सदस्य:दिक्षा प्रकाश कदम/ धु1
कामकाजाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ :
[संपादन]कामकाजाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ: ( प्रतिबंध, मनाई व न्यायनिवारण ) कायदा,2013
कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध घालणारा हा कायदा दिनांक ९ डिसेंबर २०१३ पासून लागू झाला आहे.
या कायद्याच्या तारतुदी समाजून घेण्यासाठी काही महत्वाच्या संकल्पना समजावून घेऊ.
" लैंगिक अत्याचार किंवा छळ" म्हणजे काय ?
लेंगिक छळ म्हणजे खालील नकोश्या कृती किंवा वागणूक: [ कलम 2 ( n ) ]
i ) नकोसा शारिरिक संपर्क आणि लगट
ii ) लैंगिक वर्तणूकीची मागणी किंवा विनंती
iii ) लैंगिक शेरेबाजी
iv ) पौर्माग्राफी दाखविणे
V ) अन्य कोणतीही शरिरीक किंवा शाब्दीक किंवा शाब्दीक नसलेली नकोशी असलेली लैंगिक प्रकारची वागणूक
" कामकाजाचे ठिकाण "यात काय- काय येते? [ कलम ३ ( २ ) ]
i ) शासकीय , निमशासकीय , अशासकिय किंवा खाजगी नियंत्रणाखाली असलेले कोणतेही कार्यालय , संंगठन, संस्था, शाखा
ii ) सहकारी संस्था , ट्रस्ट , एनजीओ.
iii) हॉस्पीटल किंवा नर्सिंग होम्स
iv ) क्रिडा संस्था , स्टेडियम
v)निवासाचे ठिकाण अथवा घर
vi )असंघटीत क्षेत्र
या सर्व ठिकाणांचा " कामकाजाचे ठिकाण" यांत समावेश होतो.
लैंगिक छाळाशी संबंधीत खालील कृती ही " लैंगिक छळ" या सदरात मोडतेेे.
[कलम ३ ( २ ) ]
i ) संबंधीत महिलेला रोजगार प्राधान्य देण्याचे उघड वा छुपे वचन
ii ) तिच्या कामात अडथळे आणणे
iii ) भयप्रद , अपमानास्पद वागणूक देणे
लैंगिक छळाची कोणतीही कृती करणे या कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे
तक्रार कोण करू शकत ?
कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागणारी कोणत्याही वयाची स्त्री
निवासाचे ठिकाण किंवा घर य़ा ठिकाणी नोकरीवर / कामावर असलेली स्त्री
शारिरीक किंवा मानसिक अक्षमतांच्या कारणान पिडीत सी तक्रार देण्याच्या स्थितीत नसल्यास तिचे नातेवाईक , सह कर्मचारी , मैत्रीण ह तक्रार देऊ शकतात
तक्रार कशी व कुठे करावी ?
1 ) तक्रार लेखी असावी
2 )घटनेच्या ३ महिन्यांच्या आत करावी
3 ) तक्रारी सोबत आवश्यक कागदपत्रे व साक्षीदारांची यादी करावी सकार असीच्या सहा प्रती ५या व्या
4 ) तक्रार त्या कार्यालयातील अंतर्गत तक्रार कमिटी अथवा स्थानिक तक्रार कमिटीकडे करावी
अंतर्गत तक्रार कमिटी:
या कायद्या च्या कलम 4 मुसार प्रत्येक मालकाने अंतर्गत तक्रार कमिटीचे गठण करणे अनिवार्य आहे . तसे न केल्यास या कायदयाच्या कलम 26 प्रमाणे मालकावर रक्कम रुपये 50000/- पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो .