Jump to content

सदस्य:पाटमोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरु

 गुरु इतका तेजस्वी ग्रह शुक्रावाचुन दुसरा कोणीही नाही. गुरु हा ग्रह आकाराने सर्व ग्रहांमध्ये फारच मोठा आहे. तो आपल्याला डोळ्यांनी केवळ बिंदु इतका दिसतो, मात्र तो एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वीएवढे १२४० गोल एकत्र करावे लागतील तेव्हा गुरु एवढा आकार होइल! याच वैशिष्ट्यामुळे त्यास ‘गुरु’ हे नांव प्राप्त झाले आहे.

आता गुरु आकारमानाने मोठा असला तरी तो मंद मात्र मुळीच नाही. सूर्याभोवती फिरत असताना तो एका सेकंदात ८ मैल चालतो. त्याची अक्षभ्रभण गतीही अशीच विलक्षण आहे. आपले ९ तास ५५ मि. ३० से.म्हणजे गुरुचा एक दिवस आहे. आपल्या

पृथ्वीच्या दोन अक्ष प्रदक्षिणा होतात, तेवढ्या काळात त्याच्या ५ होतात! गुरुचे वर्ष फार मोठे आहे. आपली सरासरी १२ वर्षे म्हणजे त्याचे एक वर्ष होते. सूर्यापासून पृथ्वीच्या ५ पट अंतरावर गुरु आहे. सूर्यापासून गुरुचे अंतर कधी ४६ कोटी मैल      तर कधी ५७ कोटी मैल इतके असते. गुरुचा दक्षिणोत्तर व्यास पूर्व-पश्चिमव्यासापेक्षा कमी आहे त्यामुळे  त्याचा आकार त्याच्या धृवांकडे काहीसा चपटा आहे

 ‘वाक् धोरणी मंत्र याग तंत्र नैतिक गज तुरंग यानिगमबोधकर्मपुत्रसंपन्जीवनोपाय कर्मयोग सिंहासनकारको गुरूः’

 गुरु हा ज्ञान,  ज्ञानसुख, संपत्ती, वैभव, हत्ती, घोडे वगैरे राजवैभव, संतती, राजकारणकुशलता, शहाणपण, अध्यापकत्व,

परमार्थप्राप्ती, दातृत्व, पुण्यकर्म, तीर्ययात्रा,साधु समागम, योगमार्ग, दीक्षा, दीर्घायुत्व, इत्यादी गोष्टींचा कारक ग्रह मानला

गेला आहे. पाश्चात्य विद्वानही हा ग्रह मानसन्मान, अधिकार, भाग्य, यश, कीर्ती, वृध्दि, मैत्री, संरक्षण, प्रतिपालन, बहुप्रसवत्व, बहुफलत्व, इत्यादी दर्शवितो असे मानतात. हा ग्रह उदार, प्रसरणशील, अतिविस्तीर्ण, उत्साहवर्धक, सुखकर, रुचिर, नेमस्त, जीवनाधार, जीवनोपयोगी, जीवनरक्षक, साधारण उष्ण, आर्द्र व बहुप्रसव असून  स्वभावाने आनंदी, उत्साही, उदार,शहाणा, महत्वाकांक्षी, दरबारी, सभाधीट, दयाळु, आनुकंपिक आहे.

हा ग्रह सिनेटर- न्याय, राज्यव्यवस्था व कायदे करणारे लोक, न्यायाधिश, कौन्सिलर, धर्मगुरु, धर्मशास्त्र पारंगत, शकून किंवा भविष्य सांगणारे, वकील, सावकार, धनवान, बॅंकर, विद्यार्थी, विश्वविद्यालये, लोकरी कपड्यांचे व्यापारी, धान्य, किराणा, अन्नसामुग्री यांचे व्यापारी इत्यादी व्यवसाय किंवा ते करणार्‍या लोकांचा कारक आहे असे म्हटले जाते.

