संघम काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संघम काळ (मराठी लेखनभेद: संगम काळ ; तमिळ: சங்ககால பருவம் , संककाल परुवम / संककाल पर्वम; इंग्लिश: Sangam period, संगम पिरियड) हा तमिळ इतिहासातील इ.स.पू.चे ३रे शतक ते इ.स.चे ३रे शतक यांदरम्यानचा अभिजात ऐतिहासिक कालखंड होय. तमिळ संघम म्हणजेच तमिळ विद्वत्सभांवरून या कालखंडास या नावाने ओळखतात.