Jump to content

सदस्य:गणेश धारणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी आभिमान गीत


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी ऎवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऎकतो मराठी जानतो मराठी मानतो मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी॥ आमच्या पिलापिलात जन्मते मराठी आमच्या लहानग्यात रांगते मराठी आमच्या मुलामुलीत खेळते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी येथल्या दिशा दिशात दाटते मराठी येथल्या नगा नगात गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या दरीदरीत धुंदते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळिकळित लाजते मराठी॥ येथल्या नभामधुन वर्षते मराठी येथल्या पिकांमधुन डोलते मराठी येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी॥ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी बोलतो मराठी ऎकतो मराठी जानतो मराठी मानतो मराठी दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||