठी दिलेले दान, संकट काळी दिलेले दान. दानाचे विशेषता ३ (तिन) प्रकार आहेत. १) कनिष्ठ दान २) मध्यम दान ३) सर्व श्रेष्ठ दान. १) कनिष्ठ दान :- हे फक्त अशा देऊन दिलेले दान, आपल्याला ह्या दानातून काही तरी प्राप्त होईल ही आशा जो बाळगतो ते कनिष्ठ दान. २) मध्यम दान :- हे दोन्हीच्या फायद्याचे दान, त्या मध्ये दान देणारा आपला काही फायदा होईल त्या हेतूने दान देतो, ते दान घेतल्या मुळे दान घेणाऱ्याचा सूद्धा फायदाच असतो, ते मधयम दान. ३) सर्व श्रेष्ठ दान :- देणाराचा कोणत्याच प्रकारचा फायदा नसतांना दिलेले निस्वार्थ दान. दुसऱ्याच्या कल्याणा करिता आपली संपती, रक्त, शरिराचे अवयव, एवढेच नव्हे तर आपल्या प्राणाचे ही बलिदान करणे म्हणजे सर्व श्रेष्ठ दान. उदा. सम्राट अशोकाचे दान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दान, विशाखाचे दान, सुकेशनी चे दान तिने आपले सुंदर लांब केस दान केले. जसे एका कविने म्हटले आहे. जिवाला जीवाच दान, माझ्या भिमाने केल. झिजऊन जीवाच रान, माझ्या भिमाने केल. ३. उपेक्षा पारमिता :- उपेक्षा म्हणजे अनासक्ती फळांची आशा न करिता निरपेक्ष भावनेने साधना करण्यात मग्न असते. उपेक्षा म्हणजे चांगला किंवा वाईट गोष्टीची अपेक्षा न करता सतत प्रयत्न करणे, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिथी. मनुष्याने फळ प्राप्तीच्या आपेक्षेने विचलित न होता सतत प्रयत्न करणे म्हणजे उपेक्षा पारमिता होय.

८१ सेलो यथा एक घनो, वातेन न समिरति एवं निन्दापसन्सासु, न समिञ्जन्ति पण्डिता। (जैसे सघन शैल-पर्वत वायु से प्रकंपित नहीं होता, वैसे ही समझदार लोग निंदा और प्रसंसा (वस्तुत: आठों लोक धर्मों) से विचलित नहीं होते।) अर्थ :- ज्या प्रमाणे भरीव आकाराचा डोंगर वाऱ्याने हालत नाही त्या प्रमाणे निंदा किंवा स्तुतीनेही पंडित विचलित होत नाही. उदा. श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असतांना भगवान बुध्दानी ही गाथा भिक्षु भादियाला उद्देशुन म्हटलेली आहे. जेतवन विहीरात राहणाऱ्या अनेक भिक्षु मध्ये भद्दीय नावाचा एक भिक्षु राहत असे. तो शरीराने ठेंगणा असल्यामुळे भिक्षु त्याला लंकूटक भद्दीय म्हणत असत. तो स्वभावाने उत्तम असल्यामुळे श्रामणेर भिक्षु सुद्धा त्याचे नाक किंवा कान ओढुन अथवा डोक्यावर थापटी मारून त्याला त्रास देत असत. ते त्याला नेहमी गमतीने ‘काका, आपण कसे आहात? आपण ह्या भिक्षु जिवनात सुखी आहात की कंठाळलात?’ यावर लंकुटक भद्दीय आपली प्रक्रिया कधीही व्यक्त करीत नसे, किंवा त्याला त्याचा राग ही येत नसे. तो कोणावरही न रागवता हृदयाने सुद्धा शांत व अविचल असे. जेव्हा त्यांचा अशा सहन शीलते बद्दल काही भिक्षुंनी बुध्दाना विचारले, तेव्हा बुध्द म्हणाले “अर्हंत कधी कोणावर रागवत नसतात. कोणाला कठोर बोलण्याची त्यांची कदापि इच्छा नसते, किंवा दुसऱ्या बद्दल ते कधीही वाईट विचार करित नसतात. ते भरीव पर्वता सारखे आढळ व निच्छल असतात. त्याचप्रमाणे अर्हंतांना निंदा किंवा स्तुतीही संतप्त किंवा गर्विष्ठ करू शकत नाही. ते कोणत्याही परिस्थितीत अविचल असतात. “असे सांगुन भगवंतानी वरील गाथा म्हटली आहे. प्रशंसा आणि निंदा अशा दोन्ही वेळी जिवनाच्या स्थित्यंतरात सामान्य लोक लवकरच विचलित