Jump to content

संख्या महात्म्य १०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 संख्या महात्म्य संख्या १०

[संपादन]

भाग २

[संपादन]

दशविध रंग -

[संपादन]

१ हिरवा , २ तांबडा , ३ निळा , ४ काळा ,५ अत्यंत लाल , ६ शेंदरी , ७ पिंगट , ८ करडा , ९ पारवा आणि १० मोराच्या गळ्याखालील रंगासारखा मेचक ( म . भा . शांति . अ . २८४ )

दशविध वक्तृत्व -

[संपादन]

१ परिभावित , २ सत्य , ३ मधुर , ४ सार्थक , ५ परिस्फुट , ६ परिमित , ७ मनोहर , ८ चित्र , ९ प्रसन्न , १० भावानुगत . असे वक्तृत्वाचे दहा प्रकार . ( वस्तुरत्नकोश)

दशविधशौच ( शुद्धि )-

[संपादन]

१ भावशौच , २ स्नानशौच , ३ जलशौच , ४ मृत्तिका - शौच , ५ श्मश्रुशौच , ६ संस्कारशौच , ७ पवित्र वाक्य , ८ प्राणिदया शौच , ९ अर्थशौच व १० आचारशौच . ( वस्तुरत्नकोश )

दाशराज्ञ युद्ध -

[संपादन]

ऋवेदकालीन एक फार मोठी ऐतिहासिक घटना . एका बाजूला राजा सुहास व त्याचे विरुद्ध , १ कवि चायमान , २ राजा तुर्वश , ३ वैकर्ण राजे , ४ शिम्यु , ५ देवक , ६ शंबर ,७ भेद , ८ पक्थ , ९ श्रुत व १० कवष , या दहा बलाढय राजांमधील घनघोर युद्ध . हे दहा राजे अथवा त्यांचे संघ त्यांचें पौरोहित्य विश्वमित्राकडे होतें . सुदास राजाचें पौरोहित्य वसिष्ठाकडे होतें , वसिष्ठानें संघटना करून सुदास राजाला दहा संघाविरुद्ध जय मिळवून दिला . हे युद्ध परुष्णी आणि यमुना या नद्यांमधील प्रदेशांत झालें अशी कथा आहे . ( ऋग्वेद दर्शन ) ( दाशराज्ञ युद्ध )

दहा अंगें ( यमाचीं )-

[संपादन]

१ अहिंसा , २ सत्य , ३ अस्तेय , ४ ब्रह्मचर्य , ५ क्षमा , ६ धृति , ७ दया , ८ आर्जव , ९ मिताहार व १० शौच .

दहा अंगें ( नियमांचीं )-

[संपादन]

१ तप , २ संतोष , ३ आस्तिक्य , ४ दान , ५ ईशपूजन , ६ सिद्धांत - वाक्य , ७ ह्री ( लज्जा ) ८ मति , ९ जप व १० व्रत .

दहा अवतार ( शिवदेवतेचे )-

[संपादन]

१ महाकाल , २ तार , ३ बालभुवनेश , ४षोडशश्री विद्येश , ५ भैरव , ६ छिन्नमस्तक , ७ धूमवान ‌ ८ बगलामुख , ९ मातङ‌ग आणि १० कमल ( शिव . पु . शतरुद्र अ . १७ )

दहा अवस्था ( ग्रहांच्या )-

[संपादन]

१ दीप्त , २ स्वस्थ , ३ मुदित , ४शांत , ५ शक्त , ६ पीडित , ७ दीन , ८ खल , ९ विकल आणि १० भीत , ( सुलभ ज्योतिष )

दहा अपराध नामजपासंबंधीं -

[संपादन]

१ संतांची निंदा , २ असत् ‌ मार्गी मनुष्यापुढें नामगुणांचें कीर्तन , ३ दैवतामध्यें भेदबुद्धि , ४ वेदांवर अश्रद्धा , ५ शास्त्रावर अविश्वास ,६ गुरूवचनावर अश्रद्धा , ७ परमेश्वर नाममहिमा याला अर्थवाद समजण्याचा भ्रम , ८ नुसत्या नामानें पापक्षालन होतें असें समजून पाप करीत राहणें , ९ नामानेंच पुण्यलाभ होतो म्हणून आश्रमविहित कर्म न करणें आणि १० परमेश्वर नामस्मरण हें इतर यज्ञ , तप , व्रत आदि शुभकर्मांबरोबर समजणें . ( पद्मपुराण )

