श्री श्रीनिवासन
Appearance
श्री श्रीनिवासन (जन्म फेब्रुवारी २३, १९६७) हे अमेरिकेचे मुख्य उप-न्यायअभिकर्ता आहेत. सध्या ते अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाशी संलग्न असणाऱ्या कोलंबिया सर्किट न्यायालयाच्या कायदा सुधारणा आणि अंमलबजावणी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. स्टॅनफोर्ड लॉ स्कूल मधून कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी हारवर्ड लॉ स्कूल मध्ये प्राध्यापकी केली. हे अमेरिकेच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारे पहिलेच भारतीय तसेच दक्षिण आशियायी नागरिक आहेत. सर्वोच्च न्यायालयापुढे सामाजिक स्वास्थ्य आणि समलिंगी व्यक्तींच्या विवाहासारख्या २० महत्त्वाच्या कायदेबदलांमध्ये त्यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली.