सदस्य:प्रदीप जगताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    महासिर मासा (Tor tor) गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महासीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर ,टॉर खुदरी, टॉर पुटीतोरा असे आहे. महाराष्ट्रातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.कुलकर्णी यांना माहासीर माशाची एक नवीन जात नाशिक जिल्यातील दारणा नदीत आढळून आली. त्यांच्या सन्मानार्थ त्याला टॉर कुलकर्णी असे नामकरण करण्यात आलेले आहे. मोठे डोके     गोड्या पाण्यातील एक रुचकर खाद्य मासा. महासीर या माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनिडी कुलात करण्यात येतो. त्याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर ,टॉर खुदरी, टॉर पुटीतोरा असे आहे. महाराष्ट्रातील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.कुलकर्णी यांना माहासीर माशाची एक नवीन जात नाशिक जिल्यातील दारणा नदीत आढळून आली. त्यांच्या सन्मानार्थ त्याला टॉर कुलकर्णी असे नामकरण करण्यात आलेले आहे. मोठे डोके असणारा मासा अशा अर्थाने महसीर हा शब्द वापरला जातो. मराठी भाषेत त्याला खडवी, खडची, मस्ता, महाला व मस्तर अशी नावे आहेत. बंगाली भाषेत त्याला टॉर, महासीर, मासीर, महासार व महासाल अशी नावे आहेत. त्याच्या सात जाती आहेत. यूरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील बहुतेक सर्व नद्या व सरोवरे यांत महसीर आढळतो. भारतामध्ये हिमालय पर्वताच्या पायथ्याच्या टेकड्यांत असणाऱ्या जलाशयात (काश्मीरपासून आसामपर्यंत) आणि पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांतील नद्या व तलाव यांत महसीर आढळतो. नर्मदा आणि तापी या नद्यांत त्यांची मासेपकड मोठ्या प्रमाणात केली जाते महसिराची लांबी सु. १·५ मी. असून वजन ५०–५४ किग्रॅ. असते. शरीराचा रंग आकर्षक व अनेक मिश्र छटांचा असतो. शरीराच्या वरच्या अर्ध्या बाजूचा रंग हिरवट रुपेरी किंवा गडद काळसर हिरवा असतो. शरीराच्या बाजू रुपेरी-सोनेरी रंगांचे मिश्रण असलेल्या आणि खालच्या बाजूला पोटाकडे त्याच रंगाच्या फिकट छटा असतात. सर्व शरीरावर मोठे चक्राभ (सायक्लॉइड) व षट्‍कोनी खवले असतात. खवल्यांच्या कडा काळसर रंगाच्या असतात, त्यामुळे माशाच्या शरीरावर त्यांची सुंदर नक्षी तयार होते. मुस्कट टोकदार असून चूषी मुख पुरस्सरणक्षम असते. महसीर पाण्याच्या तळाकडील अन्न घेतो. नवजात मासे कीटकभक्षी, तर पूर्ण वाढ झालेले हे मासे शाकाहारी असतात. डोळे खूप मोठे असून डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात. ताेंड जाड असून त्यांभोवती चार लवचिक स्पृशा असतात. डोके मोठे, धड निमुळते व शेपटी लांब असते. पुच्छपर दोन खंडांमध्ये विभागलेला असतो. पृष्ठपर हा अधरपराच्या अगदी समोर असतो. वक्षपर डोक्याच्या मागे सुरू होऊन अधरपरापर्यंत असतो. अधरपर भडक लालसर पिवळ्या रंगाचा असतो. गुदपर छोटा असतो.

      महसिरांचे विणीचे हंगाम वर्षातून १–३ वेळा असतात. या हंगामात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीच्या उगमाकडे तसेच उपनद्यांकडे जातात. मादी तेथे अंडी घालते. पिले मोठी झाली की प्रवाहाबरोबर नदीमुखाच्या दिशेने येतात. जलाशयातील महसीर खोल पाण्यात अंडी घालतात. या माशांमध्ये स्थलांतर दिसून येते. खाण्यासाठी असलेल्या माशांमध्ये उत्कृष्ट मासा म्हणून महसिराची गणना होत असल्यामुळे त्याला माशांचा राजा असे म्हणतात. गळाने त्यांची शिकार फार मोठ्या प्रमाणात होते. अनेक राज्यांत महसिरांचे संवर्धन केले जाते.
  गंगा अथवा  गोदावरी नदी स्वच्छ झाली असं ठामपणे सांगायचं असेल तर गोड्या पाण्याचा राजा नदीत सापडायला हवा. हिमालयात, सह्याद्री पर्वतात उगम पावणार्‍या नदीमध्ये सापडला जाणारा हा किंग म्हणजेच महाशीर मासा. गळानं मासे पकडण्याच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेला हा मासा गळाला लागेनासा झाला आहे. एकेकाळी मुंबईच्या पवई येथील तलावात अँग्लर हा मासा पकडत असत.पण वाढत्या प्रदूषणामुळे हा लुप्त होत चालला. जगात सापडल्या जाणार्‍या 20 महाकाय माशांपैकी एक असा हा मासा आता लोप पावत चालला आहे.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे "लुप्त होत असलेली प्रजाती" असा अर्थ होतो. ‘महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. हा मासा महाराष्ट्रातील सर्व नद्यांमध्ये प्रामुख्याने गोदावरी,तापी,नर्मदा,कृष्णा ,कोयना,वैनगंगा,भीमा इत्यादी नद्यांमध्ये आढळतो.दक्षिणेत कावेरी नदीच्या खोर्‍यात देखील (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो.