हा ग्रह धनु आणि मीन या राशींचा अधिपती असल्याने या ग्रहाचा मानवी शरीरातील मांड्या, ढोपराच्या मागचा भाग,

पाय, उजवा कान व शरीरांतर्गत असणारी शोषण करणारी शक्ति यावर अंमल आहे

. गुरूचा गुणधर्म प्रसरणशीलता असल्याने ज्या रोगांमध्ये पेशींची अनिर्बंध वाढ होते; उदाहरणार्थ ट्यूमर किंवा कॅन्सर तसेच मेदवृद्धी, शरीरावरील सूज हे रोग दर्शवतो. भारतीय ज्योतिर्विद त्याला वसेचा- मेदाचा, चरबीचा कारक मानतात.

त्यामुळे कुंडलीभध्ये गुरु रोगकर्ता असता मेदोवृद्धी व रक्ताची वृद्धी अत्यंत झाल्याने रक्तमूर्छा, रक्त बिघडणे, यकृताचे विकार, कावीळ इत्यादि रोग दर्शवितो.

 या ग्रहाने भधूर व सुवासिक चव दर्शविली जाते. हा हस्ताक्षर मोठे व फराटे असणारे दर्शवितो. या ग्रहाने ३ ही संख्या  दर्शविली जाते.

        या ग्रहाचे ‘बृहत्तनुः पिंगलमूर्ध्नजेक्षणो बृहस्पतीः श्रेष्ठमतिः कफात्मकः’ स्थूल शरीर असणारा, पिंगट केस, घारे डोळे, श्रेष्ठ किंवा प्रगल्भ बुध्दि, तसेच कफ प्रकृती असणारा असे वर्णन आहे. त्यामुळे गुरु कारक व्यक्ति शरीराने सुदृढ, हाडापेराने मोठी, शरीराचा वर्ण पिवळसर गौर, मांसल परंतु पुर्ववयात लठ्ठ नवणायी व उतारवयात स्थूल, डोळे मोठे, व पाणीदार, भिवयांचे केस लांब असणारी, कुरळे व मृदु केस, तोंडाचा जबडा मोठा असणारी, वरचा ओठ खालच्या ओठावर आलेला, दात व त्यातही सर्वात पुढचे दोन दात फार मोठे असणारी, गाल पुष्कळच मांसल असून हनुवटी लांब व मध्ये खळगा असलेली असते. त्यांचे खांदे रुंद, हात-पाय जाड, असून पायावर खूपसे केस असतात. कपाळपट्टी रुंद व तीवर विशेष घाम येतो. ही माणसे आत्मविश्वासी, आनंदी, मेजवान्या व सार्वजनिक समारंभाची विशेष         आवड असणारी, बाह्य भपका, मानसन्मान रीतीरिवाज विशेष पाळणारी, गर्विष्ठ, उदार, सुस्वभावी, महत्वाकांक्षी, स्वकुलाचा विशेष अभिमान बाळगणारी व आपल्या आप्तस्वकियांना पुढे आणण्यास झटणारी, धार्मिक व खादाड असतात.

गुरु हा ग्रह विद्या, बुध्दी व ज्ञान यांचा कारक ग्रह मानतात. गुरु अनेक विद्यांचा आद्यकारक आहे. शिक्षण, शैक्षणिक प्रगती, उच्चशिक्षण, कोणत्याही विद्येचा अभ्यास गुरुवरुन पाहतात. गुरु शांत, विचारी, प्रगल्भ, सखोल बुध्दी दर्शवितो. 

गुरु जगाचा शिक्षक आहे. ज्ञानासाठी, ज्ञान घेणारा विद्यार्थी आहे. गुरुजवळ ज्ञानाचा अंत पाहण्याची, अनेक वर्षे त्यासाठी कष्ट करण्याची चिकाटी आहे. गुरु शांत व विनयशील आहे. त्याचेकडे व्यवहारी बुध्दी नसेल परंतू दूरदर्शित्व व द्रष्टेपणा निश्चितच आहे. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी इतरांस शिकवणे, ज्ञानाचा प्रसार करणे हा गुरुचा स्थायीभाव आहे. गुरुचे बोलणे प्रभावी, विद्वत्ताप्रचुर, बोधात्मक, उपदेशक असते. त्याचे लिखाण उच्च स्वरूपाचे भव्म व पांडित्यपूर्ण असते. प्रबंधात्मक लिखाण, ग्रंथलेखन, कादंबरी, टीकाग्रंथ इत्यादि स्वरूपाचे असते.  

