सतरावी कला (योग)
Appearance
सतरावी कला - हिलाच अमृतकला, जीवनकला अशी अन्य नावे आहेत.
ब्रह्मरंध्र किंवा सहस्त्रदल चक्र यामधून अमृत पाझरते असे शास्त्र सांगते, म्हणून मेंदूच्या त्या भागाला योगाच्या परिभाषेत चंद्र किंवा चंद्रामृत तळे (सत्रावीचे तळे) असे म्हणतात.
सोळा कला कोणत्या?
[संपादन]एक परंपरा | दुसरी परंपरा |
---|---|
पाच ज्ञानेंद्रिये | पाच ज्ञानेंद्रिये |
पाच कर्मेंद्रिये | पाच कर्मेंद्रिये |
अंतःकरण पंचक | पंच महाभूते |
सोळावा प्राण | सोळावे मन |
स्वरूपानुभव आणि त्याचा आनंद ही सत्रावी कला. [१]
सोळा कलांचा पुरुष कोण?
[संपादन]सोळा कलांचा पुरुष कोणता असा प्रश्न उपनिषदात विचारला गेला आहे, त्याचे उत्तर आत्मा असे देण्यात आले आहे. [१]