सदस्य:प्रविण विजय बोरसे.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

✍️ खरंच जर " शिवराय उठले समाधीतून "🙏

जेव्हा कधी रायगडी जाऊन ह्या पुण्य समाधी जवळ बसतो तेव्हा खरंच विचार येतो मनी की खरंच जर महाराज उठले समाधीतून तर? तर ह्या रायगडाला पुन्हा जाग येणार आणि सुरू होणार पुन्हा तो सुवर्ण शिवकाळ. आजवरच्या माझ्या रायगड भेटीत नेहमी मी पाहतो की खूप जण येतात रायगड पाहण्यासाठी पण १०० मधले केवळ ४ जण हे या समाधी जवळ बसून राजांच्या समाधीशी बोलतात आपल्या डोळ्यांतून..... हरकून जातात इथं येऊन आणि बाकीची येतात ते फक्त फिरण्यासाठी बस्स........ ह्या समाधी जवळ येऊन फक्त हात जोडले की निघून जातात पण विचार करत नाहीत की ह्या समाधीतले महाराज सांगत आहेत की चालेल जर मला नाही केला प्रणाम पण नेहमी हृदयात जाण ठेवा, आपल्या मराठी मूलखाची, आपल्या आई-बहिणींची. पण या उलट मी पाहिलंय रायगडावरही काही जण मुलींना वाईट नजरेने पाहतात. नको नको ते बोलतात. महाराजांनी " परस्त्री मातेसमान" मानली, ज्या गडावरून कधी कोणती आई, मुलगी आली तर रिकाम्या हाती गेली नाही, जिथे तिला सुरक्षित वाटलं त्याच गडावर आज हे पाहायला ऐकायला मिळत. वेदना होतात काळजात म्हणून म्हणतो की महाराज उठलेच पाहिजेत समाधीतून. या रायदुर्गासारखं एक भव्य स्वप्न जे कधी महाराजांनी पाहिलं आणि ते प्रत्येक्षात उतरवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, आया बायांना सुरक्षतेची हमी दिली, जिथे राज्याभिषेका सारखा दैवी सोहळा झाला आणि तिथेच महाराज चीरनिद्रेत लिन झाले तो हा रायगड आणि त्या वरील ही त्यांची पवित्र समाधी बघून नेहमी डोळ्यात पाणी येत की महाराजांनी जे शिकवलंय ते आज प्रत्येक जण नजरेआड करतो. कधी ह्या समाधी शी बोलून बघा महाराजांचा हात फिरेल पाठीवरून आणि मनात विचार नक्की येईल की जर शिवराय उठले समाधीतून ". ✍️ रायगड हा पर्वतपुरुष असेल तर त्याचे काळीज ही स्वामींची समाधी आहे 🙏 जय शिवराय 🙏 ✍️ Instagram