होतात. एखादी गोष्ट चुकीची किंवा हानी कारक झाली की ते लगेच उदासीन होतात. व चांगली गोष्ट घडली की अत्यानंदाने किंवा गर्वाने फुगून जातात. माणसे जिवनात आठ प्रकारच्या स्थित्यंतराना तोंड देत असतात. लाभो, अलाभो, अयासो, यासोच निंदा, पसंसा, सुख, चदु:ख एते, अनिध्या मनुजेसू. धम्मा सस्सती विपरीणाम धम्मा. अर्थ :- १) नफा, २) तोटा, ३) दुर्लक्ष, ४) लक्ष, ५) अपमान, ६) स्तुती, ७) सुख, ८) दु:ख ही माणसाच्या जिवनातले स्थित्यंतरे आहेत. ते सतत बदलत असतात, परंतु शहाणे लोक त्याच्या कडे उपेक्षा भावनेने पाहुन अविचल राहतात. यालाच उपेक्षा पारमिता म्हणतात. ४. नैश्र्कम्य पारमिता :- नैश्र्कम्य म्हणजे संसारी काम भोगाचा त्याग ऐहिक सुखाचा त्याग करणे म्हणजे नैश्र्कम्य पारमिता होय. बुध्द एक वैद्य आहेत, ज्या प्रमाणे वैद्य निरनिराळ्या आजाराचे प्रथम निदान करतो, नंतर त्याचे कारण जाणतो, नंतर ते आजार निवारण्याचे औषध व उपाय सांगतो. व ते उपाय लागु करून, मनुष्याला आजार मुक्त करितो. त्याच प्रमाणे बुध्दानी चार आर्य सत्य शिकवले.

जे दु:ख दाखवितात त्या दुःखाचे कारण सांगतात. त्या दुःखाचे निवारण होऊ शकते. आणि त्या दुख निवारणाचा मार्ग पण सांगतात. म्हणून भगवान बुध्दानी दुःखाचे खरे मुळ हे तृष्णेत आहे तृष्णाचा त्याग म्हणजे नैश्र्कम्य पारमिता होय. ५. वीर्य पारमिता :- वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न, जे एकदा करण्याचा निश्चय केला ते पूर्ण झाल्या शिवाय न थांबवणे. वीर्य म्हणजे उत्साह, पराक्रमी, जिज्ञासु वृत्ती असणे, स्वबळाने दुर्गुनावर विजय मिळवणे, कुशल मार्गाचा संकल्प करून तो पूर्णत्वासनेणे म्हणजे वीर्य पारमिता होय. वीर्य हे पंचेंद्रियापैकी दुसरे धम्म इंद्रिय होय. वीर्य म्हणजे काय? वीर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न हाती घेतलेले काम यात्किंचाही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य होय. सत्कृत्य करण्यासाठी लागणारा उत्साह किंवा शक्ति असणे. शक्ति किंवा उत्साहाद्वारे अनेकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडणे. निरर्थक गोष्टींचा पाठपुरावा करण्यात आपला वेळ न घालविणे याला वीर्य म्हणतात. आपल्याला दैनदिन जिवनाच्या कालप्रवाह मध्ये अनेक संकटे अनेक समस्या असतात. त्यापैकी काही समस्या आपल्या आवरण्या बाहेरच्या देखील असतात. म्हणुन या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सारखी धावपळ करावी लागते. आपल्या संसारामध्ये निरनिराळ्या गरजा असतात. त्यांची पुर्तत्ता करण्यासाठी आपण मोठया उत्सहाने जिद्दीने प्रयत्न करीत असतो. त्याचे कारण काय? तर आपल्या संसारामध्ये आपल्यावर अवलंबुन असलेले कुटुंब (पत्नी, मुले, आई, वडील इत्यादि) या कुटुंबातील सर्व लोकांना सुख समाधान लाभावे. आपला संसार सुखाने चाललाय हे पाहून चार चौघांनी आपली स्तुती करावी. या साठी आपण प्रयत्नाची पराकाष्टा करितो. यातच आपण आनंद व समाधान मानतो. या उत्स्हालाच आपण वीर्य समजतो कारण वीर्य नसेल तर कोणती गोष्ट पूर्णकरता येत नाही. वीर्याशिवाय यशच नाही. भगवान बुध्दानी उपदेशिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गात विर्या संबंधी उपदेश आढळतो. याला सम्यक व्यायाम म्हटल्या