सदस्य:नितीन जाधव/धूपा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझं शहर

कारंजा

कारंजा हे गाव प्राचीन काळापासून वसलेले एक शहर आहे या कारंजा शहरच महात्म्य वाढवण्याचे काम या शहरा मध्ये असलेल प्राचीन जैन मंदिर व गुरुमंदिराणे केल आहे तशेच या कारंजा मध्ये जैन लाड या लोकाची वस्ती असल्यामुळे या शहराला कारंजा लाड असे नाव ठेवण्यात आले या कारंजा शहरामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे , लोक राहतात आणि या गावामध्ये लोक आनंदाने राहतात प्रत्येक व्यक्ती दुसर्याची मदत करत असतो कारंजा हे गाव प्राचीन असून या गावामध्ये ४ वेश आहेत त्याचे नाव पुढील : दिल्ही वेश ,पोहा वेश , मंगरूळ वेश , दारव्हा वेश अशा या ४ वेशी पूर्वी या ४ वेशीचा आत मध्ये लोकांची वस्ती असायची पण आता शहराचा विस्तार वाढल्यामुळे या वेशीचा बाहेरसुद्धा लोकांची वस्ती जमली आहे आणि शहराचा विस्तार झाला आहे या गावाला म्हणजेच कारंजा या शहराला पूर्वी बिबिसा राणी हिला तिचा लग्नात हे शहर तिला आनधन म्हणून देण्यात आल होत म्हणून या शहराला बीबीच कारंज सुद्धा म्हटल्या जाते हे शहर श्री गुरुमाउली यांच जन्म गाव सुद्धा आहे जेव्हा या गुरुमालीचा उत्सव सुरु होतो तेव्हा कारंजा शहराच वातावरण भक्तिमय होऊन जाते हा उत्साह म्हणजे कारंजा या शहराचा एक सणच असतो असेच या शहरामध्ये आई कामक्षा देवीचं जागृत मंदिर आहे या मंदिरामध्ये नवरात्र सुरु झाले कि भक्ताची भक्ती बघायला मिळते नवरात्र उत्सवाचा दरम्यान येथे भव्य अशी यात्रा सुद्धा भरते भाविक आनंदाने या यात्रेचा लाभ घेतात या या शहरामध्ये रुशेस्वराचा मंदिर आहे ,त्याला लागूनच ऋषीतलाव सुद्धा आहे या तलावाच पाणी त्या जवळच लागून असलेल्या शेतीला सुद्धा होते शेतकरी या पाण्यावर बाराही महिने पिके घेतात ऋषी तलाव प्रमाणेच या शहरामध्ये बेम्बला पाठ नावाच एक तलाव आहे त्या तलवाचा पाणी कधीच आठत नाही त्याची खोलाई किती आहे याचा आता पर्यत कोणाला अंदाज लागलेला नाही ,सिधेस्वरच मंदिर या शहरामध्ये आहे त्या मंदिराच महत्व म्हणजे मंदिरामध्ये ११.३० जोतीर्लीग आहे हे मंदिर सुद्धा खूप पुरातन आहे अर्ध्या जोतीर्लींगामुळे शहर हे काशी बनण्यापासून वंचित राहिले