सदस्य:आईसाहेब राधाताई महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आईसाहेब राधाताई महाराज या महाराष्ट्रातील एकमेव महिला सन्यासी परंपरेतील मठाधिपति आहेत. तसेच अखिल भारतीय वारकरी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. संत मीराबाई [आईसाहेब ] संस्थान तीर्थक्षेत्र हे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र असून महिलांची पंढरी म्हणून ओळखले जाते. राधाबाईंचा हा मठ महासांगवी (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे.

अध्यात्मिक गुरुमाऊली म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे तसेच सलग २४ तास कीर्तन सेवा करण्यात त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. देशभर वारकरी संप्रदाय व महिलांच्या हितासाठी त्या काम करत असतात.[१]

आईसाहेब राधाताई महाराज महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या १६०० एवढी लोकसंख्या असलेल्या महासांगवी या गावात राहणाऱ्या महंत आहेत. त्या अत्यंत अभ्यासू कीर्तनकार असून त्यांनी सांप्रदायिक कीर्तने, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबंदी व शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाज जागृतीची कामे करतात. त्यांच्या कीर्तनांतून त्या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी प्रचार करतात.


Facebook : आईसाहेब राधाताई महाराज

Instagram : aaisaheb_radhatai_maharaj

YouTube  : aaisaheb_radhatai_maharaj


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Maharaj, Aaisaheb radhatai. [www.radhataimaharaj.in "Aaisaheb Radhatai Maharaj"] Check |url= value (सहाय्य). www.radhataimaharaj.in.

बाह्य दुवे[संपादन]