सतीश बडवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. सतीश बडवे (२१ मे, १९५७ - ) हे एक मराठी लेखक आहेत. त्‍यांनी एम.ए., एम.फिल., पीएच.डी. (मराठी) या पदव्या घेतलेल्या आहेत. त्‍यांनी श्रीरामपूर टाईम्‍स, दैनिक सार्वमत या दैनिकांमध्‍ये सहसंपादक म्‍हणून काम केले. त्‍यांनी गिरणा पब्लिक स्‍कूल, दाभाडी मालेगाव आणि बेलगंगा टेक्निकल पब्लिक स्‍कूल, बेलगंगा नगर - भाेरस, ता. चाळीसगाव या इंग्रजी शाळेत मराठी भाषा अध्‍यापनाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाड्.मय विभागात ते २०१४ ते २०१७ दरम्यान प्राध्‍यापक व विभागप्रमुख्‍ा म्‍हणून कार्यरत होते.

पुस्तके[संपादन]

१. मध्ययुगीन साहित्याविषयी
२. संतसाहित्य समीक्षेचे बीजप्रवाह
३. साहित्याची सामाजिकता

संपादने[संपादन]

१. दमयंती स्वयंवर
२. मराठवाडयातील साहित्य (सहकार्याने)
३. साहित्य : आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा
४. संत नामदेवविषयक अभ्यास
५. संत एकनाथ – एक समग्र अभ्यास
६. साहित्य संस्कृती आणि परिवर्तन
७. मोरोपंताची श्लोककेकावली