सदस्य:निखिता जयंत जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव निखिता जयंत जोशी असून मी csiber महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मला जीवशास्त्र विषय खूप आवडतो. मला प्राणी आणि पक्षी यांचे निरीक्षण करायला आवडते. पण वाढत्या जागतिक तापमानामुळे मी पर्यावरण या विषयात उच्च शिक्षण घेऊन या समाजाने माझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून जास्तीत जास्त कसे उत्पादन घेता येईल याचा विचार करत आहे त्यामुळे मातीची पोषकता कमी झाली आहे याचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. मातीत रसायनांचे प्रमाण वाढले असुन् ती माती पूर्वीसारखी वापरात येऊ शकत नाहीये त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व कुठेतरी थांबायला हवे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. या रासायनिक खतांमुळे पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असताना दिसून येते. त्यामुळे जलचरांना तर त्रास होतोच पण असे पाणी आपण देखील वापरू शकत नाही.