संयुक्त क्रियापद
संयुक्त क्रियापद ही मराठी व्याकरणाच्या परंपरेत मांडण्यात आलेली संकल्पना आहे. संयुक्त क्रियापद ही संकल्पना मराठीत इंग्रजी व्याकरणाच्या परंपरेतून आणि त्यातील उद्देश्य-विधेय ह्या तऱ्हेच्या वाक्यविश्लेषणाच्या परंपरेतून निर्माण झाली आहे. विविध भारतीय भाषांसंदर्भातही ही संकल्पना वापरण्यात येते. मराठीत काम करणे, प्रेम करणे, उडी मारणे, निर्माण करणे इ. रचनांना संयुक्त क्रियापद असे म्हणण्यात येते.
मराठी व्याकरणातील संयुक्त क्रियापदाचे लक्षण
[संपादन]संयुक्त क्रियापद ह्या संकल्पनेत नेमक्या कोणकोणत्या रचना येतात ह्याबाबत एकमत नाही. प्रेम करणे, उडी मारणे अशा नाम + धातू मिळून संयुक्त क्रियापद होते. तर करून टाकणे, लिहून काढणे ह्या रचनांत धातू (धातूसाधित/ कृदन्त) + धातू (आख्यातप्रत्यययुक्त) मिळून संयुक्त क्रियापद होते. ह्यात एक धातू गौण तर एक धातू मुख्य असतो.
संयुक्त क्रियापद म्हणजे काय आणि ते का मानायचे ह्याचे स्पष्टीकरण देताना विविध मुद्दे मांडण्यात आलेले आहेत.
- संयुक्त क्रियापदात दोन शब्द मिळून एक साधी संकल्पना व्यक्त करतात. उदा. प्रेम करणे
- संयुक्त क्रियापदातल्या घटक शब्दांचे अर्थपरिवर्तन होते. उदा. गप्पा मारणे (तुळा : गुद्दा मारणे)
- संयुक्त क्रियापदात दोन धातूंपैकी एक धातू मुख्य तर दुसरा गौण असतो. उदा. हे पुस्तक लिहून टाक. ह्यात लिह हा धातू मुख्य, टाक हा धातू गौण. मात्र संयुक्त क्रियापद नसलेल्या रचनांत दोन्ही धातू मुख्य असतात. उदा. झाडावर चढून आंबे काढ. ह्यात चढ आणि काढ हे दोन्ही धातू मुख्य.[१]
मराठी व्याकरणपरंपरेतील संयुक्त क्रियापद ह्या संकल्पनेचा इतिहास
[संपादन]संयुक्त क्रियापदासंबंधीचा मराठी व्याकरणपरंपरेतील वाद
[संपादन]संयुक्त क्रियापदाचा वाद हा तांत्रिक स्वरूपाचा आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. संयुक्त क्रियापद मानण्याला जे विरोध करतात ते प्रेम करणे, काम करणे, उडी मारणे ह्या रचना मराठीत नाहीत असे म्हणत नाहीत. ह्या रचना मराठीत रूढ आहेत ह्याबाबत समर्थक आणि विरोधक ह्यांचे एकमत आहे. मतभेद आहेत ते ह्या रचनांचे व्याकरणिक स्पष्टीकरण देण्यासाठी संयुक्त क्रियापद ही संकल्पना आवश्यक आहे का किंवा ही संकल्पना वापरल्याने कोणकोणत्या तार्किक अडचणी उपस्थित होऊ शकतात ह्याबाबतचे आहेत.
विस्तारवादी पक्ष
[संपादन]अतिविस्तारवादी पक्ष
[संपादन]अभाववादी पक्ष
[संपादन]काही चर्चास्पद उदाहरणे
[संपादन]संदर्भ
[संपादन](अपूर्ण)
- ^ अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास; मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; १९८७; सुलेखा प्रकाशन; पुणे (पृ. १७९)