सदस्य:पवन तिकटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेवटची इच्छा....! ( The Last Wish)[संपादन]

ईश्वरा,

स्वतःच काळीज रक्तबंबाळ केल्यावर

स्वतःला आतवर खोल खोदत गेलो ना,

तेव्हा कुठेतरी बुडाशी सापडतात मला दोन-चार शब्द.

अगदी मनासारखे...लिहिण्यागत

एखाद्या मातीतून

नवं कोर हिरव बीज अंकुराव..

अगदी तसच असत बघ

कविता लिहिल्याच सुख

पहिल्या शब्दाचा...

कोऱ्या कागदावर मनातल्या शाहीने

अक्षरांचा लेप लावावा

अन नंतर आपणच हुंगत बसाव त्यांचा सुगंध

असे असतात नवीन शब्द,

प्रत्येक कविता लिहिताना...

पण आता,

या सर्वांची सवय तुटत जाणार.

हळू हळू नजरेत नुसते ते क्षणच कैद राहणार

इतपत ठीक आहे.

पण अचानक यांना न सांगता

मरण आले तर ... एवढीच भीती

अन तसेही, देवा

मी आजवर अस कधीच नाही ऐकलं की

"एखाद्या कवीला कविता वाचतांना

किंवा लिहितांना मृत्यू आला असावा"

म्हणून,

ह्या आठवणींचा डोलारा सोबत नेण्यासाठी...तरी

कविता वाचतांना वा लिहितांना

तरी,

मला मृत्यू येऊ दे....

"एक शेवटची इच्छा म्हणून..."

-  पवन तिकटे