सदस्य:ऋजुता बेलसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी फर्गुसन महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेची विद्यार्थिनी होते. त्यानंतर व्यवस्थापनातील शिक्षण घेऊन मी विविध आयटी कंपन्यांमधे काम केले. भाषा शिकण्याच्या उपजत आवडीमुळे मी मराठी सोबतच बंगाली, हिंदी, संस्कृत, जपानी या भाषा शिकले. अनुवाद करणे हा माझा छंद आहे आणि ती एक कला आहे असे मला वाटते. भाषेशिवाय मला भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती आणि मानसिक आरोग्य या विषयांमधे रुची आहे. या विषयांतील जास्तीत जास्त लेख मराठीत आणण्याचा प्रयत्न मी करेन. धन्यवाद!