दहा आद्य आचार्य शकुन शास्त्राचे -

[संपादन]

१ श्रीशंकर , २ अत्रि , ३ गर्ग , ४ गुरू , ५ शुक्र , ६ वसिष्ठ , ७ व्यास , ८ कौत्स , अ ९भृगु आणि १० गौतम ( वसंतराज शाकुन )

दहा आत्म्याचीं विधेयें ( साक्षात् ‌ बोधक ) विशेषणें -

[संपादन]

१सत् ‌, २ चित् ‌ , ३ आनंद , ४ ब्रह्म , ५ स्वयंप्रकाश ; ६ कूटस्थ , ७ साक्षी , ८ द्र्ष्टा , ९ उपद्र्ष्टा व १० एक ( तत्त्व - निज - विवेक )

दहा आत्म्याचीं निषेध्यें ( प्रपंचाचे निषेध द्वाराबोधक) विशेषणें -

[संपादन]

१ अनंत , २ अखंड , ३ असंग , ४ अद्वितीय , ५ अजन्मा , ६ निर्विकार , ७ निराकार , ८ अव्यय , ९ अव्यक्त आणि१० अक्षर ( तत्त्व - निज - विवेक )

दश आद्य आचार्य संन्यास मार्गाचे -

[संपादन]

१ गौडपादाचार्य , २ गोविंद पादाचार्य , ३ विवरणाचार्य , ४ शंकरचार्य , ५ विश्वरूपाचार्य , ६ पृथ्वीधराचार्य ७ सहजाचार्य , ८ हस्तामलक , ९ पद्मपादाचार्य व १० तोटकाचार्य . " संन्यासामाजीं हें अतिवर्य , हे परम सूर्य ज्ञानाचे "( हस्तामलक )

दहा आरोग्याचीं सूत्रें -

[संपादन]

१ स्वच्छता , २ मोकळी हवा व सूर्यप्रकाश . ३ व्यायाम , ४ आहार , ५ विश्रांति , ६ ताठ बसणें , ७ नियमित आहार - विहार , ८ पाणी , ९ वस्त्र आणि १० मनःप्रवृत्ति . 

दहा आज्ञा ( बायबलमधील )

[संपादन]

१ रविवार हा विश्रांतीचा दिवस , २परद्रव्याचा लोभ धरूं नको , ३ परस्त्रीचा लोभ धरूं नको , ४व्यभिचार करूं नको , ५ हिंसा करूं नको , ६ चोरी , करूं नको , ७ खोटी साक्ष देऊं नको , ८ मातापितरांची आज्ञा पाळ , ९ मूर्तिपूजा करूं नको व १० ईश्वराचें नांव व्यर्थ घेऊं नको . या आज्ञा खिस्ती धर्मग्रंथांत ( जुना करारं ) सांगितलेल्या आहेत . ( जुना करार अ . २० ).

दहा ईश्वर प्राप्तीच्या वैदिक विद्या -

[संपादन]

१ उद्नीथविद्या , २ संवर्गविद्या , ३ मधुविद्या , ४ पंचाग्निविद्या , ५ उपकोसल - आत्मविद्या , ६ शांडिल्यविद्या ७ दहरविद्या , ८ भूमविद्या , ९ दीर्घायुष्यविद्या , १० मंथविद्या ( रामगीता )

दहा ईश्वरविषयक बुद्धिगम्य कल्पना अथवा गुण -

[संपादन]

१ पुरुषोत्तम , २ विश्वाचें अंतर्यामीसूत्र , ३ वैश्वानर - जीवात्मा किंवा परमात्मा , ४ शाश्चत , चिन्मय विश्वांतील सूर्य , ५ मायी - अपूर्वशक्ति " मम माया दुरत्यया " ( भ . गी. ७ - १४ ) ६ विश्वांतील रस , ७ तज्जलान् ‌ किंवा जगाचे प्रभव - प्रलय - स्थिति , ८ अतिष्ठान - सर्वातीत पुरुष , ९ परम ज्ञेय व १० परमाश्रर्य . चिंतनाला योग्य असे हे दहा गुण . ( भ . गी . सा . दर्शन )

दहा उपाय ( उपजीविकेचे )-

[संपादन]