जाते. सम्यक व्यायाम चार प्रकारचा सांगितला असून याला सम्यक प्रयत्न देखील म्हणतात. १. पहिला प्रयत्न :- आपल्या मनातील कुविचार, वाईट विचार अथवा अकुशल भावना नष्ट करण्याचा प्रयत्न. २. दुसरा प्रयत्न :- कोणताही प्रकारचा वाईट विचार अथवा कोणत्याही प्रकारचा अकुशल भावनांना निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न. ३. तिसरा प्रयत्न :- आपल्या मनात असणाऱ्या सुविचारांची आणि कुशल भावनाची वाढ करण्याचा प्रयत्न. ४. चौथा प्रयत्न :- आपल्या मनात नसलेल्या सुविचारांची आणि कुशल भावनाची वाढ करण्याचा प्रयत्न अश्या चार प्रकारचा ह्या साम्यक प्रयत्नांना साम्यक व्यायाम म्हणतात. प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण अनुयायी आहोत. तळागाळातील शोषित पिडीत बांधवांच्या मुलभूत हक्कासाठी बाबासाहेबांना अनेक संकटाशी झुंज द्यावी लागली अनेक धोके त्यांनी पत्कारले. तसेच अनेक आमिष त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. तरी देखील आपल्या ध्येय पुर्तीसाठी त्यांनी कोणत्याही प्रकारे माघार घेतली नाही. हे कशाचे प्रतिक आहे? तर हे वीर्याचे प्रतिक होय. आपण हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे म्हणजे वीर्य पारमिता होय. ६. शांती पारमिता :- शांतीचा अर्थ क्षमा शीलता घृणे ने घृणा संपत नाही. तर क्षमा शीलतेनेच घृणेचा नाश होतो. हि वरेण वेरानी सम्मन्तीध कुदाचन, अवेरेनेच सम्मंती एस धम्मो सनन्तनो अर्थ :- वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैराणेच वैर शांत होत असते. हाच ह्या जगाचा सनातन नियम आहे. आणि भगवान बुद्धाच्या तत्वाचे बाबासाहेब वेळोवेळी तंतोतंत पालन केलेले आढळते आणि म्हणुनचते बुद्धाचे खरे शिष्य जिवन भर बाबा साहेबांनी शील, समाधी, प्रज्ञेचा अंगिकार केला. बाबासाहेब अभिमानाने सांगत असत की, माझ्या शिलाकडे बोट दाखवण्यासाठी हिम्मत कोणी करू शकणार नाही, बाबासाहेबांची शांतीची व्याख्या हि बुद्धाच्या शांतीशी होती. (विपस्सना करणारे किंवा एलोक्य बौद्ध महासंघ, शोषक, वर्गाबद्दल द्वेष न बाळगताही त्यांच्यावर मंगल मैत्रीची कामना करायला शिकवतात. व अशा गांधीवादी विचारसरनीची बाबासाहेबांना चिड होती. बाबासाहेब गांधी पेक्षा ही शांतिवादी होते. अन्यथा महाडच्या मुक्ती संग्रामात रक्ताचा सडा पडला असता का? लाठ्या काठ्या खाऊन ही रक्तबंबाळ होऊन ६ वर्ष सत्याग्रह चालवणारा महामानव शांतीप्रिय नव्हता काय? भीम सैनिक जीवाची बाजी लावून हिंसेस हिंसेनेच उत्तर देण्यास सिद्ध झाले असतानाही त्यांना आवर घालून हिंसा सहन करण्यास सांगणारा महामानव शांतीदूत नव्हता काय? योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन शांतता निर्माण करणे हीच शांति पारमिता होय. ७. सत्य पारमिता :- सत्य म्हणजे खरे, मुसावादा न करने केवळ सत्यच बोलणे सत्या खेरीज काही नाही. ११ असारे सारमतिनो, सारे चासारदस्सिनो ते सारं नाघिगच्छन्ति, मिच्छासङकप्पगोचरा। (जो असार को सार और सार को असार समझते हैं, ऐसे गलत चिंतन में लगे हुए व्यक्तियों को सार प्राप्त नहीं होता।) अर्थ :- जो असत्यास सत्य व सत्यास असत्य मानीत असतो व वाईट विचारामध्ये जो रनमाण होत असतो अशा व्यक्तीस सत्याचा लाभ कधी ही होऊ शकत नाही.

12.सारञ्च सारतो ञत्वा, असारञ्च असारतो ते सारं अधिगच्छन्ति, सम्मासङकप्पगोचरा। (सार को सार और असार को असार जान कर सम्यक चिंतन वाले व्यक्ति सार को प्राप्त कर लेते हैं।) अर्थ :- जो सत्यास सत्य व असत्यास असत्य मानतो आणि जो योग्य विचारामध्ये (सम्यक संकल्पामध्ये) संलग्न असतो. अशा व्यक्तीस सत्याचा लाभ होत असतो. राजगृह येथील वेळूवनात विहरत असतांना भगवंतानी वरील दोन गाथांचा उच्चार केलेला आहे. भगवंताचे मुख्य शिष्य सारी पुत्र आणि महामोग्गालायन यांचे पूर्व श्रामिचे गुरु संजय यांच्या संदर्भात त्यांनी या गाथांचा उच्चार केलेला आहे. राजगृहाचा आसपास ब्राम्हणाची वस्ती असलेली दोन खेडी होती. एक उपत्तीस व दुसरे कोलीत. उपत्तीस खेडयातील सपसारी व त्याच दिवशी कोलीत खेडयातील मोग्गली यांनी मुलांना जन्म दिला. दोन्ही मुलांची नावे त्यांच्या गावाच्या नावावरून ठेवले. जसजसे हे मुल मोठे होऊ लागले तसे ते सर्व कला गुणांमध्ये, कलांमध्ये, विज्ञाना मध्ये प्राविण्य मिळवित होते. दोघे ही श्रेष्टींची मुले असल्यामुळे जेव्हा जेव्हा ते नदी वर मौज मजा करण्यासाठी येत असत तेव्हा त्यांच्या बरोबर रथ व लवाजम्या सहित प्रत्येकाचे ५००-५०० मित्र त्यांच्या बरोबर असायचे. राजगृहात दर वर्षी पर्वत शिखरावर सण साजरा होत असे त्या वेळी ह्या दोन्ही साठी उंच मंच उभारण्यात येत असे तेथे बसुन ते सकाळी मजालुटत असत. परंतु ते जस जसे मोठे होत गेले तसे त्यांच्या मनात त्या मौज मजे विषयी टीटकारा येऊ लागला. ती मौज मजा त्यांना व्यर्थ वाटू लागली. त्या दोघांनी विचार केला कि या मौज मजे मध्ये काही सार नाही यात मुक्तीचा मार्ग नाही. म्हणून मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी त्यांनी गुरूचा शोध घेण्याचे ठरवले. त्याच वेळी संजय नावाचा संन्यासी त्याच्या अनेक शिष्यासोबत राजगृहात आले होते. ते बघताच त्या दोघांनी शिष्यत्व पत्कारले. ते ५०० मित्रासह त्याचे शिष्य झाले. थोडयाच दिवसात संजय कडे असलेल्या सर्व विद्यामध्ये ते प्रवीण झाले. व मग त्यांनी त्याला विचारले की महाराज आपण जाणत असलेले अध्यात्मिक सत्य एवढेच आहे की? या ही पेक्षा काही जास्त असण्याची शक्यता आहे? व तेच संपूर्ण सत्य असून या पेक्षा दुसरे सत्य असण्याची शक्यता नाही. परंतु संजयच्या उत्तराने त्या दोघांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याचे आश्रम सोडून परत दुसऱ्या गुरूच्या शोधात निघाले. त्यांनी एक मेकासी करार केला की ज्याला कोणाला असा गुरु पहिल्यांदा भेटेल. त्याने दुसऱ्याला खबर द्यायची. एक दिवशी उपत्तीसाने राजगृहात आयुष्यमान अधाजीत यांस भिक्शांत करताना पाहिले त्यांची संयमित चाल, खाली नजर, सुआच्छादित चिवर, शांति व तेज कांती युक्त चेहरा बघून तो फारच प्रभावित झाला. हि व्यक्ती अरहंत किंवा त्या मार्गावर अरूढ असली पाहिजे. त्यांनी विचारण्या साठी तो त्यांचा मागे मागे चालु लागला. त्यांची चारिका पर्ण झाल्यावर एकांतात आहार घात असताना तो त्यांचा समोर