       महाशीर... म्हणजे मोठ्या डोक्याचा असं कुणी म्हणतं किंवा या माशाच्या 45 जाती म्हणून महाशीर म्हणतं. तर गोड्या पाण्यातल्या माशांपैकी सगळ्यात मोठी म्हणजे 9 फुटांपर्यंत वाढणारी जात म्हणजे महाशीर. संस्कृत, इंडो पर्शियन असे वेगवेगळे नावांचे त्याला संदर्भ आहेत. पण सगळ्या संदर्भात त्याची एक कणखर, दणकट आणि मोठा मासा अशी एकसमान वैशिष्ट्ये मात्र यात दिसतात. हा मासा म्हणे आपल्या पिलांसाठी डोंगर चढून वर जातो.
           अँग्लिंगच्या या गेममध्ये महाशीर आपल्या गळाला लागावा म्हणून अनेकजण तासन्‌तास वाट पाहतात. कारण गोड्या पाण्याचा हा राजा इतकी तगडा मुकाबला करतो की हा खेळ खेळणार्‍यालाही मजा वाटते. गळ लावून मासा पकडायचा आणि किती किलोचा किंवा कोणत्या जातीचा आहे हे पाहून तो सोडायचा. या माशासाठी अनेक परदेशी अँग्लर्स भारतात येतात. पण भारतातली मासेमारी इतकी अनैसर्गिक होते की, हा मासा आता दिसेनासा झाला आहे.

45 जातींपैकी 15 जाती एकट्या भारतात सापडतात. इंद्रायणीकाठीही तो मोठ्या प्रमाणावर सापडायचा त्याचं वैशिष्ट्‌य म्हणजे तोंडाजवळ असणारा हा कल्ला. यामुळे तो नथवाला मासा म्हणूनही ओळखला जायचा. महाशीरची गोल्डन महाशीर ही जात सगळ्यात मोठी मानली जाते आणि म्हणजे खेळायचे पत्ते पण यापासून बनवले गेले होते. 1822 मध्ये बुचनान हॅमिल्टनमध्ये पहिल्यांदा महाशीर विषयी शास्त्रीयदृष्ट्या वर्णन केलं आणि 1833 मध्ये पहिल्यांदा ओरीएन्टल स्पोटीर्ंग मॅगझिनमध्ये याचा अँंग्ललर्स चॅलेंज म्हणून उल्लेख झाला.

भारतात, टाटा पॉवर या महाशीरला वाचवायचा प्रयत्न करतेय. लोणावळा येथे टाटा पॉवर कंपनी महशिर माशाची हॅचरी चालवते. त्यासाठी 1975 पासून आतापर्यंत जवळपास 16 लाख माशांची पैदास करण्यात आली आहे.

महाशीर वाचवण्यासठी असे एक नाही तर शेकडो हातांची गरज आहे. महाशीर माशाची जी बेकायदेशीरपणे मासेमारी केली जाते तीही विविध राज्यांनी रोखणं गरजेचं आहे. महाशीर वाचवणं म्हणजे नद्या वाचवणं. नद्या वाचवणं म्हणजे पर्यावरणाचा समतोल. जो समतोल जीवचक्राला जिवंत ठेवतो.नाशिक जिल्ह्यात गोदावरी व तिच्या उपनद्या हा मासा विपुल प्रमाणात आढळत असे.आधुनिक शेतीत वापरले जाणारे कीटकनाशक मोठ्या प्रमाणात नदीमध्ये वाहून येते.बहुतांशी जलिय कीटक अथवा सूक्ष्म सजिवांवर गुजराण करणाऱ्या महासीर चे खाद्य यामुळे नष्ट झाले व पर्यायाने महाशिर लुप्त होत चालला.गंगापूर धरणाच्या मासेमारी मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा महसीर आता औषधाला देखील मिळत नाही.परंतु आठ दहा वर्षापूर्वी नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रात अचानक महासिर ची मोठी मरतुक(mass mortality) झाली आणि गोदावरी नदीपात्रात त्याचा अजूनही अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले. हा मासा कीटक व कृमी भक्षक असला तरी इतर माशांची लहान पिल्ले सहसा भक्षण करत नाही. एकेकाळी पुणे जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीत आढळणारा महाशीर मासा १९८२ मध्ये नामशेष झाला. मात्र तळेगावच्या 'फ्रेन्डस् ऑफ नेचर' आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी हा मासा परत इंद्रायणीमध्ये पहायला मिळणार आहे.भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देहु-आळंदीला येणारा प्रत्येक भाविक पूर्वी इंद्रायणी नदीतल्या महाशीर अर्थात देवमाशाचं दर्शन घेतल्याशिवाय परतत नसे. ९० च्या दशकात नदीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे हा मासा इंद्रायणीतून नामशेष झाला. मात्र आता पर्यावरणासाठी उपयुक्त आणि भाविकांची असलेला हा मासा आता पुन्हा इंद्रायणीत पहायला मिळणार आहे. तळेगावच्या 'फ्रेन्ड्स ऑफ नेचर' आणि 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्यूकेशन' या संस्थांच्या प्रयत्नातून हे शक्य झालं आहे. संशोधन करून या माशाची निर्मीती करण्यात आली आणि त्याला इंद्रायणी नदीत सोडण्यात आलं. असा हा वैशिष्ट्यपूर्ण महासीर मासा महाराष्ट्राचा राज्य मासा (state fish)म्हणून घोषित करणे केवळ त्याच्या संवर्धनासाठीच आवश्यक नसून भावी पिढ्यांना खाण्यासाठी एक रुचकर मत्स्य संपदा देखील उपलब्ध होईल.

प्रदीप जगताप ( मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी ,वर्सोवा )