सदस्य:आश्विनी बाळासाहेब दौंडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आश्विनी बाळासाहेब दौंडकर

श्री पद्ममणी जैन कॉलेज पाबळ

मु.पो:कन्हेरसर श्री यमाई देवी मंदिराचा इतिहास

      श्री यमाई देवी देवस्थान श्री क्षेत्र कनेरसर (ता.खेड,जि.पुणे) आदिमाया शक्ती श्री यमाई देवीचे मूळ ठिकाण माहूरगड आहे. हि साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुकामाता हे एक पूर्ण शक्ती पीठ होय. हि रेणुका माता म्हणजेच यमाई माता हि संपूर्ण हिंदुस्थानातील विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व हिंदू लोकांची कुलस्वामिनी आहे . अनेकांची मनोकामना पूर्ण करणारी जगदंबा आहे .
       या मंदिराचा जिर्णोद्धार १९२५-२६ या कालखंडात झाला.आडाचा जिर्णोद्धार १९४७ साली झाला.व पाणी ओढण्यास चाक आणि दगडाचे पायटे बसविण्यात आले.व स्नानाकरिता आडाभोवताली कुंड्या व कठडा बांधण्यात आला. मंदिराच्या आवाराचा जिर्णोद्धार १९७२ चा दुष्काळ श्रमदान लोकवर्गणीतून झाला.संपूर्ण मंदिर ऑईल पेंटमध्ये रंगकाम करण्याकरिता १९८२ साली सुरुवात झाली.व त्या नंतर आपण प्रत्यक्ष पाहत असलेली इतर कामाची सुरुवात होवून काही कामे पूर्ण झाली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.देवीची यात्रा भरण्याकरिता व इतर उपयोगाकरिता एकूण साडेआठ एकर जमीन आहे. 

मंदिराच्या बांधकामाबद्दल असणारा शिलालेख पूर्वीच्या जीर्नोद्धाराच्या वेळी एका खोलीत ठेवला होता पण कामगारांच्या नजरचुकीने तो गहाळ झाला. त्यावरील लिपी हि दक्षिण हिंदुस्थानातील तामिळी मल्याळी होता.