संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललित लेखसंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २००० मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
[संपादन]एका विशेष कामगिरीसाठी ग्रेस यांनी हा संग्रह एका मुंगीस अर्पण केलेला आहे.
परिचय
[संपादन]'राजपुत्र आणि डार्लिंग' या काव्यसंग्रहातील 'डार्लिंग' या कवितेत ग्रेस यांनी (१९७२) 'खरे तर मला संध्यामग्र पुरुषाची लक्षणे सांगावयाची आहेत' असे म्हणले होते. अठ्ठावीस वर्षांनंतर ती लक्षणे ग्रेस यांनी ग्रंथबद्ध करून रसिकांसमोर ठेवली. दैनिक सामनाच्या 'उत्सव' या रविवासरीय पुरवणीतून या लक्षणांना पूर्वप्रसिद्धी मिळालेली होती. या संग्रहात एकूण ५२ आत्मपर ललितबंध समाविष्ट आहेत. 'मृगजळाचे बांधकाम' या शीर्षकाचा एक लेख या संग्रहात आहे. खेरीज व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी संबंधित 'बनगरवाडीचा मेंढपाळ' आणि कुसुमाग्रजांवरील एक लेखही या संग्रहात आहे.