संदीप धुर्वे
Appearance
डॉ. संदीप प्रभाकर धुर्वे हे आर्णी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.[१] भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत.
राजकीय कारकीर्द
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदीप धुर्वे यांची राजकीय कारकीर्द २००४ साली सुरू झाली.
- त्यावेळच्या केळापूर (आताच्या आर्णी) विधानसभा मतदार संघातून त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला.[२]
- २००९ मध्ये भाजपचा पराभव.
- २०१४ साली भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली, त्यात त्यांचा पराभव होवून भाजप विजयी.
- २०१९ मध्ये पुन्हा भाजपने त्यांना उमेदवारी दिली. यावेळीही त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे व भाजपचे बंडखोर माजी आमदार राजू तोडसाम यांचा पराभव केला.[३]
- २०२४मध्ये परत भाजप आमदार.
- ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९". विकिपीडिया. 2020-05-19.
- ↑ "DHURVE SANDIP PRABHAKAR(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- KELAPUR (ST)(Yavatmal) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ↑ "Dr Dhurve Sandeep Prabhakar Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly". NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2020-07-26 रोजी पाहिले.