सदस्य:डाॅ अनुप देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी स्वत: दंतवैद्य (डेन्टीस्ट) म्हणून गेली 32 वर्षे कोपरी, ठाणे (पूर्व) येथे दातांचा दवाखाना चालवीत आहे. भारतीय दंत वैद्यक संस्था (इंडियन डेन्टल असोसिएशन) ठाणे शाखेचे अध्यक्षपद 2003-04 या वर्षी सांभाळले आहे. दातांची काळजी घरगुती पध्दतीने कशी घ्यावी, यावर अनेक शाळा, कॉलेज मधून व्याख्याने दिली आहेत. काही स्थानिक आणि राष्ट्रीय वर्तमान पत्रांमध्ये या विषयावर लेख लिहिले आहेत. गेली 5 वर्षे मी 'आभामंडळाचे विज्ञान' या विषयावर संशोधन करीत आहे. आपल्याला जे डोळ्यांनी दिसते ते आपले भौतिक किंवा स्थूल शरीर आहे पण आपल्या डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये सात प्रमुख चा*, 72,000 ऊर्जावाहक नाड्या आहेत. या सूक्ष्म शरीराभोवती एक ऊर्जावलय सुध्दा आहे. आपण सगळे वैश्विक ऊर्जेचे घटक आहोत. आपल्या भोवती अदृश्य स्वरुपात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास करता येतो. आपल्या प्राचीन अभ्यासकांना याची जाणीव होती. या अभ्यासामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञान व उपचार प्रणाली यामध्ये प्रचंड बदल होणार आहे, असे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. 20 ऑक्टोबर, 2014 रोजी दिल्लीत झालेल्या डॉक्टरांच्या 42व्या दीक्षांत सभारंभात म्हटले आहे. यासाठी सेंटर फॉर बायोफिल्ड इव्हॅल्युएशनची स्थापना करून या विषयावर संशोधन सुरू आहे. बायोफिल्ड इव्हॅल्युएशन म्हणजे आपल्या भोवती असलेल्या अदृश्य संपत्तीची मोजदाद. या सेंटरचे मूळ सभासद म्हणून डॉ. ह्रषिकेश राव, सौ. स्नेहल कोरगांवकर या कामात सहभागी झालेले आहेत. या विषयाला पूरक असे जे संशोधन केले त्यावद्दल लिहित आहे. लखनौ (2016), नेपाळ (2017) आणि पुणे (2018) येथे झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय आयुर्वेद/वैदिक विज्ञान संमेलनात आयुर्वेदाचा पचार करण्यासाठी पेपर सादर केले आहेत. आपल्या रुढी, सण, परंपरा यामागचे विज्ञान सांगणाऱ्या आयुर्वेदाला मी पाचवा वेद समझतो. वेदातील हे विज्ञान अतिशय सूक्ष्म आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारे , आपल्या पंचज्ञानेंद्रियांना न जाणवणारे आहे. त्यामुळे अनेक बुध्दिजीवी अभ्यासकांसाटी हा विषय निरर्थक, थोतांड शास्त्र तसेच उपाहासाचा विषय आहे. आपल्या ऋषीमुनींनी या ब्रह्यांडाचे किंवा वैश्विक ऊर्जेचे रहस्य अभ्यासले होते. ऋग्वेदापासून हे विज्ञान व्यवस्थित लिहून ठेवले आहे. अर्थववेदातील अष्टचक्रा नव द्वारा देवानां पूरयोध्या तस्यां हिरण्मय: कोश: स्वर्गौ ज्योतिषावृत: किंवा योग कुंडलिनी, लय कुंडलिनी, ज्ञानबिंदू, शांडिल्य, तैत्तरीय (पंचकोष सिध्दान्त ) इ. उपनिषदे, शीव संहिता, षट्चक्र निरुपण, श्रीमद् भागवत गीता, चरक/ सुश्रृत संहिता इ. मधून हे विज्ञान सांगितले आहे. आपल्या भोवती असणारे तेजोवलय, सूक्ष्म शरीरातील पंचकोष, चक्र व नाड्या यांचा अभ्यास परिपूर्ण होता. आपल्या मानवी शरीराचे रहस्य त्यांनी जाणले होते. आपल्या पिंडी ते ब्रह्यांडाचा असणारा संबंध त्यांनी अभ्यासला होता. त्यामुळे एकामुळे दुसऱ्यावर होणारा परिणाम त्यांच्या लक्षात आला होता. सर सॅक्सटन बर यांनी 1940 मध्ये सिध्दांत मांडला की आपल्या डोळ्यांना दिसणारे मानव, पक्षी, प्राणी, वनस्पती तसेच सर्व निर्जीव वस्तु (खुर्चीलाही अणु-रेणू व त्यांची कंपनशक्ती) सर्वांभोवती कंपनशक्तीमुळे