सदस्य:मृणाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"माझ्या बाई"

तुम्ही आहात माझ्या ज्ञानाच्या प्रेरणेची मूर्ती, अामुच्या यशास्तव दिलीत स्वतःच्या नात्याची आहुती!

तुमच्या ज्ञानाच्या सागरात गेले मी पोहत, तुम्हामुळेच खरं तर शिकले मांडायला स्वतःचे मत!

शिकविलेत तुम्हीच मला, निबंध कसा लिहावा जिंकल्या मी कितिक स्पर्धा, लाभली बक्षिसं अन वाहव्वा!

मंचावरती ठेवताना पाऊल, थरथरायचे पाय माझे, परि सावरले मी तुम्ही दिलेत, बळचि ते आत्मविश्वासाचे!


यशोशिखरावर विराजमान होताना आठवत आला बाई तुमचाच चेहरा, कृतज्ञ मी सदोदित तुमची अवनतही तुम्हीच घडविलेला असाच एक मोहरा!!


--कु.तनया सुधाकर किलजे के.रा.कोतकर माध्य.विद्यालय,डोंबिवली (पू)