गुरु हा ग्रह मानवी जीवनात नीतिमत्तेच्या कल्पना रुजवणारा,  सत-असत, न्याय-अन्याय, इत्यादिमधील फरक  जाणणारा आहे.

 मात्र असा हा पहिल्या प्रतीचा शुभग्रह मानला जात असला तरी सरसकट सर्व पत्रिकांना तो शुभ असत नाही.

धनू व मीन या राशींमध्ये तो स्वगृही, कर्क राशीत तो उच्च तर मकर राशीत नीच असतो; मात्र मकर राशीतील पहिल्या १० अंशात गुरु अत्यंत शुभफले देतो, असे निरीक्षण आहे

धनू व मीन या राशिंमध्ये तो स्वगृही, कर्क राशीत उच्च तर मकर राशीत नीच असतो; मात्र मकरराशीतील पहिल्या १० अंशात गुरु अत्यंत शुभ फळे देतो असे निरीक्षण आहे. तसेच हा ग्रह स्वनवमांशी, उच्चनवमांशी अथवा. लग्न, दशम, नवम, धन, एकादश, पंचम व चतुर्थ या स्थानामध्ये हा ग्रह असणे महत्वाचे आहे. तो सहा, आठ व बाराव्या स्थानी केव्हाही नसावा. गुरु हा त्याचे मित्रग्रह रवी, मंगळ व चंद्र यांच्या राशींच्या म्हणजे सिंह, मेष, वृश्चिक, कर्क या लग्न कुंडल्यांना शुभकारक ग्रह असतो. तसेच मिथुन, कन्या, वृषभ, तूळ, मकर, कुंभ या राशींच्या लग्नांना प्रतिकूल असतो. गुरु बिघडल्यास पोकळ डौल, ज्ञानाचे अवडंबर, मोठे जडजंबाळ शब्दांचे वक्तृत्व किंवा लिखाण, ढोंग, विद्वत्तेचे सोंग आणणे असे प्रकार दिसतात. 

लग्नातील अग्नी राशीचा म्हणजे मेष, सिंह व  धनू राशींचा गुरु असता जन्मणारा धीट, बेडर, सुस्वभावी, धंद्यामध्ये यशस्वी, मैत्री किंवा स्नेहसंबंध करण्यास योग्य, शत्रुबरोबर देखील उदारपणे वागणारा, थोडा गर्विष्ठ, आत्मप्रौढी असणारा असतो . विशेषतः धनुराशीचा गुरु लग्नी खेळ व कवायतीची आवड असणारा असतो . पृथ्वीराशी – वृषभ, कन्या व मकरेमध्ये स्वार्थी, ढोंगी, दांभिक, कोत्या विचारांचा व बढाईखोर असतो . वायूराशीमधील लग्नी उदय पावणारा व   विशेषतः तुला व कुंभ राशीतील गुरु, स्वभाव न्यायी, उदार,समतोल विचारांचा, निःपक्षपाती, विश्वासू,व प्रत्येकास मदत करण्यास तत्पर असलेला असतो . जलराशीतील लग्नी शुभसंबंधित गुरु भाग्यवृद्धीकारक व अत्यंत शुभकारक         असतो. ही माणसे सर्व प्रकारच्या खेळांची आवड असणारी, गुलहौशी, पैशाची दरकार नसलेली असतात. द्वितिय स्थांनातील गुरु मोठ्या घरात जन्म दर्शवतो. कुटुंबही मोठे असते. हा गुरु खाऊन पिऊन सुखी असे  दर्शवतो. वयाचे ३६ ते ४८ हा काळ सांपत्तिक भरभराटीचा जातो. तृतीयातील गुरु व्यक्तीला प्रेमळ, सज्जन व परोपकारी बनवतो. हे लोक आशावादी असतात. चतुर्थात गुरु – असेल त्या परीस्थितीत सुखाने राहतात. अंगी समाधान असते व  त्यामुळेच की काय पण महत्वाकांक्षा कमी असते. पंचमस्थानातील गुरु  व्यक्तीला     तर्कनिष्ठ बुध्दिमत्ता देतो. उच्चशिक्षण, शिक्षणात प्रावीण्य दर्शवतो. बक्षिसे, पुरस्कार मिळतात. भाषा, तत्वज्ञान इ. विषयांस चांगला असतो. तसेच हा गुरु शिकवण्याची हातोटी देतो.