Jump to content

संजय कृष्णाजी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय कृष्णाजी पाटील
जन्म ८ ऑगस्ट, १९६६
मळगे खुर्द
शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी, एम. ए. मराठी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्रशासन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक, कादंबरी, गीतलेखन, पटकथा
प्रसिद्ध साहित्यकृती

लेझीम खेळणारी पोरं (कवितासंग्रह)

  • शून्य प्रहर (एकांकिकासंग्रह)
  • आभाळ झेलण्याचे दिवस (लेखसंग्रह)
  • हरवलेल्या कवितांची वही (कवितासंग्रह)
  • दशक्रियेची चित्रकथा
  • फक्त लढ म्हणा (नाटक)
  • मायलेकी (नाटक)
वडील श्री. कृष्णाजी पाटील

संजय कृष्णाजी पाटील ह्यांचा जन्म ८ ऑगस्ट, १९६६ रोजी मळगे खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे झाला असून ते मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे साहित्यिक आहेत. त्यांनी आतापर्यंत लेझीम खेळणारी पोरं (कवितासंग्रह) शून्य प्रहर (एकांकिकासंग्रह) आभाळ झेलण्याचे दिवस (लेखसंग्रह) हरवलेल्या कवितांची वही (कवितासंग्रह) दशक्रियेची चित्रकथा (),फक्त लढ म्हणा (नाटक) मायलेकी (नाटक) इत्यादी साहित्यकृती निर्माण केल्या आहेत.

शिक्षण

[संपादन]

संजय कृष्णाजी पाटील यांचे शालेय शिक्षण बिद्री सहकारी साखर कारखाना, कागल, जि. कोल्हापूर येथे झाले. तसेच त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील ॲण्ड रूरल इंजिनिअरिंग, गारगोट, जि. कोल्हापूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून एम. ए.ला मराठी विषय घेऊन पूर्ण केले.

प्रशासकीय सेवा

[संपादन]

संजय कृष्णाजी पाटील हे महाराष्ट्र प्रशासन सेवेत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेकविध पदे कौशल्यपूर्णतेने सांभाळलेले आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • लेझीम खेळणारी पोरं (कवितासंग्रह)
  • शून्य प्रहर (एकांकिकासंग्रह)
  • आभाळ झेलण्याचे दिवस (लेखसंग्रह)
  • हरवलेल्या कवितांची वही (कवितासंग्रह)
  • दशक्रियेची चित्रकथा
  • फक्त लढ म्हणा (नाटक)
  • मायलेकी (नाटक)

पटकथा, संवाद आणि गीतलेखन

[संपादन]
  • पांगिरा
  • जोगवा
  • दशक्रिया
  • बंदिशाळा
  • ७२ मैल एक प्रवास
  • रेती (गीतलेखन)
  • हिरकणी (गीतलेखन)

पुरस्कार

[संपादन]

हरवलेल्या कवितांची वही ह्या काव्यसंग्रहास आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीतर्फे देम्यात येणारा कवियत्री इंदिरा संत पुरस्कार- १३ जुलै, २०२९ लेझीम खेळणारी पोरं या कवितासंग्रहास मिळालेले पुरस्कार

  • तुका म्हणे साहित्य पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाम साहित्य पुरस्कार
  • बालकवी ठोंबरे पुरस्कार
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा आरती प्रभू पुरस्कार
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार