सदस्य:अपूर्वा सांबरेकर/धुळपाटी
गोव्यातील मंदिरेः-
1) कटमगाळीः- फोंडा-फर्मागुडीपासून दोन ते अडीच कि.मी अंतरावर कटमगाळी हे एक धार्मिक ठिकाण आहे. कटमगाळी येथे कटमगाळ दादा नावाचे एक श्रद्धास्थान आहे. तेथे दर रविवार आणि बुधवार भाविकांची गर्दी असते. कटमगाळ दादा हा तेथील राखणदार होता असे म्हटले जाते. जी मागणी भाविक करतो ती कटमगाळ येथे पूर्ण होते अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.
· फर्मागुडी या गावाविषयी एक ऐतिहासिक कथा प्रचलित आहे. गोमंतकात पोर्तुगीजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पळवून लावण्यासाठी ज्या भूमीवरून फर्मान सोडले आणि गुडी उभारून त्याचा शुभारंभ केला म्हणून त्या भूमीला फर्मागुडी हे नाव पडले.
2) गोपाळ गणपतीः- फोंडा-फर्मागुडी येथे गोपाळ गणपती नावाचे प्राचीन मंदीर आहे. ‘गो’ म्हणजे गाय, ‘पाळ’ म्हणजे पालन करणारा. गुराख्यानी स्थापन केलेला गणपती म्हणून गोपाळ गणपती अशी माहिती या देवस्थानाविषयी सांगितली जाते. या देवस्थानाचा जिर्णोद्धार गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी केला. देशी-विदेशी पर्यटक या स्थळी भेट देतात.
3) विठोबा मंदिरः- वरचा बाजार फोंडा येथे हे विठोबाचे मंदिर आहे. अनेकांचे हे श्रद्धास्थान आहे. हे मंदिरही शेकडो वर्षापूर्वीचे असल्याचे तेथील अध्यक्षांनी सांगितले.