सदस्य:कायनात शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझं नाव कायनात अनिस शेख आहे . मी हडपसर मध्ये राहते . माझे शालेय शिक्षण ससाणेनगर विभागात झालेला आहे. माझ्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात आझम कॅम्पस मधून झाली आहे माझ्या कॉलेजचे शिक्षण आझम कॅम्पस मध्ये झालेला आहे . मी एम .सी .वि सी (वोकॅशनल कोर्से) मधून शिकले आहे. माझे पुढचे शिक्षण एच .जी. एम कॉलेज ऑफ एडुकेशन मध्ये झाले आहे. मी शिक्षिका झाल्यावर आझम कॅम्पस मधली प्रशस्त शाळा एम. सी .ई .एस इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये २०१८साली मराठी शिक्षिका म्हणून कार्यरत झाले.


सध्या आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी पालकांची धडपड चाललेली असते पण त्यामुळे त्यांच्या हिंदी,मराठी,उर्दू सिंधी सारख्या मातृभाषांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मातृभाषेतल्या शाळेतील शिक्षकांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड व दुज -भाव निर्माण होतो आणि त्यांना आपल्यात काहीतरी कमीपणा जाणवतो . माझ्या मते इंग्रेजी माध्यमातून शिक्षण घेतले म्हणजे खात्रीने यश मिळेल आणि मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे कोणी कमी ठरेल असे काहीही नाही. यातील मुख्य बाब म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता , शिक्षकाची आपल्या कामाला वाहून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळेंचीप्रेरणादायी वातावरण हे होय . माझे स्वतः चे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे पण त्यामुळे माझ्यात कुठल्याही तऱ्हेच्या न्यूनगंड निर्माण झाला नाही . शिक्षणाच्या चांगल्या दर्जाबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळापांसूनच निरोगी शैक्षणिक वातावरण असणे आवश्यक आहे या मुद्यावर मला जास्त भर द्यावासा वाटतो .मला अगदी मनापासून वाटते कि मातृभाषेतून मूलभूत शिक्षण दिल्यामुळे मुलांना प्रथमपासूनच आपली सामाजिक , सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होते व तशी त्यांची वृत्ती बनते. यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा भक्कम पाय तयार होतो. मुलगा उच्च शिक्षण कोणत्या भाषेत घेतो हे फारसे महत्वाचे नाही, कारण त्याच्या वैचारिक प्रक्रिये फारसा बदल होण्याची शक्यता नसते.