संस्कृती कला दर्पण
चंद्रशेखर सांडवे आणि अर्चना नेवरेकर यांनी चालवलेली संस्कृती कलादर्पण ही संस्था इ.स.२००१पासून सामाजिक कार्य, पत्रकारिता संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील व्यक्तींना संस्कृती कलादर्पण पुरस्कार प्रदान करत आली आहे. संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जातो.
चंद्रशेखर सांडवे हे पटकथा लेखक, दिगदर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांनी आई गं, थैमान, महासत्ता, आणि स्वातंत्र्याची ऐशी तैशी या मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
अर्चना नेवरेकर या चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. कुतुभ, चालू नवरा भोळीबायको, माणूस, लढाई, सुना येती घरा आदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे.
१ला कलादर्पण गौरव पुरस्कार २००१मध्ये पंडित जसराज यांना प्रदान करण्यात आला. २००२ साली चिमणी पाखरे या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला.
पहा
[संपादन]संस्कृती कलादर्पण पुरस्कार २०११
संदर्भ
[संपादन]
(अपूर्ण)