ऊर्जावलय असून सर्वकाही ऊर्जाक्षेत्रामुळे एकमेकांशी जोडलेले आहेत. काही वैश्विक घटनेचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी व वनस्पती यावर झालेला आपल्याला माहित आहे. आपण जे शरीर बघतो तो आपला पंचकोषापैकी पहिला अन्नमय कोष आहे परंतु दुसरा तिसरा, चौथा व पाचवा अनुक्रमे प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोष हे आपल्या सूक्ष्म देहाचे घटक आहेत. प्राणमय कोषामधे 7 प्रमूख चक्र व भरपूर उपचक्रे असून वैश्र्विक ऊर्जा याद्वारे ग्रहण केली जाते आणि 72,000 ऊर्जावाहक नाड्यांद्वारे ही ऊर्जा सर्व पेशी, ग्रंथी व अवयवांपर्यत पोहाचवली जाते. यामुळे आपले भौतिक शरीर जिवंत भासते. जेव्हा हे सूक्ष्म शरीर या भौतिक शरीरातून बाहेर पडते (मृत्यू- आयुर्वेदीक व्याख्या) तेव्हा मात्र अतिशय सुंदर, तरुण असलेले भौतिक शरीर सुध्दा निर्जिव/ अचेतन होते. आपल्या प्राचिन ऋषीमुनींना याचे ज्ञान होते. कोमातून बाहेर आलेल्या रुग्णामुळे ही संकल्पना स्पष्ट होते. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात सूक्ष्म शरीराचा अभ्यास नाही. शाळेत गृहपाठ विसरला तर कानाच्या पाळ्या पकडा व उठाबशा काढा या शिक्षेमुळे मेंदूतील स्मरण केंद्र जागृत होते यावर फ्रांसमधे एमआरआयमुळे सिध्द झाले आहे. विदेशात सूपर ब्रेन योगा या नावाखाली मतिमंद, मेंदूचे इतर विकार, स्मृतिभ्रंश यासाठी शिक्षा म्हणून नव्हे तर उपचार म्हणून उठाबशा काढायला लावतात. ऊर्जा उपचारात आज अग्रगण्य असलेली रेकी AIIMS सारख्या प्रतिष्ठीत वैद्यिकय संस्थेत शिकवली जाते व त्याला उपचार म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य देणे, भारतीय साडी परंपरा, सौभाग्याचे अलंकार - नथ, कर्णफूले, बाजूबंद, कमरेचे दागिने, गळ्यातील हार, हिरव्या बांगड्या, पायातील जोडवी . परिणामस्वरुप शरीर स्वस्थ, निरोगी आणि मन प्रसन्न रहाते या मागचे विज्ञान आता स्पष्ट झाले आहे. (अधिक माहितीसाठी माझे आभामंडळ - विज्ञान व चिकित्सा या अदृश्य विज्ञानाला दृश्य स्वरुपात प्रकट करणारे मराठीतले पहिले पुस्तक उपलब्ध आहे.) या सेंटरतर्फे गेल्या तीन वर्षात आभामंडळ परिचय (विज्ञान व चिकित्सा), षट्चक्रांचे विज्ञान व चिकित्सा (सूक्ष्म शरीराची ओळख), छाया प्रभा - आयुर्वेद चिकित्सा अर्थात ऑरा फोटोग्राफी, आपले आरोग्य व आपला सूक्ष्मदेह (ऑरा फोटोग्राफी), जाणा आपल्या सूक्ष्म देहाला हे विषय घेऊन 100हून अधिक व्याख्याने महाराष्ट्रभर दिली आहेत. ठाणे येथे 8 दोन दिवसांचे अभ्यास वर्ग घेतले आहेत. अनेक रोटरी क्लब, अनेक व्यासपीठे, शाळा-कॉलेज, सोसायटी, क्लब हाऊस इथे व्याख्याने झाली आहेत. आपण सुध्दा या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन योगदान करु शकता. आपल्या संपर्कातील सोसायटी, कॉलेज, व्यासपिठे इ. माफर्त हे व्याख्यान आयोजित करु शकता.

सेंटर फॉर बायोफिल्ड इव्हॅल्युएशन ( आभामंडळाचे संशोधन व विश्लेषण सेंटर ) ठाणे, ही संस्था काही नि:स्वार्थी, नि:धर्मी, सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन स्थापन झाली आहे. ह्या तर्फे दोन ते तीन तासांचे नि:शुल्क व्याख्यान आयोजीत केले जाते. आजची तरुण पिढी विज्ञाननिष्ठ आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राला अवगत असलेले हे 'गूढ विज्ञान' आज पुन्हा विज्ञानाच्या साह्याने (दृक््श्राव्य माध्यमातून ) प्रस्तुत करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.

1) आजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार, स्पर्धात्मक युगामूळे जीवनशैलीत व विचारसरणीत झालेला बदल, आजच्या तंत्रज्ञानामुळे आपल्या शारीरावर होणारा अदृश्य उर्जेचा नकारात्मक परिणाम दृश्य स्वरुपात दाखविणे, हा होय. 2) ह्या विश्वाची उत्पत्ती उर्जेतुन झाली आहे.(बिग बँन्ग थिअरी ). हे ग्रह, तारे आणि आपण मुळात उर्जारुप आहेत, हे स्पष्ट करणे, या विषयी काही दाखले दाखविणे. हे सर्व विज्ञानाच्या भाषेत सांगण्यासाठी प्राचिन ऋषी मुनिंनी ठरविलेल्या क्रमानुसार एक एक मुद्दा स्पष्ट करणे, त्याला विज्ञानची जोड देणे. 3) उर्जेच्या प्रतिमेवरुन (आभामंडळाचा फोटो - ऑरा फोटो- ग्राफी ) सुक्ष्म शरीरातील चक्र, नाडया यांना प्रत्यक्ष पहाणे व त्यांचा अभ्यास करणे, त्याची शरीरशास्त्राबरोबर (वैद्यकीय शास्त्राशी ) सांगड घालून पुढे शारीरात येणाऱ्या व प्रत्यक्ष शरीरात असणाऱ्या व काही उर्जेच्या उपचारानंतर होणारा सकारात्मक बदल यांचा अभ्यास जगासमोर मांडणे. 4) या तंत्रज्ञानाचा वापर करुन मंत्रशास्त्राचा वनस्पतीवर होणारा परिणाम, विविध आयुर्वेदिक औषधांचा तसेच शिळे व ताजे अन्नपदार्थांचा शरीरावर होणारा परिणाम दृश्य रुपात दाखविणे, व संशोधन कार्यासाठी ठोस पुरावे गोळा करणे. 5) आजवर प्रचलित असलेल्या अदृश्य उपचार प्रणाली उदा.- रेकी, प्राणशक्ती, संगीतशास्त्र, आयुर्वेदिक पंचकर्म, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, संमोहन शास्त्र, लाईट थेरपी, चुंबक थेरपी, इ.साठी उपचारापूर्वी व उपचारानंतरचा सकारात्मक बदल दाखविणे व ठोस पुरावे जमा करणे आणि ह्या व अशा अतिशय कमी खर्चाच्या उपचार प्रणालीला संजिवनी देणे. 6) यापुढे जाऊन हे ऊर्जाशास्त्र आणि आभामंडळाचा अभ्यास, यावरुन आभामंडळ चिकित्सापध्दती विकसित करणे, व भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था पाहता, ही चिकित्सापध्दती जी अतिशय कमी खर्चात व कमी जागेत तसेच कुठलेहि खर्चिक साधन सामुर्गीची गरज नसलेली, कुठल्याही प्रकारची भेदक ऊर्जा न सोडणारी, शरीराला स्पर्श न करता उर्जेचे अडथळे शोधून काढणारी, ऊर्जावलयांवर आधारीत आभामंडळ चिकित्सा पद्धत (नॅशनल हेल्थ स्कॅनिंग सिस्टिम) म्हणून विकसित करणे. या पध्दतीमधे नवजात शिशू, गर्भवती स्त्री, वृध्द व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, यांचे आभामंडळ चिकित्सापध्दतीने निदान (Diagnosis) करता येते. 7) उर्जा शरिराला उर्जा उपचार अधिक योग्य वाटतो. प्राचिन ऋषी मुनिंनी जगाला वैश्विक ऊर्जा व सुक्ष्म देहाचे रहस्य सांगितले. त्याचे आरोग्य ( शारीरिक, मानसिक व भावनिक )संतुलित राहण्यासाठी जास्तीत जास्त ऊपयोग करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे. 8) ह्या शास्त्राची माहिती संघटीत / असंघटीत संस्था, संघटना (कंपन्या) ( कॉरपोरेट वर्ल्ड ) पर्यंत पोचविणे व यातील अधिक महत्वाच्या सभासद वा कम्र्ाचारी (Key Person) ह्यांच्या शरीरिक, मानसिक व भावनिक संतुलनाचा मुद्दा, त्यांचा ऑरा काढुन स्पष्ट करणे, त्यांचे आरोग्य व कार्यक्षमता वाढविणे. 9) ऑरा फोटोग्राफी मधे मानसिक व भावनिक बदलांचा शरीरावर होणारा दुष््परिणाम अभ्यासता येतो. नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या महिलांच्या स्वास्थासाठी याची उपयुक्तता सिध्द करणे.

आमचे केंद्र दर गुरूवारी व रविवारी डॉ. देव B/102, अनुरूप सोसायटी, समतानगर, पोखरन रोड नं. 1, ठाणे (प) इथे सकाळी 11 ते 5 सुरू असते.

संपर्क : डॉ. अनुप देव 99696 79160 cbethane@gmail.com www.ibeindia.org