Jump to content

सदस्य:क्षितिजा संतोष लोंढे/धु १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

९ मार्च २०१९ रोजी महिला दिनानिमित्त प्रकाशित केलेले लेख:-

[संपादन]

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा

[संपादन]

प्रस्तावना

[संपादन]

संपूर्ण जगामध्ये स्त्रियांना आपण पुरुषांच्या बरोबरीच्या आहोत, हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला, यास एकही देश अपवाद नाही. हि संपूर्ण कुटुंब व्यवस्था पुरुषसत्ताक विचाराने उभी राहिली आहे, हाच विचार बदलण्यासाठी व स्त्री देखील "एक माणूस" आहे याची सर्वाना जाणीव व्हावी म्हणून अनेक महान पुरुष व स्त्री यांनी यामध्ये योगदान दिले आहे. सरोजिनी नायडू, अरुणा असफली या महिला नेत्यांनी स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. स्त्रियांना कमी लेखून, विज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांना संपविण्याचे सुरु केले. याचा परिणाम म्हणून सोनोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गर्भ मुलीचा का मुलाचा हे तपासून मुलींना जन्माला येऊ दिला नाही. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करणे आणि या बेकायदेशीर कृतींना आळा घालणे अतिशय आवश्यक आहे.

कायद्याची गरज, इतिहास

[संपादन]

डॉ. संजीव कुलकर्णी यांनी गर्भपात व सोनोग्राफी सेंटर याचे सर्वेक्षण केले. त्यांनी याबाबत निबंध लिहिला व सर्वांच्या निदर्शनास आणून दिले, जो गर्भपाताचा कायदा शासनाने लोकसंख्या नियंत्रणासाठी बनविला आहे त्याचा गैरवापर केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी सर्वप्रथम १९८८ मध्ये " गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला. संपूर्ण देशात मुलींची संख्या कमी होण्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आणि त्यामुळे भारत सरकारने १९९४ मध्ये संपूर्ण देशास लागू केला.

१९९४ - गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा

२००३ मध्ये नाव बदलण्यात आले.

२००३ - गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा

सदर कायद्याने सर्व सामन्यांसाठी तालुका स्तरावरील न्यायालयाची दारे खुली केली, हीच या कायद्याची ताकद आहे.

महत्वाचे नियम व कलम

[संपादन]

हा कायदा एकूण ८ प्रकरणात व नियमाची ९ प्रकरणे यामध्ये विभागला आहे.

एकूण १ ते ३४ कलमे व १ ते १९ नियम यामध्ये कायद्याची विभागणी आहे.

  • कायद्याचे मुख्य हेतू :-

१) गर्भ लिंग निदान व निवड करू शकणारी सर्व केंद्रे कायद्याच्या कक्षात आणणे.

२) या सर्वांवर सतत देखरेख ठेवणे व त्यांच्या तपासणीची यंत्रणा उभारणे.

३) सदर कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हा दाखल करणे.

सोनोग्राफी सेंटर / जनुकीय प्रयोगशाळा / जनुकीय समुपदेशन केंद्र कसे तपासावे?

[संपादन]

केंद्राच्या तपासणी दरम्यान पुढील बाबी पहाव्यात.

१) बोर्ड लावला आहे का? --- नियम १७ (१)

२) कायद्याचे पुस्तक सेंटर वर उपलब्ध आहे का? --- नियम १७ (२)

३) नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावले आहे का? --- नियम ६ (२)

नोंदणी प्रमाणपत्रामध्ये काय तपासावे?

१. नोंदणी प्रमाणपत्राची मुदत

२. अधिकृत प्रमाणपत्राची मुदत

३. सोनोग्राफी माशिनविषयी माहिती

४. माशिनची संख्या व तपशील