बसून वंदन करून विचारले. महाराज आपण कोणाच्या प्रेरणेने परिव्राजक झालात. आपण कोणाची शिकवणूक अंगी कारली आहे? मी शाक्यमुनी भगवान बुद्धाचा शिष्य आहे. त्यांनी शिकवलेल्या धम्म मार्ग तुम्ही मला थोडक्यात सांगाल काय? उपत्तीसाने अश्वजीतांना विचारले. भिक्षु अश्वजीतांनी धम्माचा सार खालील प्रामाणे केला. ये धम्मा हेतुप्पभवा, तेस हेतु तथागथा आह | तेसच्च यो निरोधो, एवंवादी महासमणो || जे काही कारणांनी उत्पन्न होते. त्याचे कारण तथागत सांगतात. हाच महाश्रामांचा वाद आहे कथन आहे, शिकवण आहे. भिक्षु अश्वजीतांन वरील वाक्य उच्चार तोच परिव्राजक उपतीस्सास श्रोतापत्तीफल प्राप्त झाले. नंतर त्याने तथागथांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्याचा अगोदर तो त्याचा मित्र कोलीत यास भेटून सर्व वृतांत कथन केला नंतर त्या दोघांनी भगवान बुध्दाना भेटण्याचे ठरविले. व आपल्या बरोबर आपला आचार्य संजय व त्यांचा ५०० मित्रांना बरोबर घेण्याचे ठरविले. संजयने नकार दिला परंतु त्याचे २५० मित्र भेटण्यास तयार झाले. संजय यांनी तथागथाचे शिष्य होण्यास नकार दिला. आचार्य संजय म्हणाले भूतकाळात मी अनेक लोकांच्या गुरुस्थानी राहिलो असल्यामुळे आता मी कोणाचा शिष्य म्हणून राहणे माझ्यासठी असमंजस व मुर्खपणाचे होईल. म्हणुन मी आपल्या सोबत येऊ शकत नाही “महाराजा आपण असे म्हणू नका” उपतीस्स म्हणाला ज्या क्षणी ह्या जगात बुद्धाचे अवतरण झालेले आहे. त्या क्षणापासून बहुजन समाजाने त्यांना गुरुस्थानी त्यांची पुजा केलेली आहे. चला आपण सारे तिथे जाऊया संजय म्हणाला मित्रांनो या जगात संख्येने जास्त कोण आहेत? मुर्ख की शहाणे? उपतीस्स म्हणाला महाराज मुर्ख, शहाणे फारच कमी आहेत. त्यावर पुन्हा संजय म्हणाला ठीक मग सर्व शहाण्या लोकांना गौतमा कडे जाऊद्या, व सर्व मुर्खांना माझ्या कडे राहुद्या. संजयचे असे उत्तर ऐकून परिव्राजक, उपतीस्स व कोलीत २५० मित्रासह जे संजयचे शिष्य होते. गौतम बुद्धा कडे गेला. कालांतराने उपतीस्स आणि कोहित अरहंतपद प्राप्त करून बुद्धाचे मुख्य शिष्य म्हणुन प्रसिद्ध झाले. उपतीस्साने सारीपुत व कोलीताने महामोग्गालायन असे नाव धारण केले. बुद्धाच्या भेटीच्या वेळी संजयशी वर झालेला संवाद त्यांनी विषद केला. व संजय बुध्दालाभेटणार नाही याचे कारण सांगितले त्यावेळी बुध्दाने वरील दोन गाठ म्हटल्या व समजावले की माणसाने सत्य गोष्टीस सत्य व असत्य गोष्टीस असत्यच मानले पाहिजे. जे लोक सत्यास असत्य व असत्यास सत्य मानून सम्यक संकल्प न करता मित्था संकल्प अनुसरतात त्यांना सत्याचा लाभ (निर्वाणाचा साक्षात्कार) कधी ही होऊ शकत नाही. म्हणुन नेहमी सत्य अनुसरले पाहिजे हीच सत्य पारमिता होय. ८. अधिष्टान पारमिता :- अधिष्टानाचा अर्थ आहे आपल्या उद्देशा पर्यंत पोहचण्याचा द्रुड निश्चय. उदा. भगवान बुध्द शेवटी ज्ञान प्राप्ती साठी बोधी वृक्षाखाली बसले त्या वेळेस त्यांनी द्रुड निश्चय केला की मला कितीही कष्ट झाले अंगातील रक्त आटल, मास गळुन पडले, तरी मला काही तरी ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय मी या ठिकाणाहुन उठणार नाही. तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली घोषणा केली मी हिंदु धर्मात जन्मलो परंतु हिंदु धर्मात मरणार नाही. आणि त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ ला बौध्द धम्माचा स्विकार केला. बऱ्याच लोकांनी काही घोषणा केल्या जसे ‘स्वराज हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ -लोकमान्य टिळक जे लोकांना मान्य नाही ते लोकमान्य स्वराज न पाहताच निघून गेले. तुम मुझे खून दो मै आपको आझादी दुंगा – सुभाषचंद्र बोस पण कुठे बेपत्ता झाले अजुन सापडले नाही. बाबा साहेब म्हणाले की पाय उचलला एकदा तर करीन किल्ला सर हा जर न सर झाला तर मग मरेल आंबेडकर हा. त्यांनी त ह्यात आपले सर्व निश्चय पूर्ण केले. आपण त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातुन आज हे पवित्र काश्याच वस्त्र परिधान केलेलं आहे. आणि ज्ञान संपादन करीत आहात. तर आपल्र आज अधिष्टान अधिक मजबुत करून निश्चय करा की कधिही मातृ संस्थेला बेईमान होणार नाही. व शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत मी धम्मा कार्यास वाहून घेतो. ९. करुणा पारमिता :- सर्व मानव व सर्व प्राणी मात्रा विषयी मनात असलेली दया भावना म्हणजे करुणा होय. भगवान बुध्द हे करुणेचे महासागर म्हणुन ओळखले जातात. भगवान बुध्दांनी आपल्या करुणेने अनेक लोकांना दुखातून मुक्त केले त्यांना वास्तविक रूप विषद करून त्यांना दुखातून मुक्त केले. उदा. पटाचारा किसा गौतमी नालागिरी हत्ती सुध्दा भगवतांला शरण आला. किसा गौतमी पटाचारा यांचे दोन्ही घटना मध्ये बुध्द त्यांच्या उपासकांना समजउन देतात. की प्रीयजनासाठी शोक न करता मृतू हा अटळ आहे. याचा बोध घेणे प्रत्येकाला आवश्यक आहे. आता लोक विचारतील की बुध्दाने इथे शोक करणाऱ्यांना सांत्वना तर दिले नाहीच उलट मृत्युने समर्थनच केले. तरी बुध्दाना महाकरुणी का म्हणतात. येशु तर मृत्यूंना जिवंत करीत असत इथे बुध्दानी गौतमी च्या मुलांना जिवंत केले नाही. येशु अंधळ्याला दृष्टी देत, रोग्याला स्वास्थ देत नाही. कोणाच्या कोड दुरुस्त करीत, बहिऱ्याला ऐकु येई, लंगडा चालायला लागे, त्यांच्या मुळे मुका बोलायला लागे, येशु करुणा वाण आहेत की, बुध्द  ? वरील प्रश्नाचे उत्तर असे दिले जाते की, येशु करुणा वाण नक्कीच आहे. मात्र बुध्द हे महाकरुणा वाण आहेत. येशुची करुणा फार दूर पर्यंत कामी येणार नाही. मात्र बुध्दाची करुणा मृत्यू पर्यंतच थांबत नाही. तर ती मृत्युच्या पलीकडे ही कमी येते. अनंता पर्यंत ती तुमच्या पाठीशी असते. आणि म्हणुन बुध्द हे महाकारुणी वाण ठरतात. येशु ज्या मुडद्याला जिवंत करतात तो पण कधी तरी मरतोच. येशुने लजरसला जिवंत केले होते. तो पण मरण पावला एक वेळ नव्हे तर दुसऱ्यांदा मेला. येशुने लोकांना दृष्टी दिली. पण ते चर्म चक्षूच होते. दिव्य चक्षु नव्हे आणि ज्यांना चर्म चक्षु मिळाले ते पण