१ विद्या ( वेदव्यतिरिक्त ), २ शिल्प , ३ रोजगार , ४ नौकरी , ५ गोरक्षण , ६ व्यापार , ७ शेती, ८ अंतःकरणाची विविध वृत्ति , ९ भिक्षेवर निर्वाह आणि १० व्याजबट्टा .विद्या शिल्पं भृतिः सेवा गोरक्ष्यं विपणिः कृषिः ।धृतिं भैक्ष्यं कुसीदंच दश जीवनहेतव्वः ॥ ( मनुअ १० - ११६ )

दहा कुलें विवाहास वर्ज्य -

[संपादन]

१ क्रियाहीन , २ पुरुषरहित , ३ वेदरहित , ४ रोमश , ५ अर्शस ( मूळव्याधि रोग असलेले ) ६ क्षयरोगयुक्त , ७ आमयनी ( अग्निमांद्य ), ८ अपस्मार , ९ श्वेतकुष्ठयुक्त व १० कुष्ठयुक्त . ( मनु . ३ - ७ )

दहा खेळ बुद्धिबळाचे

[संपादन]

१ शह , २ मात , ३ प्यादी , ४ हुचमल्ली , ५ कोंडमात , ६ मारेमात - फकीरी , ७ काटशह , ८ अविरतशह , ९ ठाणबंधमात व १० द्विगुणशह . ( दु . श . को . )

दहा गुण ( काव्याचे )-

[संपादन]

१ श्लेष , २ प्रसाद , ३ समता , ४ समाधि, ५ माधुर्य , ६ ओज , ७ सौकुमार्य , ८ अर्थव्यक्त , ९ उदारता ,व १० कांति .औदार्यं समता कांतिरर्थव्यक्तिः प्रसन्नता ।समाधिः श्लेष ओजोऽथ माधुर्यं सुकुमारता ॥ ( भ .ना . )

दहा गुण ( गायनाचे )-

[संपादन]

१ सुरक्त - बाद्यें स्वरांत मिळवून अ घेणें , २ पूर्ण - उच्चार उत्ताम तऱ्हेनें करणें , ३ अलंकृत - आवाज यथायोग्य लावणें , ४ प्रसन्न - निःशंक होऊन गंभीर आवाजानें गाणें , ५ व्यक्त - उच्चार अर्थानुरूप व स्वष्ट करणें , ६ विकृष्ट - आलापांचे स्वर स्पष्ट रीतीनेंलावणें , ७ श्लक्ष्णलयीमध्यें स्वरांचा विप्रस्तार करवून दाखविणें , ८ सम - तालवद्ध गाणें , ९ सुकुमारमृदुस्वर येतील तेथें मृदु उच्चार करणें आणि १० मधुर - गाणें , मधुर गाऊन दाखविणें , ’ दशैते स्युर्गणा गीते । ’ ( संगीत रत्नाकर )

दहा गुण गोदुग्धाचे -

[संपादन]

१ गोड , २ थंड , ३ मऊ , ४ स्निग्ध , ५ दाट , ६ श्लक्ष्ण ( खरखरीत नव्हे तें ) ७ बुळबुळीत , ८ जड , ९मंद आणि १० निर्दोष ( चरक - सूत्र - २७ - २२१ )

दहा गुण परमात्म्याचे -

[संपादन]

१ सर्वाहून मोठा , २ प्रकाशवान् ‌ ३ दिव्यत्व , ४ ऐश्वर्य वाढविणारा , ५ संसारसमुद्राच्या अत्यंत सखोल भागांतहि असणारा ६ सत्यस्वरूप , ७ चिरयुवा , ८ सेवा करण्यास योग्य , ९ हिंसारहित शब्दांची प्रेरणा करणारा आणि १० अनंतसुखांना देत राहिला आहे . ( अथर्व - अनु. मराठी )

दहा गुण सात्त्विक अन्नाचे -

[संपादन]

१ आयुष्य , २ सत्त्व वाढविणारे, ३ बल , ४ आरोग्य , ५ सुख , ६ प्रीति वाढविणारे , ७ रसयुक्त , ८ स्निग्ध , ९ शरीरांत स्थिर रूपानें फार वेळ राहणारे आणि१० मनाला आनंद देणारे ( भ . गी . १७ - ८ )

दहा गुण स्नानाचे -

[संपादन]

( अ ) १ रूप , २ तेज , ३ बल , ४ शुचिता , ५ दीर्घायुष्य , ६ आरोग्य , ७ पवित्रता , ८ दुःअखप्रनाश , ९ तप व १० बुद्धि . ( दक्षस्मृति ); 

