Jump to content

श्री सरस्वती देवालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"श्री सरस्वती देवालय"(सोलापूर)

सरस्वती देवालय,सोलापूर
प्रवेशद्वार
फोटॊ
मंदीर
देवी सरस्वती

" नमस्ते शारदे देवी ,

त्वाहम प्राथये नित्यम ,

ज ्ञान मीक्षामच देही में ।"

अशा शब्दात विद्येची देवता श्री सरस्वती माता हिच्याकडे ज्ञानाची भिक्षा मागणारे उपासक फारच कमी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात श्री सरस्वती देवीचे मंदिर आढळणे फारच दुर्लभ आहे.  असे असतानाही सोलापुरात गेल्या ९० वर्षांपासून सरस्वती चौकात श्री सरस्वती देवीचे मंदिर दिमाखाने उभे आहे, हें सोलापूरकरांचे भाग्यचं. या दुर्मिळ मंदिरामुळेच या मंदिराजवळील चौकाला सरस्वती चौक असे नाव पडले आहे

स्थापना : श्री सरस्वती देवीच्या मंदिराची स्थापना २ डिसेंबर १९२७ रोजी ,दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी करण्यात आली असून, कै.सौ.कौशल्याबाई जवाहिरलाल कलवार यांनी मोठ्या भक्तीभावाने श्री सरस्वती देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली .

इतिहास: विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वती देवीच्या कृपेने आपल्याला अनेक कला अवगत झाल्या अशी कौशल्याबाईंची श्रद्धा होती म्हणून ,अशा विदयेच्या देवतेची अखंड सेवा घडावी ,असा वेध त्यांच्या मनाने घेतला व आपल्या मृत्यूनंतर दागिने,कपडे,आपल्या बरोबर येणार नाहीत तर आपला परमार्थच आपल्याबरोबर येतो या जाणिवेतून त्यांनी मंदिर स्थापन केले.

मूर्ती: सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री सरस्वती देवालयातील देवीची मूर्ती जयपूर शहरात घडविण्यात आली आहे . मुंबई शहरातून मूर्ती सौ.कौशल्याबाई कलवार यांनी आणून स्थापन केली होती. श्री सरस्वती देवीची मूर्ती संगमरवरी असून ती ४ फूट उंचीची आहे यावदेवीची मूर्ती अत्यंत मोहक आहे .

  भक्तगण या देवीस हंसवाहिनी,मयुरवाहिनी, ब्रह्मकुमारी ,          वाग्देवी, भारती, विद्यादेवी ,अशा नावाने संबोधतात.             ब्राह्मनंदिनी श्री सरस्वती माता ही विणाधारी ,चतुभ्रूज,   शुभवस्त्रप्रिय अशी गौरवर्ण सुंदर आहे.अशा विद्या देणाऱ्या व मनोरथ पूर्ण करणाऱ्या शारदा मातेस कोटी कोटी प्रणाम ।।।