मेले. लंगडे चालायला लागले येशु मुळे पण त्यांनाही मातीत विलीन केले. येशु करुणा वाण आहेत यात संशय नाही. पण येशुची करुणा खुप दुर पर्यंत कामी येत नाही. येशुचे काम आता डॉक्टर करू लागले आहेत. मुडद्यांना डॉक्टर जिवंत करत नाहीत, परंतु वैद्यकीय शास्त्रात एवढी प्रगती झाली की, ते यांचे आयुष्य वाढवु शकतात. म्हणुन येशुंना जास्तीत जास्त चिकित्सका म्हणता येईल. परंतु भगवान बुध्द महाचिकीत्सक, महाकारुणी वाण म्हणुनच बुध्दांना कारुणिक नव्हे तर महाकारुणिक म्हणतात. बुध्द असे जिवन देतात की ज्यात अमृत धारा वाहतात. बुध्द असी दृष्टी देतात की ती कधीच फुटत नाही. बुध्द असे कान देतात की जे ऐकण्यासारखे आहे ते ऐकायला मिळते. ते असे पाय देतात की त्या पायाच्या गतीने ज्ञानी जगात प्रवेश होऊ शकतो. ह्या जगात आंधळ्याला डोळे, बहिऱ्याला कान, जरी मिळाले तरी त्याने काय साध्य होणार आहे? दृष्टी वाल्यांनाही खरी दृष्टी आहे कुठे? कान वाल्यांनाही कुशल गोष्टी कुठे ऐकू येतात? कोणत सत्य त्यांना ऐकू येते? बुध्द पण दृष्टी देतात . तिला अंतर दृष्टी म्हणतात. जी एकदा उघडली की ती बंद होत नाही. मृत्युतून वाचाविलेला पुन्हा मरतो पण जिवंत पणी जागी झालेला कधी ही मरत नाही. त्याला न जन्म न मृत्यु तो निर्वाणात पदार्पण करतो. भगवान बुध्द अत्त दीप भव ची शिकवण देतात म्हणून ते महाकारुणिक म्हणुन ओळखले जातात. १०. मैत्री पारमिता :- सर्व प्राणी मात्र विषयी मित्र विषयीच नव्हे तर शत्रु विषयी देखील बंधु भाव वाढविला पाहिजे. पशु पक्षी यांच्या विषयी सुध्दा मैत्री भावना निर्माण करणे. तथागत बुध्दांनी आपल्या मैत्रीच्या अधोर अनेक लोकांना जिंकले. करुणे सोबत सुद्धा फोल ठरते उदा. येशु ख्रिस्ताला सुडावर चढवत असता. त्यांचा हाता-पाया मध्ये काही लोक खिळे ठोकत असता येशुकडे करुणा होती परंतु ते मैत्री नसल्यामुळे व्यर्थ गेली परंतु भगवान बुध्दाने खुन्कार डाकु अंगुलीमाल याला आपल्या मैत्री बलाने जिंकून त्याला भिक्षु बनवले व तो अरहंत होऊन जिवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केले. आपल्या मैत्री बलाने भगवान बुध्दांनी नालागिरी नावाच्या हत्तीला शांत केले. देवदत्ताने राजा अजात शत्रुचा सहाय्याने भगवंताला मारण्याचा कट रचला. राज्याच्या हत्ती शाळेतील एका हत्तीला मद्य पाजुन त्याला मद्यमस्त केले. नंतर भगवान बुध्द येत असलेल्या रस्त्यात त्यांच्या अंगावर सोडले परंतु तो हत्ती जवळ आल्यावर भगवंतानी त्याला उद्देशुन मैत्री पूर्ण आवाजात त्याला संबोधले कि नालागिरी थांब तो चवताळलेला हत्ती हा शांत उभा राहुन त्याने भगवंताचे पाय चाटायला लागला. अशाप्रकारे भगवंतानी अनेकावर आपल्या मैत्री ने जिंकले. माणसाने मैत्री पारमिता पूर्ण करावी. अशा प्रकारे आपल्या जिवनात सदगुणाचाराने वागून सर्व अडचणी दुर करून बोधिसत्व होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करावी. ही सदिच्छा व्यक्त करून आपणास शुभ कामना देतो व माझे प्रवचन संपवतो. जयभिम, जयभारत