( आ )

 १ बल , २ रूप , ३ शुद्धध्वनि , ४ वर्णांचा स्पष्ट उच्चार , ५ मृदुपणा , ६ सुगंध , ७ स्वच्छता , ८ संपत्ति , ९ लावण्य व १० उस्कृष्ट स्त्रिया , हे दहा गुण स्नानशील पुरुषाचा आश्रय करतात .( म . मा . उद्योग )

दहा गोष्टी अन्नावर अवलंबून -

[संपादन]

१ वर्ण , २ कांति , ३ सुस्वरता , ४ आयुष्य , ५ प्रतिभा , ६ सुख , ७ संतोष , ८ पुष्टि , ९ शरीरबल व १० बुद्धि . असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे .तुष्टिपुष्टि बलं मेधा सर्वं अन्ने प्रतिष्ठितम् ‌ ( आयुर्वेद )

दहा गोष्टी वर्ज्य ( व्यवहारांत )-

[संपादन]

१ चाकर - गर्विष्ठ , २ मुलगा - अति लाडका , ३ शत्रु - वर्म जाणणारा , ४ भाऊ - बाईलबुद्धीचा , ५ जामात - हट्टी व वेडा , ६ वक्ता - मित्रा अथवा भिडस्त , ७ मित्र - कपटी , ८ विद्धान ‌- स्तुतिपाठक , ९रोगी - पथ्य न करणारा , व १० गायक - मानी . या दहा गोष्टी व्यवहारांत वर्ज्य म्हणून सांगितल्या आहेत .

दहा गुरू ( शीखपंथाचे )-

[संपादन]

१ गुरू नानक , २ गुरू अंगडशहा , ३ अमरदास , ४ रामदास , ५ गुरू अर्जुन , ६ हरिगोविंद , ७ हरिराय, ८ हरिकृष्णजी , ९ तेजबहाद्दर व १० गुरू गोविंदसिंग .

दहा गुणजन्य सिद्धि -

[संपादन]

१ क्षुधा - तृषाप्रभृति ऊमींच्या पलीकडे जाणें , २ दूरचें पाहणें , ३ दूरश्रवण ४ शीघगति , ५ रूपसिद्धि , ६ परकायाप्रवेश , ७ इच्छामरण , ८ स्वर्गांगनाप्राप्ति , ९ संकल्पसिद्धि , व १० निरंकुश आज्ञा . या दहा गुणजन्य सिद्धि होत . ( भाग . स्कं . ११ - १५)

दहा ग्राम धान्यें

[संपादन]

 -१ तांदूळ , २ जव , ३ तीळ , ४ उडीद , ५ अणु, ६ प्रियंगु ( राळे ), ७ गहूं , ८ मसूर , ९ वाल आणि १० कुळीथ.( तैत्तिरीय ब्राह्मन . अ . ८ )

दहा ज्योतिःशास्त्राचे ग्रंथकार आचार्य

[संपादन]

 -१ वराह , २ नृसिंह , ३ श्रीपति , ४ सत्य , ५ भास्कार , ६ ब्रह्मगुप्त , ७वैद्यनाथ , ८ लल्ल , ९ श्रीधर व १० रेणुक . ( श्रीषट् ‌ पंचाशिका )

दहा घन वाद्यें

[संपादन]

 -१ चिपळ्या , २ करताल , ३ झांज , ४ टाळ , ५ मंजिरी , ६ तास , ७ घंटा , ८ घुंगरू , ९ टिपर्या व १० जलतरंग .हीं दहा घन म्हणजे एकावर एक आघात करून वाजविलीं जाणारीं वाद्यें होत .

दहा तामस ऋषि

[संपादन]

 १ कणाद , २ गौतम , ३ शक्ति , ४ उपमन्यु , ५ जैमिनि , ६ कपिल , ७ दुर्वास , ८ मृकंडु , ९ बृहस्पति आणि १० जामदग्न्य ( परशुराम ) भार्गवं जामदग्न्यंच दशैतान्तामसानृषीन् ‌ । पद्म . उत्तरखंड )

दहा थाट ( गायनशास्त्र )

[संपादन]

-१ कल्याणथाट , २ बिलावल , ३ खमाज , ४ भैरव , ५ पूर्वी थाट , ६ मारवा , ७ काफी , ८ असावरी , ९ भैरवी व १० तोडी थाट . थाट म्हणजे स्वरानुरोधानें रागाचें वर्गीकरण .