सदस्य:प्रसाद चिक्षे/धूळपाटी१
व्हरकटवाडी (धारूर )
व्हरकटवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील व धारूर तालुक्यातील गाव आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]बीड पासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे.धारूर पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.गावाचे एकूण क्षेत्र ५४६ हेक्टर. १४७ घरं असणारा हे छोटे गाव २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ६६४ आहे.त्यातील ३६९ पुरुष आणि ३१५ महिला आहेत.[१] कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते. कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात. .
२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.
गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ व २०१८ स्पर्धेत गाव सहभागी झाले होते.
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत थोडे काम करून गावाला तालुका पातळीवरील दुसरे बक्षीस मिळाले. धारूर तालुक्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत काम करून आपले गाव पाणीदार केले होते. सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेत मात्र गाव पूर्ण ताकदीने उतरले. पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले. ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेवून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१८ पासून गावाने काम करण्यास सुरवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान व मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति मानसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती,सलग समपातळीतील चर,खोल सलग समपातळीतील चर,अनगड दगडी बांध तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले.गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला. गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले.सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न या कामाने सुटला.
यासर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.